साधन व जलसंपदा भूगोल
Resource and Water Resource Geography
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
मानव हा पृथ्वीवरील नैसर्गिक पर्यावरणाचा एक महत्त्वाचा घटक असून त्याचे जीवन व अस्तित्व निसर्गावरच अवलंबून आहे. आपले जीवन अधिक सुखसोयीचे व सुरक्षीत होण्यासाठी मानव सतत प्रयत्नशील असतो. त्यासाठी तो निसर्गातील विविध प्रकारच्या वस्तू वापरतो. मानवाला निसर्गातून उपलब्ध झालेल्या विविध वस्तू किंवा पदार्थ म्हणजेच नैसर्गिक साधने होत. मानवाचे पर्यावरणाविषयी जसजसे ज्ञान वाढत गेले आणि त्याची तांत्रिक प्रगती होत गेली तसतसा पर्यावरणातील विविध घटकांचा वापर वाढला. आधुनिक काळात साधनसंपत्तीची संकल्पना अधिक व्यापक झाली असून त्यात संपूर्ण नैसर्गिक पर्यावरणाचा समावेश होतो.
पृथ्वीचा सुमारे तीन चतुर्थांश भाग म्हणजे सुमारे 71 टक्के भागावर जल तर 29 टक्के क्षेत्रावर भूभाग आहे. भूपृष्ठावरील एकूण जलसंपदेपैकी सुमारे 97 टक्के पाणी समुद्रात सामावले आहे. सागराचे पाणी खारट असल्याने त्याचा फारसा वापर करता येत नाही तर सुमारे 3 टक्के जलसाठा नद्या, तलाव, सरोवर व भूमीगत पाण्याचा म्हणजे गोड पाण्याचा आहे. पृथ्वीच्या निर्मिती/उत्पत्तीसोबत पाणी व पाण्यामुळे सजीव सृष्टीची निर्मिती झाली. जलसंपदेचा योग्य वापर व संवर्धन होण्यासाठी सन 2004 हे वर्ष ‘जल वर्ष’ म्हणून घोषित केले गेले.
सदरील पुस्तकात प्रत्येक मुद्यांचे विस्तृत विवेचन करण्याचा प्रयत्न केला आहे. विषयाच्या आकलनासाठी आवश्यक तेथे आकृत्यांचा वापर केला आहे. संज्ञा व संकल्पना सर्वांना समजतील अशा भाषेत मांडल्या आहेत.
Sadhan v Jalsampada Bhugol
- साधनसंपदा भूगोलाची ओळख : 1.1 साधनसंपदेचा अर्थ व संकल्पना, 1.2 साधनसंपदा भूगोलाचा अर्थ व संकल्पना, 1.3 साधनसंपदा भूगोलाचे स्वरुप, 1.4 साधनसंपदा भूगोलाची व्याप्ती, 1.5 साधनसंपदेचे महत्त्व
- साधनसंपदेचे वर्गीकरण : 2.1 पायाभूत वर्गीकरण – नुतनीकरण व अनुतनीकरण, 2.2 जैविक व अजैविक नुतनीकरण साधनसंपत्तीचे महत्त्व, 2.3 जैविक व अजैविक अनुतनीकरण साधनसंपत्तीचे महत्त्व
- भूमी, वन व अन्न संपदा : 3.1 भू संपदा, 3.2 जंगल/वन संपदा, 3.3 अन्नसंपदा
- खनिजे व ऊर्जा साधने : 4.1 खनिज संपदा, 4.2 ऊर्जा साधने, 4.3 ऊर्जा संपदेचे संवर्धन, आर्थिक व पर्यावरणविषयक महत्त्व
- नियोजन लोकसंख्या संपदा संबंध : 5.1 संपदा नियोजनाची संकल्पना, 5.2 संपदा नियोजनाची गरज, 5.3 भारताच्या संदर्भासह संपदा नियोजन
- जलसंपदा भूगोलाची ओळख : 6.1 जल एक मौल्यवान संपदा, 6.2 जलसंपदा भूगोलाची व्याख्या व संकल्पना, 6.3 जलसंपदा भूगोलाचे स्वरुप व व्याप्ती, 6.4 जलसंपदेचे जागतिक वितरण, 6.5 जलचक्र, 6.6 जलसंपदा महत्त्व व उपयोग
- जल संपदा उपयोगिता व संबंधित समस्या : 7.1 पाण्याचा शेतीतील वापर, 7.2 औद्योगिक क्षेत्रातील पाण्याचा वापर व संबंधित समस्या, 7.3 जलसंपदा प्रदुषण समस्या, 7.4 भूमिगत पाणी क्षय होण्याची कारणे, 7.5 पाणी टंचाईची कारणे
- जल संपदेचे संवर्धन : 8.1 जमिनीत पाणी मुरविण्याची गरज, 8.2 पाणलोट क्षेत्र विकास व गरज, 8.3 जल प्रदुषण नियंत्रण उपाय, 8.4 जल साक्षरता, 8.5 जलसंपदा विकासासाठी नियोजन
- जल संपदेचे व्यवस्थापन : 9.1 जल व्यवस्थापनातील सामाजिक व संस्थात्मक बाजू, 9.2 भूपृष्ठावरील व भूमिगत पाण्याचा एकत्रित वापर, 9.3 जलसंपदा व्यवस्थापनात जलयुक्त शिवार योजनेची भूमिका, 9.4 जलसंपदा व्यवस्थापनात नदीजोडची भूमिका, 9.5 जलसंपदा व्यवस्थापनातील दूर संवेदन व भौगोलिक माहिती प्रणालीचे उपयोजन