समुपदेशन मानसशास्त्र
Counseling Psychology
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
परिवर्तन हे सृष्टीचे वैशिष्ट्य आहे. त्यानुसार समाजही अत्यंत वेगाने बदलत आहे. सतत बदलणार्या परिस्थितीत मनुष्य आपले जीवन जगण्याचा प्रयत्न करीत आहे. या बदलत्या परिस्थितीबरोबर त्या गतीने स्वत:मध्ये बदल करणे प्रत्येकालाच शक्य होते असे नाही. अशा वेळी विविध प्रकारच्या वर्तन समस्या निर्माण होतात. समस्याग्रस्त व्यक्तीला इतरांच्या मदतीची आवश्यकता भासते. अशा प्रसंगी त्याला समुपदेशन मानसशास्त्राच्या साहाय्याने वर्तन समस्येमुळे निर्माण झालेला स्वत:वरील ताण कमी करता येईल. त्याचबरोबर काळाची गरज विचारात घेता समस्याग्रस्तांना मदत करणार्या व्यक्तींची उणीव आहे. त्यातही मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मदत करणार्या व्यक्तीची उणीव आणखीनच अधिक प्रमाणात आहे. अलीकडच्या काळातील मानसशास्त्राचा अभ्यासक समुपदेशन मानसशास्त्र ह्या विषयाचा व्यवहारात कितपत उपयोग करता येईल या दृष्टीने विचार करू लागला आहे. किंबहुना त्याचा वापर करणे त्याने सुरुही केले आहे.
सदर पुस्तकात समुपदेशन म्हणजे काय? येथपासून ते समुपदेशनाचे मूल्यमापन कसे करावे, ह्यामध्ये समुपदेशकाची नैतिक मूल्य तसेच समुपदेशनासाठी कोणकोणती क्षेत्रे उपलब्ध आहे ह्याचाही विचार केलेला आहे. या पुस्तकाची उपयोगिता किंवा गरज विचारात घेता हे पुस्तक महाराष्ट्रातील विद्यापीठ क्षेत्रात विद्यार्थी, वाचक व प्राध्यापकांबरोबरच सर्व विद्यापीठ क्षेत्रातील विद्यार्थ्यांस, सामान्य वाचकांस याचा उपयोग होईल, अशी आशा वाटते.
Samupdeshan Manasshastra
- समुपदेशनाचे स्वरूप : 1.1 समुपदेशन : व्याख्या व अर्थ,1.2 मार्गदर्शन व समुपदेशन ह्यांतील फरक, 1.3 समुपदेशनाची ध्येये 1.4 व्यावसायिक आणि नैतिक मूल्य, 1.4 अ) समुपदेशकाची व्यावसायिक मूल्य, 1.4 ब) समुपदेशकाची नैतिक तत्त्वे
- समुपदेशक : व्यावसायिक तयारी : 2.1 समुपदेशकाची शैक्षणिक तयारी, 2.2 समुपदेशकाची सराव कौशल्य, 2.3 समुपदेशकाची तयारी, 2.4 समुपदेशन मानसशास्त्रांचे प्रशिक्षण, 2.5 परिणामकारक समुपदेशक, 2.6 समुपदेशकाच्या कार्याच्या परिमिती
- समुपदेशन संबंध : 3.1 समुपदेशन संबंध, 3.2 समुपदेशन आशय, 3.3 समुपदेशन प्रक्रिया, 3.4 संप्रेषण
- समुपदेशन मुलाखत : 4.1 लक्षपूर्वक उपस्थिती आणि प्रभाव कौशल्य, 4.2 सकारात्मक कौशल्य एकत्रीकरण, 4.3 भाग पाडणे आणि आत्मसंयमन प्रभाव, 4.4 सूचनात्मक प्रभाव आणि प्रभाव धोरणे
- मानसशास्त्रीय मापन : 5.1 प्रस्तावना, 5.2 मानसशास्त्रीय कसोटी उपयोगातील मर्यादा, 5.3 मानसशास्त्रीय कसोट्यांचे प्रकार, 5.4 मानसशास्त्रीय कसोटी फलितावर परिणाम करणारे घटक,
- समुपदेशन सिद्धान्त आणि तंत्र : 6.1 अ) मनोविश्लेषण उपचार पद्धती (तंत्र), 6:1 ब) अॅडलेरिअन व्यक्ती मानसशास्त्र उपचार पद्धती, 6.2 अ) अस्तित्ववादी उपचार पद्धती, 6:2 ब) व्यक्तिकेंद्रीत उपचार पद्धती, 6.3 अ) तर्कसंगत भावनिक पद्धत, 6.3 ब) आतंरक्रिया विश्लेषण
- समुपदेशनाचे मूल्यमापन : 7.1 प्रस्तावना, 7.2 मूल्यमापनाच्या समस्या, 7.3 मूल्यमापनाचे दृष्टिकोन, 7.4 समुपदेशनाची उपयोगिता, 7.5 मूल्यमापनाचे निकष
- समुपदेशनाचे उपयोजन : 8.1 अ) कुटूंब समुपदेशन, ब) बाल समुपदेशन, क) पालक समुपदेशन, 8.2 अ) शाळेतील समुपदेशन, व्यवसाय समुपदेशनविषयक प्रारूपे, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्यावसायिक समुपदेशन 8.3 अ) समूह समुपदेशन, कुटुंब उपचार पद्धती आणि वर्तन उपचार पद्धती
- कुटुंब उपचार पद्धती व वर्तन उपचार पद्धती : 9.1 कुटुंब उपचार पद्धती, 9.2 कुटुंब उपचाराची तंत्रे, 9.3 वर्तन उपचार तंत्रे