समावेशक शिक्षण : शाळा व शिक्षक भूमिका
Inclusive Education : The Role of Schools and Teachers
Authors:
ISBN:
₹225.00
- DESCRIPTION
- INDEX
‘समावेशक शिक्षण-शाळा व शिक्षक भूमिका’ या पुस्तकात विविध घटकांच्या माध्यमातून अनेक पैलू उलगडून अतिशय सोप्या व समर्पक भाषेची रचना करत या पुस्तकाची निर्मिती केली आहे. यातील प्रत्येक घटकामधील सर्वच मुद्द्यांची मांडणी अतिशय अभ्यासपूर्ण असुन शिक्षणाची व्याख्या, शिक्षणाची गरज, शिक्षणाचे प्रकार याच्यावर प्रकाशझोतच टाकला नाही तर शिक्षणक्षेत्रामधील वेळोवेळी झालेले कायदे याची सुद्धा अतिशय सुक्ष्म माहिती या पुस्तकात दिलेली आहे. यातील समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे या घटकामध्ये सुद्धा अतिशय विचारपूर्व लेखन केलेले दिसते. त्यामध्ये मांडलेली शिक्षणाची उद्दिष्टे, शिक्षणाची वैशिष्ट्ये, शिक्षणाची गरज, फायदे, तत्वे व दृष्टिकोन, याचे अतिशय सुंदर विवेचन केलेले आहे. तसेच सर्व समावेशक शिक्षण आणि क्षमता या घटकांमध्ये सुद्धा विद्यार्थी, शिक्षक, पालक, समाज या प्रत्येक घटकाचे कार्य व जबाबदारी यांची चांगली गुंफण केलेली दिसते.
प्रामुख्याने अक्षमता असणाऱ्या व्यक्तिसाठींचा 1995 चा कायदा, 1948 मानवी हक्क जाहिरनामा मधील कलमांचे विश्लेषण, बालकांसाठी शिक्षण हा मोफत व सक्तीचा शिक्षणाचा मूलभूत हक्क असल्याने मान्य केलेला शिक्षण हक्क कायदा 2009. बालहक्क संबंधी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय कायदे तसेच 1989, यासह अनेक शासकीय योजनांचे लेखांकन केले गेले आहे. सर्व शिक्षा अभियान, राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा या विषयाची मांडणी सुद्धा अतिशय सुबक केलेली दिसते.
Samaveshak Shikshan : Shala V Shikshak Bhumika
1. समावेशक शिक्षणाची ऐतिहासिक संकल्पना आणि या विषयाची धोरणे :
1.1 प्रस्तावना
1.2 अक्षमता संकल्पना
1.3 विशेष शिक्षण संकल्पनेचा विकास
1.3.1 विशेष शिक्षण व्याख्या
1.4 विशेष शिक्षणाची गरज
1.5 विशेष शिक्षणाची उद्दिष्टे
1.6 विशेष शिक्षणाचे प्रकार
1.6.1 विशेष शिक्षण, 1.6.2 एकात्मिक शिक्षण,
1.6.3 मुख्य प्रवाहातील शिक्षण, 1.6.4 समावेशक शिक्षण
1.7 समावेशक शिक्षणातील धोरणे
1.7.1 मानवी हक्क जाहीरनामा-1948, 1.7.2 संयुक्त राष्ट्रसंघाचा बालहक्काचा मसुदा-1989, 1.7.3 जॉमतिन येथील जागतिक परिषद-1990,
1.7.4 अक्षमता असणाऱ्या व्यक्तिंना समान संधीचे संयुक्त राष्ट्रसंघाचे प्रमाणित नियम, 1.7.5 विशेष गरजा असणाऱ्यांसाठी शिक्षणाचा सालामानका आराखडा-1994,
1.7.6 डकार कृती आराखडा-2000
1.8 भारतीय धोरणे : ऐतिहासिक पार्श्वभूमी
1.8.1 अक्षमता असणाऱ्या व्यक्तिंसाठीचा 1995 चा कायदा,
1.8.2 सर्व शिक्षा अभियान, 1.8.3 राष्ट्रीय अभ्यासक्रम आराखडा, 1.8.4 शिक्षण हक्क कायदा-2009
1.9 विशेष गरजा असणाऱ्यां बालकासाठी शासकीय योजना
1.10 समारोप
2. सर्वसमावेशक शिक्षणाचे सैद्धांतिक पैलू :
2.1 प्रास्ताविक
2.2 समावेशक शिक्षणाची संकल्पना
2.2.1 समावेशक शिक्षणाचा अर्थ, 2.2.2 समावेशक शिक्षणाची व्याख्या
2.3 समावेशक शिक्षणाची उद्दिष्टे
2.4 समावेशक शिक्षणाची वैशिष्टे
2.5 समावेशक शिक्षणाची गरज
2.6 समावेशक शिक्षणाचे फायदे
2.7 समावेशक शिक्षणाची तत्वे
2.8 समावेशक शिक्षणाचे दृष्टिकोन
2.8.1 समाजशास्त्रीय दृष्टिकोन, 2.8.2 संपूर्ण वर्ग दृष्टिकोन
2.9 समारोप
3. सर्वसमावेशक शिक्षण आणि क्षमता विकसन :
3.1 प्रस्तावना
3.2 समावेशक शिक्षणासाठी वृत्तीचे महत्त्व
3.3 समावेशक शिक्षणाबद्दल शिक्षक, पालक, विद्यार्थी आणि समाज यांच्यात सकारात्मक दृष्टिकोन विकसित करणे
3.3.1 विद्यार्थी, 3.3.2 शिक्षक, 3.3.3 पालक, 3.3.4 समाज
3.4 क्षमता विकसित करणे : अ) ज्ञान, ब) स्वत:ची कार्यक्षमता/स्व: जाणीव, क) समावेशन संबधित कौशल्ये
3.5 समावेशक शिक्षणासाठी सामाजिक कौशल्ये
4. सर्वसमावेशक शिक्षणातील शिक्षक भूमिका व कार्यनिती :
4.1 प्रास्ताविक
4.2 समावेशक शिक्षणात अपंगांना दिल्या जाणाऱ्या विशेष सेवा
4.2.1 अत्यावश्यक सेवा, 4.2.2 सहाय्यक सेवा,
4.2.3 अंशतः सेवा,
4.3 शाळांचे प्रकार
4.3.1 विशेष शाळा, 4.3.2 मुख्य प्रवाहात असणाऱ्या शाळा,
4.3.3 एकात्मिक शाळा, 4.3.4 सर्व समावेशक शाळा,
4.4 आदर्श समावेशक शाळा
4.4.1 सर्व समावेशित शाळेचे स्वरूप, 4.4.2 सर्व समावेशित शाळेची वैशिष्ट्ये, 4.4.3 सर्व सामान्य शाळा यातील फरक
4.5 समावेशित शाळेतील भौतिक सुविधा
4.5.1 अंध मुलांसाठी सुविधा, 4.5.2 कर्णबधिर मुलांसाठी भौतिक सुविधा, 4.5.3 बहुविकलांग मुलांसाठी भौतिक सुविधा,
4.5.4 अस्थिव्यंग मुलांसाठी भौतिक सुविधा, 4.5.5 शालेय सुविधांमध्ये सुधारणा
4.6 समावेशक वर्गातील वर्ग व्यवस्थापन
4.6.1 कर्णबधिर विद्यार्थ्यांसाठी वर्गव्यवस्थापन, 4.6.2 अंध व दृष्टीदोष विद्यार्थ्यासाठी वर्गव्यवस्थापन, 4.6.3 अस्थिव्यंग विद्यार्थ्यासाठी वर्गव्यवस्थापन,
4.6.4 मतिमंद विद्यार्थ्यासाठी वर्गव्यवस्थापन, 4.6.5 अध्ययन अक्षमता विद्यार्थ्यासाठी,
4.6.6 मेंदू पक्षाघात विद्यार्थ्यासाठी वर्गव्यवस्थापन
4.7 समावेशित शाळेतील मानवी घटक
4.7.1 समावेशित शाळेतील शिक्षक, 4.7.2 विशेष शिक्षक,
4.7.3 पालक, 4.7.4 वैद्यकिय तज्ञ, 4.7.5 व्यावसायिक शिक्षण, 4.7.6 मुख्याध्यापक, 4.7.7 कर्मचारी वर्ग, 4.7.8 मदतनीस,
4.7.9 शासकीय अधिकारी, 4.7.10 स्वयंसेवी संस्था
4.8 समावेशित शाळेची सध्याची भूमिका
4.8.1 समावेशित शाळेतील शिक्षकाचे गुण, 4.8.2 समावेशित शाळेतील शिक्षकाची भूमिका, 4.8.3 वर्गजडणघडणीत शिक्षकाची भूमिका,
4.8.4 समावेशक शाळेतील शिक्षकांचे प्रशिक्षण
4.9 समावेशक शाळा व अभ्यासक्रम
4.9.1 अपंगाचा अभ्यासक्रम, 4.9.2 बालकांच्या विशेष गरजा व अभ्यासक्रम
4.10 प्रभावी शिक्षणासाठी विविध अध्यापन पद्धती
4.11 समावेशित शाळेतील विविध विषयांचे अध्यापन कार्यनिती
4.12 विशेष बालकांच्या अध्यापनातील अध्यापन पद्धती
4.13 विशेष बालकांसाठी अध्यापनाची तंत्रे
4.14 विशेष बालकांच्या विकासासाठी धोरणे, शिक्षक, पालक, व्यवस्थापन यांच्यातील समन्वय
4.15 समावेशित शाळेतील बालकांचे मूल्यमापन
4.15.1 मूल्यमापन प्रक्रिया, 4.15.2 मूल्यमापनाचे महत्व,
4.15.3 मूल्यमापनाच्या पद्धती, 4.15.4 विशेष बालकांचे मूल्यमापन पद्धती
4.16 समारोप