सार्वजनिक प्रशासन आणि व्यवस्थापन (भाग 2)
Public Administration and Management (Part 2)
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
व्यवस्थापन हा एक विचार म्हणून अलिकडे अनेक विद्याशाखेत परिचित आहे. व्यवस्थापनासंबंधी सूक्ष्मत्वाने अध्ययन केल्यास व्यवस्थापन, प्रशासन, संघटन या तीन संकल्पनेचा परस्पर संबंध विचारात घ्यावा लागतो. अलिकडे सार्वजनिक हिताची कार्ये प्रशासनाद्वारे संपन्न केली जातात. अर्थात तो शासकीय कर्तव्याचा एक भाग असतो. सर्व नागरिकांना एकसमान वर्तवणूक प्राप्त होणे हे समाधानकारक सेवेचे एक लक्षण मानले जाते. आधुनिक भारतात पाश्चात्य विचारांच्या प्रभावामुळे स्वार्थी जीवनामुळे आपल्या देशातील सनदी सेवकांची नैतिक घसरण होत आहे. अनेक स्वरूपाच्या प्रशासकीय भ्रष्टाचारामुळे प्रशासकीय अधिकारी, राजकीय अधिकारी या दोघांचेही हात भ्रष्टाचारात गुंतलेले दिसतात.
प्रस्तुत ग्रंथात व्यवस्थापन संकल्पनेची विस्तृत माहिती, व्यवस्थापनाची आवश्यकता ही आजच्या परिप्रेक्ष्यात विश्लेषीत करण्याचा प्रयत्न केला आहे. आद्योगिक-सामाजिक प्रशासकीय नेतृत्वाचा भूमिकेतून संघटनेचा हेतू कसे साध्य केले जाते, नेतृत्वाची संकल्पना, नेतृत्व घटक, आवश्यक योग्यता या बाबी सूक्ष्मत्वाने मांडण्याचा प्रयत्न केला आहे. याचप्रमाणे राजकीय कार्यकारी भूमिकेचा एक भाग, अभिजन वर्गाच्या कार्यपद्धतीचा एक भाग म्हणून धोरण आखणी व त्याची अंमलबजावणी कशी होते, हे सुद्धा वस्तुनिष्ठपणे मांडण्यात आले आहे. प्रशासकीय सेवेत काही नितीमूल्ये जबाबदारी, मनोबल, जनसंपर्क हे साधने वा विचाराची उपयुक्तता प्रतिपादन करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
Sarvajanik Prashasan Ani Vyavsthapan (Bhag 2)
- व्यवस्थापन : 1) अर्थ, प्रकार 2) व्यवस्थापनाचे वैशिष्ट्ये 3) व्यवस्थापनाची कार्ये, पोस्डकॉर्ब सिद्धांत 4) चांगल्या व्यवस्थापनाच्या चाचण्या आणि महत्त्व
- प्रशासकीय नेतृत्व : 1) अर्थ, व्याख्या, महत्त्व 2) प्रशासकीय नेतृत्वाचे दृष्टीकोन 3) प्रशासकीय नेतृत्वाचा विकास आणि नेतृत्वाचे वैशिष्ट्ये 4) प्रशासकीय नेतृत्वाचे आवश्यक योग्यता आणि प्रकार 5) प्रशासकीय नेतृत्वाचे कार्ये 6) नेतृत्वाच्या पद्धती वा शैली
- धोरणाची जडणघडण आणि समन्वय : 1) धोरण निर्मिती – अ) अर्थ, व्याख्या आणि धोरण निर्मितीचे पायाभूत घटक ब) भारतातील धोरण निश्चिती 2) समन्वय – अ) अर्थ, गरज आणि महत्त्व ब) समन्वयाची तत्वे आणि वैशिष्टये क) चांगल्या समन्वयाच्या आवश्यक बाबी ड) परिणामकारक समन्वयाची तंत्रे
- व्यवस्थापनातील नवे प्रवाह : अ) मनोध्यैय वा मनोबल ब) प्रशासकीय नैतिकता क) प्रशासनाची सामाजिक जबाबदारी ड) जनसंपर्क