Prashant Publications

My Account

सार्वजनिक आयव्यय

Public Finance (S-4)

Authors: 

ISBN:

SKU: 9789391391492
Marathi Title: Sarvajanik Ayayvya
Book Language: Marathi
Published Years: 2021
Pages: 192
Edition: First

225.00

  • DESCRIPTION
  • INDEX

सार्वजनिक आयव्यय या पुस्तकाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना भारत सरकार, महाराष्ट्र सरकार तसेच देशातील उत्पन्न व खर्च या सर्व गोष्टींची माहिती व्हावी, केंद्र व राज्य संबंधांमध्ये उत्पन्नाच्या वाटणी कशा पद्धतीने होते, देशातील उत्पन्नाच्या साधनांची हस्तांतरण कसे होते, अंदाजपत्रकाचे प्रकार व मांडणी, तुटीचे अंदाजपत्रक, केंद्र व राज्य वित्तीय संबंध तसेच त्यासाठी कार्य करत असलेले भारत नियोजन आयोग व त्या जागी नव्याने निती आयोग हे सर्व माहित होण्यासाठी सविस्तरपणे माहिती देण्यात आलेली आहे. सदर पुस्तक लिहिताना अर्थशास्त्रीय संकल्पनांचा अचूक, सोप्या भाषेत मांडणी करण्याचा व स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला असून त्यासाठी संदर्भ ग्रंथ, वेबसाईट, वर्तमानपत्र, लेख, शासन अहवाल अंदाजपत्रक यांचा आधार घेऊन मांडणी करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे पुस्तक अर्थशास्त्र विषयातील विद्यार्थ्यांना तर उपयुक्त आहेच त्याचबरोबर महाराष्ट्र लोकसेवा आयोग अर्थात एमपीएससी व यूपीएससी या विद्यार्थ्यांना मार्गदर्शक व उपयुक्त ठरेल.

Sarvajanik Ayayvya

  1. सार्वजनिक आयव्ययाची ओळख : 1.1 सार्वजनिक आयव्यय- अर्थ, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व, 1.2 खाजगी आयव्यय आणि सार्वजनिक आयव्यय यातील फरक, 1.3 आर्थिक विकासात सार्वजनिक आयव्ययाची भूमिका, 1.4 महत्तम सामाजिक लाभाचे तत्त्व- मसग्रेव्हचा दृष्टिकोन.
  2. सार्वजनिक महसूल : 2.1 सार्वजनिक उत्पन्नाचे मार्ग, 2.2 करांचा अर्थ व करांचे प्रकार -प्रत्यक्ष कर आणि अप्रत्यक्ष कर, फायदे आणि तोटे, 2.3 वस्तू व सेवा कर : संकल्पना आणि वैशिष्ट्ये; भारतात जीएसटीची गरज, 2.4 कराघात, करभार, करसंक्रमण आणि करभार पात्रता संकल्पना.
  3. सार्वजनिक खर्च : 3.1 सार्वजनिक खर्चाचा अर्थ आणि तत्त्वे, 3.2 सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण, 3.3 सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे, 3.4 वॅगनरचा सार्वजनिक खर्चाचा नियम.
  4. सार्वजनिक कर्ज : 4.1 सार्वजनिक कर्जाचा अर्थ, स्त्रोत आणि महत्त्व, 4.2 सार्वजनिक कर्ज परतफेडीच्या पद्धती, 4.3 सार्वजनिक कर्जाचा भार, 4.4 वित्तीय दायित्व व अर्थसंकल्प व्यवस्थापन कायदा- 2003.
  5. राजकोषीय धोरण : 5.1 राजकोषीय धोरणाचा अर्थ, साधने आणि उद्दिष्टे, 5.2 विकसनशील देशातील राजकोषीय धोरण, 5.3 राजकोषीय धोरणाच्या मर्यादा, 5.4 2011 पासूनच्या भारताच्या राजकोषीय धोरणांचा आढावा.
  6. अंदाजपत्रक : 6.1 अंदाजपत्रकाचा अर्थ, स्वरूप आणि उद्दिष्टे, 6.2 अंदाजपत्रकाचे वर्गीकरण, 6.3 भारतीय केंद्रीय अंदाजपत्रकाची तयारी, 6.4 लिंगाधारित अंदाजपत्रकाचा अर्थ आणि महत्त्व.
  7. तुटीचा अर्थभरणा : 7.1 तुटीच्या अर्थभरण्याचा अर्थ आणि उद्दिष्टे, 7.2 विकसनशील देशांमध्ये तुटीच्या अर्थभरण्याची भूमिका, 7.3 भारताच्या तुटीचा अर्थभरण्यातील 2011 पासूनची प्रवृत्ती, 7.4 तुटीच्या अर्थभरण्याचे परिणाम.
  8. केंद्र-राज्य वित्तीय संबंध : 8.1 केंद्र-राज्य वित्तीय संबंध: घटनात्मक तरतुदी, 8.2 केंद्र-राज्य वित्तीय संबंधात संघर्ष, 8.3 वित्तीय आयोगाची भूमिका, 8.4 15 व्या वित्त आयोगाच्या शिफारसी.
RELATED PRODUCTS
You're viewing: सार्वजनिक आयव्यय 225.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close