सामाजिक मानवशास्त्र
Social Anthropology
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक सामाजिक शास्त्रात एक अतिशय महत्वपूर्ण शास्त्र म्हणजे मानवशास्त्र होय. मानवाचे अध्ययन करणार्या वेगवेगळ्या शाखा आहे. त्या सर्व शाखांना एकत्र करण्याची आवश्यकता 1859 साली फ्रेंच विचारवंत श्री. पॉल ब्रोका यांनी मांडली आणि पुढे सामान्य मानवशास्त्राचा उदय झाला. मानवशास्त्रात मानवाच्या शारीरिक, सांस्कृतिक व सामाजिक या तिन्ही अंगाचा अभ्यास केल्या जातो. त्यादृष्टीने मानवशास्त्र हे विविध प्रकारच्या शास्त्राशी निगडीत असून एक सामाजिक शास्त्र म्हणून मानले जाते. सामाजिक मानवशास्त्र हे विज्ञान आहे. त्यामुळे वैज्ञानिक पद्धतीनेच समाजाचा अभ्यास या शास्त्रात केला जातो. इ.स. 1870 पासून सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासाला सुरुवात झाली. वर्तमानकाळात सामाजिक मानवशास्त्रात आदिवासी व ग्रामीण समाजाचा अभ्यास केला जातो. परंतु आदिवासी समाजाच्या अभ्यासावर प्रकर्षाने लक्ष दिले जाते.
मानवशास्त्र मानवाचे शास्त्रशुद्ध पद्धतीने अध्ययन करीत असल्यामुळे त्यात मानवी जीवनाच्या सर्व अंगाचा अभ्यास केल्या जातो. मानवशास्त्र एका व्यक्तीचे अध्ययन करीत नसून मानवी समुहाचे अध्ययन करते म्हणून मानवी समाजाअंतर्गत असलेल्या विविध गटाचा मानवशास्त्र अभ्यास करते. मानवशास्त्र हे आदीम व प्रगत अश्या दोन्ही समाजाचे अध्ययन करते.
सदरील पुस्तकात सामाजिक मानवशास्त्राचा परिचय, सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती, भारतातील आदिवासी समाज, आदिवासी धर्म व जादू, आदिवासींची अर्थव्यवस्था, आदिवासींचे सामाजिक जीवन, कुटुंब, देवकवाद, आदिवासी समस्या व विकास इ. मुद्द्यांचा सविस्तरपणे उहापोह केलेला आहे.
Samajik Manavshastra
- सामाजिक मानवशास्त्राचा परिचय : सामाजिक मानवशास्त्र स्वरूप आणि व्याप्ती, अर्थ, शाखा; अ) शारीरिक मानवशास्त्र, ब) सांस्कृतिक मानवशास्त्र- 1) पुरातत्वशास्त्र 2) प्रजातीशास्त्र 3) भाषिक मानवशास्त्र 4) सामाजिक मानवशास्त्र; सामाजिक मानवशास्त्राच्या व्याख्या
- सामाजिक मानवशास्त्राच्या अभ्यासपद्धती : अ) क्षेत्रपद्धती – अध्ययनाचा कालावधी, अध्ययनाची भाषा, सहभागी निरीक्षण, अध्ययनाचे क्षेत्र, ज्ञापकांची निवड; आवश्यक कागदपत्रांचे प्रकार, क्षेत्रसंशोधन पद्धतीचे महत्व, क्षेत्र संशोधन पद्धतीत संशोधकाची भूमिका ब) ऐतिहासिक पद्धती
- भारतातील आदिवासी समाज : अ) भारतीय आदिवासींचे वांशिक वर्गीकरण – वंशाचा अर्थ, वंशाचे वर्गीकरण, रिस्ले यांनी केलेले वर्गीकरण, हट्टन यांनी केलेले वर्गीकरण
- आदिवासी धर्म व जादू : अ) धर्म – अर्थ, संकल्पना, वैशिष्ट्ये ब) उत्पत्तीचे सिद्धांत – 1) सर्वात्मवाद/जीवात्मक सिद्धांत 2) चेतनावाद किंवा शक्तीवाद – अ) मानावाद ब) बोंगावाद 3) निसर्गवाद
- आदिवासींची अर्थव्यवस्था : अ) आदिवासी अर्थव्यवस्थेचे वर्गीकरण – ग्रोसे, इहरनफेल्स, अॅडम स्मिथ, थर्नवाल्ड, टी.सी. दास, एस. सी. दुबे ब) आदिवासी अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये – निश्चित भूप्रदेश
- आदिवासींचे सामाजिक जीवन : विवाह – अर्थ, संकल्पना, व्याख्या; विवाहाचे उद्देश – कामवासनापूर्ती, प्रजनन व अपत्य संगोपन, आर्थिक सहकार्य, कुटुंबाची निर्मिती; विवाहाची वैशिष्ट्ये – स्थायीत्व
- कुटुंब : अ) कुटुंब संस्था – व्याख्या, कुटुंबाची मुलभूत तत्वे किंवा घटक, कुटुंबाची वैशिष्टे; कुटुंबाची उत्पत्ती – शास्त्रीय सिद्धांत, स्वैराचार सिद्धांत, विकासवादी सिद्धांत, समरक्त कुटुंब, समुहविवाह कुटुंब
- देवकवाद : अ) देवकवाद – अर्थ; देवकाची वैशिष्टे – देवकाचे अस्तित्व, देवकाविषयी आदर, सन्मान, देवक बहिर्विवाह, पवित्रता व धार्मिकता; देवकाची उत्पत्ती – नामवादी सिद्धांत, आत्मवादी सिद्धांत
- आदिवासी समस्या : समस्यांची प्रमुख कारणे – प्रगत समाजाशी संपर्क, ब्रिटीश प्रशासनाचा प्रभाव, औद्योगिक क्रांतीचा प्रभाव, ख्रिश्चन धर्मप्रसारक, पृथकता; भारतीय आदिवासीच्या प्रमुख समस्या
- आदिवासी विकास : अ) आदिवासी विकास कार्यक्रम – कृषी सुधार कार्यक्रम, शिक्षण सुधार, आरोग्य सुधार, गृहनिर्माण व भवन निर्माण, दळणवळणाच्या सोई, सहकारी संस्था, कल्याण कार्यक्रम