Prashant Publications

सामान्य नकाशाशास्त्र

General Cartography

Authors: 

Tags: , ISBN: 9789385664915a

ISBN:

SKU: 9789385664915a

Rs.135.00

  • DESCRIPTION
  • INDEX

नकाशाशास्त्र ही एक कला असून मानवाद्वारे मिळालेल्या ज्ञानाच्या आधारे प्रकट होणारी एक मानवी अभिव्यक्ती आहे. सामान्यत: मानव ज्ञानाचे किंवा सूचनांचे आदान-प्रदान करण्यासाठी रेखाचित्र किंवा नकाशांचा उपयोग करीत असे, मानवाला भाषेचे ज्ञान अगोदर तो चिन्हे, संकेत, रेखाचित्रे व चित्रांचा उपयोग करीत असे. त्यामुळे नकाशाशास्त्र ही कला खूपच प्राचीन आहे हे स्पष्ट आहे.

जगातील वेगवेगळ्या संस्कृतीचा अभ्यास करतांना मानव हा नकाशांचा वापर खूप पूर्वी पासून करीत आला आहे. त्याचे उत्कृष्ट उदाहरण म्हणजे अनेक लेण्या, प्राचीन स्थळे, शहरे, गावे यांचे निरीक्षण केले असता यात चिन्हे व रेखाचित्रांचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर केलेला दिसतो. यावरून आपल्याला कल्पना येते की, प्राचीन काळातील लोकांनी नकाशाशास्त्रांची रचना केली, त्याचा उपयोग ही मोठ्या प्रमाणावर करून नकाशाशास्त्राचा विकासही केला. आधुनिक काळात मानवाच्या विकासाबरोबरच नकाशाशास्त्राचा विकास होत गेला व तो इतक्या मोठ्या प्रमाणावर झाला की, सामान्य माणूस ही नकाशाशास्त्राचा वापर करू लागला आहे. हवाई छायाचित्र, दूरसंवेदन, उपग्रह प्रतिमा, भौगोलिक माहिती प्रणाली व स्थान निश्चिती प्रणाली, संगणक, मोबाईल, टेलिव्हीजन यावर नकाशाशास्त्राचा वापर मानव केल्याशिवाय रहात नाही.

Samanya Nakashashastra

  1. नकाशाशास्त्र : प्रस्तावना : व्याख्या, स्वरूप व व्याप्ती; सांख्यिकी माहितीचे सादरीकरण दर्शविणे : प्रस्तावना, सांख्यिकी माहिती सादरीकरणाचे सर्वसामान्य नियम, आकृत्यांचे वर्गीकरण; प्रात्यक्षिक घटक : नकाशा प्रमाणाचे वाचन, नकाशा प्रमाणानुसार जमिनीचे मोजमाप, साधे रेषा प्रमाण तयार करणे, नकाशांचे शिर्षक, प्रमुख अक्षवृत्तांची रचना, प्रमुख रेखावृत्तांची रचना, बृहदवृत्त, हवेची स्थितीदर्शक नकाशावरील चिन्हे व खुणा, पवनपुष्प/ वातपुष्प/ तारासदृश्य आकृती, दंडगोल समक्षेत्र प्रक्षेपण, शंकू प्रक्षेपण, हवामानाच्या पूर्व अंदाजाच्या पद्धती.
  2. नकाशाशास्त्र आणि नकाशाचा परिचय : प्रस्तावना, नकाशाचा परिचय, नकाशाशास्त्राची व्याख्या व अर्थ; आधुनिक भारतातील नकाशाशास्त्राचा इतिहास, नकाशाचे प्रकार, नकाशाची अंगे, विविध क्षेत्रामध्ये नकाशाचा उपयोग.
  3. नकाशा व प्रमाण : प्रस्तावना, नकाशाची व्याख्या, नकाशा प्रमाणाची व्याख्या, नकाशा प्रमाणाचे उपयोग; नकाशा प्रमाणाचे प्रकार : गुणवैशिष्ट्यानुसार प्रमाणाचे प्रकार, नकाशाच्या आकारानुसार प्रकार; नकाशा प्रमाण व्यक्त करण्याच्या पद्धती : नकाशा प्रमाणाचे रूपांतर, नाविक मैलाचे फूट व मीटरमध्ये रूपांतर; रेषा प्रमाण/आलेख प्रमाण; रेषा प्रमाणांचे प्रकार.
  4. नकाशा प्रक्षेपण (प्रत्यालेख) : प्रस्तावना, नकाशाची व्याख्या, नकाशाची अंगे; नकाशाचे प्रकार : नकाशाचा आकार व प्रमाणानुसार प्रकार, नकाशाच्या उद्देशानुसार प्रकार, सांस्कृतिक किंवा मानव निर्मित नकाशाचे प्रकार; नकाशाचे उपयोग; पृथ्वीगोल : पृथ्वीगोलाचे उपयोग, पृथ्वीगोलाचे प्रकार; नकाशा प्रक्षेपण : प्रस्तावना, प्रक्षेपणाची व्याख्या, नकाशा प्रक्षेपणाची गरज, प्रक्षेपीय पृथ्वीची त्रिज्या; प्रक्षेपणाचे वर्गीकरण : नकाशा प्रक्षेपणाच्या पृष्ठभागानुसार प्रकार, पृष्ठभागाच्या स्थानानुसार प्रकार, नकाशा प्रक्षेपणाच्या गुणवत्तेनुसार प्रकार, प्रक्षेपण तयार करण्याच्या पद्धतीनुसार प्रकार; प्रक्षेपण निवडीचे निकष : ‘ख’ मध्य धुव्रीय गोमुखी प्रक्षेपण, ‘ख’ मध्य धुव्रीय व्यासांतर प्रक्षेपण; दंडगोलीय प्रक्षेपणे : दंडगोलीय समक्षेत्र प्रक्षेपण; शंकू प्रक्षेपणे, एकप्रमाण अक्षवृत्त शंकू प्रक्षेपण, बॉनचे प्रक्षेपण.

Author

RELATED PRODUCTS
सामान्य नकाशाशास्त्र
You're viewing: सामान्य नकाशाशास्त्र Rs.135.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close