सार्वजनिक आयव्ययाचे अर्थशास्त्र
Economics of Public Finance
Authors:
ISBN:
₹350.00
- DESCRIPTION
- INDEX
सार्वजनिक आयव्यय हा राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र या दोन अभ्यास विषयांच्या सीमेवर असलेला विषय आहे. त्याचा एक पाय राज्यशास्त्राच्या दगडावर तर दुसरा पाय अर्थशास्त्राच्या दगडावर आहे. राज्यशास्त्र राज्यकारभार कसा चालवायचा हे सांगते तर राज्यकारभारातून समाजकल्याणात वाढ कशी करायची आणि त्यासाठी उत्पन्न कसे प्राप्त करायचे व ते कसे खर्च करायचे हे सांगते. सरकार कर आणि करेत्तर मार्गाने उत्पन्न प्राप्त करते. कर हे सक्तीचे अंशदान असते. त्याच्या बदल्यात करदात्याला कोणताही विशेष लाभ मिळत नाही. कर महसूल प्राप्त करण्याचे एक साधन आहे. याबरोबरच ते आर्थिक विषमता कमी करण्याचे प्रमुख साधन आहे. आधुनिक काळात कल्याणकारी राज्य संकल्पना स्विकारण्यात आली आहे. जनकल्याणासाठी सरकारला खर्च करावा लागतो आणि तो भागविण्यासाठी सरकारला महसूल प्राप्त करावा लागतो. खर्च आणि महसूल ताळमेळ बसत नसेल तर सार्वजनिक कर्ज, तुटीचा अर्थभरणा यांचा अवलंब करावा लागतो.
प्रस्तुत पुस्तकात राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाची भूमिका/महत्त्व, आयव्ययाचे सिद्धांत, कर, सार्वजनिक वस्तू आणि खासगी वस्तू, कराघात, करभार आणि करभाराचे संक्रमण, बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप, सार्वजनिक खर्च, भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक कर्जाची परतफेड, अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थभरणा, विकसनशील अर्थव्यवस्थेत तुटीच्या अर्थभरणाची भूमिका इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश आहे. प्रस्तुत पुस्तक सर्वांना उपयुक्त ठरेल यात शंका नाही.
Sarvajnik Ayavyayvache Arthashastra
- सार्वजनिक आयव्ययाचा परिचय : 1.1 सार्वजनिक आयव्यय, 1.2 सार्वजनिक आयव्यय आणि खाजगी आयव्यय यांच्यातील फरक, 1.3 राष्ट्रीय अर्थव्यवस्थेत सार्वजनिक आयव्ययाची भूमिका/महत्त्व, 1.4 सार्वजनिक आयव्ययाचे सिद्धांत
- सार्वजनिक महसूल : 2.1 सार्वजनिक महसूलाचे स्त्रोत/मार्ग, 2.2 कर, 2.3 करांचे वर्गीकरण/प्रकार, 2.4 करयोग्य/करपात्र क्षमता, 2.5 सार्वजनिक वस्तू आणि खासगी वस्तू
- करारोपणाचे विविध दृष्टिकोन आणि सरकारचा हस्तक्षेप : 3.1 करारोपणाबाबतचे दृष्टिकोन, 3.1.1 वित्तीय सिद्धांत, 3.1.2 सेवा खर्च सिद्धांत, 3.1.3 लाभ सिद्धांत, 3.1.4 कर देयता क्षमता सिद्धांत, 3.1.5 आधुनिक मत : महत्तम कल्याणाचा सिद्धांत, 3.2 कराघात, करभार आणि करभाराचे संक्रमण, 3.2.1 मुलभूत संकल्पना, 3.2.2 कराघात, करभार, संक्रमण आणि कर प्रभाव संकल्पनांमधील फरक, 3.3 करभार किंवा करभार संक्रमणाचे सिद्धांत, 3.4 करभार किंवा करसंक्रमण निर्धारित करणारे घटक/तत्व, 3.5 करारोपणाचे प्रभाव, 3.6 बाजाराचे अपयश आणि सरकारचा हस्तक्षेप, 3.6.1 मुक्त बाजार अर्थव्यवस्थेचे समर्थन, 3.6.2 बाजाराचे अपयश, 3.6.3 सरकारचा हस्तक्षेप, 3.6.4 सरकारी हस्तक्षेपाची आवश्यकता/सरकारची बाजारातील भूमिका, 3.6.5 सरकारच्या हस्तक्षेपाची साधने, 3.6.6 भारतीय संमिश्र अर्थव्यवस्थेतील सरकारचा हस्तक्षेप, 3.6.7 बाजार अपयश आणि सरकारचा हस्तक्षेपाबाबत सॅम्युएलसन आणि नोर्धेस यांचे मत, 3.6.8 सरकारी हस्तक्षेपाचा खर्च
- सार्वजनिक खर्च : 4.1 सार्वजनिक खर्चाचा अर्थ, 4.2 सार्वजनिक खर्चाचे तत्व किंवा प्रनियम, 4.3 सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण, 4.4 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, 4.5 विकसनशिल अर्थव्यवस्थेतील सार्वजनिक खर्चाची भूमिका, 4.6 भारतातील सार्वजनिक खर्चाची प्रवृत्ती, 4.7 सार्वजनिक खर्चाचे उत्पादन व वितरणावरील परिणाम
- सार्वजनिक कर्ज : 5.1 सार्वजनिक कर्जाचा अर्थ, 5.2 सार्वजनिक कर्ज काढण्याचे मार्ग, 5.3 सार्वजनिक कर्जाचा भार, 5.4 सार्वजनिक कर्जाचे प्रकार किंवा वर्गीकरण, 5.5 सार्वजनिक कर्जाचे व्यवस्थापन आणि सार्वजनिक कर्जाची परतफेड, 5.6 विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये सार्वजनिक कर्जाची भूमिका
- अंदाजपत्रक आणि तुटीचा अर्थभरणा : 6.1 अंदाजपत्रकाचा अर्थ, 6.2 आर्थिक विकासात अंदाजपत्रकीय धोरणाची भूमिका, 6.3 तुटीचा अर्थभरणा-अर्थ आणि परिणाम, 6.4 अंदाजपत्रकीय तूट व तुटीचा अर्थभरणा यातील भेद, 6.5 विकसनशील अर्थव्यवस्थेत तुटीच्या अर्थभरणाची भूमिका, 6.6 संकल्पना आणि विकसनशील अर्थव्यवस्थांमध्ये राजकोषीय धोरणाची, भूमिका