साहित्य समीक्षा शोध आणि बोध
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
‘साहित्य समीक्षा शोध आणि बोध’ हा डॉ. अनंता सूर यांचा समीक्षाग्रंथ म्हणजे एकंदरीत बावीस कलाकृतींचा वाड्मयीन शोध आणि बोध आहे. हा वाड्मयीन शोध आणि बोध त्यांनी बारा काव्यसंग्रह, दोन कथासंग्रह, चार कादंबऱ्या आणि चार आत्मकथनांच्या अनुषंगाने घेतलेला आहे. डॉ. अनंता सूर हे नव्या पिढीतील कवी, कथाकार, आत्मकथनकार व कादंबरीकार असल्यामुळे त्यांच्या समीक्षेचा सूर बव्हंशी नव्वदोत्तरी साहित्यकृतींशी जुळलेला दिसतो.
मराठी समीक्षेचा आणि समीक्षकांचा महत्त्वाचा दोष म्हणजे ती समीक्षा एकसूरी आहे. त्यामुळे मराठीतील जुन्या पिढीतील समीक्षक नव्या पिढीतील कवी, लेखक काय लिहीत आहेत याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत. डॉ. अनंता सूर यांनी या समीक्षाग्रंथात एकंदरीत या बावीस कलाकृतींवर सखोलपणे भाष्य केले आहे. त्या सर्वच्या सर्व कलाकृती खाउजा संस्कृतीचे अपत्य आहेत. खाउजा संस्कृती म्हणजे खाजगीकरण, उदारीकरण आणि जागतिकीकरण. ह्या तीन बाबींचा या ना त्या प्रकारे सामान्यातील सामान्य माणसाच्या जीवनावर प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे परिणाम झालेला आहे. डॉ. अनंता सूर यांचे हे समीक्षा लेख त्या त्या कलाकृतींवर उचित आणि चिंतनशील भाष्य करणारे आहेत. खाउजा संस्कृतीने समाजाची घडी बसवली की विस्कटवली ह्या प्रश्नाचे उत्तर शोधणाऱ्या या कलाकृती आहेत. काळ कोणताही असो प्रत्येक काळात जो हतबल आहे तो कसा शोषित आणि वंचित ठरतो हेच यातील प्रत्येक समीक्षा लेखातून प्रत्ययास येते. आजच्या कालखंडावर दृष्टीक्षेप टाकण्यासाठी हा समीक्षाग्रंथ मोलाची भूमिका बजावेल यात मला शंका नाही.
– डॉ. सुहासकुमार बोबडे
ज्येष्ठ साहित्यिक, कराड
Sahityasamiksha : Shodh Aani Bodh
- व्यक्तिचित्रणातून शेतीमातीच्या जाणिवा उलगडणारा काव्यसंग्रह : भूमिनिष्ठांची मांदियाळी
- अशाश्वत क्षणांची साक्ष नोंदविणारी कविता : काही सांगतात येत नाही
- समकालीन प्रश्नांची विषमता उलगडणारा काव्यसंग्रह : आपण म्हणतो महाराष्ट्र पुरोगामी आहे
- समूहमनाच्या वेदनेची पोत उलगडणारा काव्यसंग्रह : आयडेंटिटीचे ब्रँडेडयुद्ध
- संदिग्ध आयुष्याची नव्याने मंथन करणारी कविता : आरंभबिंदू
- भूतकाळातील अस्वस्थ क्षणांना कवटाळणारा काव्यसंग्रह : मुठीतील वाळू
- सभोवतालच्या जगण्यातील स्पंदनांचा आलेख चितारणारा काव्यसंग्रह : कैवार
- स्वातंत्र्यातही गुलामगिरीचा आरसा दाखविणारा काव्यसंग्रह : बा स्वातंत्र्या !
- व्यवस्थेतील ढोंगीपणावर ताशेरे ओढणारा काव्यसंग्रह : सालं अतीच झालं!
- दैनंदिन जगण्यातील बारकावे टिपणारा काव्यसंग्रह : हे असेच होत राहिले तर…
- आज-कालच्या जगण्यावर भाष्य करणारी कविता – मी : एक अंधारटिंब
- भेदक वास्तवाचा चेहरा मुद्रित करणारी कविता : धगधगते तळघर
- सामान्यातही असामान्यत्वाचा संदेश देणारा कथासंग्रह : अशी माणसं अशा गोष्टी
- सभोवतालच्या संघर्षातील बारकावे टिपणारा कथासंग्रह : सोज्वळ षोडशा
- महारवाड्याचा वेदनामय इतिहास रेखाटणारी कादंबरी : सनातन
- समकालीन प्रश्नांच्या वाताहतीची कैफियत मांडणारी कादंबरी : भुईभेद
- शिक्षणातील बेरोजगारीची भीषणता उलगडणारी कादंबरी : मत्स्यालय
- राजकारण आणि दुष्काळाची धग चितारणारी कादंबरी : धूळपावलं
- पोरका बाबूचा जीवनसंघर्ष मांडणारे आत्मकथन : फिरत्या चाकावरती
- भूक आणि शिक्षणाच्या ध्यासातून निपजलेले आत्मकथन : तारांबळ
- डवरी गोसावी समाजाच्या वेदनेची संघर्षगाथा : झोळी
- उपासमार आणि मातृप्रेमाने भारावलेले आत्मकथन : याडी