Prashant Publications

My Account

सुलभ भाषाविज्ञान व मराठी व्याकरण

Authors: 

ISBN:

SKU: 9789385019517
Marathi Title: Sulabh Bhashavidnyan V Marathi Vyakaran
Book Language: Marathi
Published Years: 2016
Edition: First

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

सुलभ भाषाविज्ञान आणि मराठी व्याकरण हा ग्रंथ महाराष्ट्रातल्या सर्वच विद्यापीठातल्या भाषाविज्ञानाच्या अभ्यासकाला आणि विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरणारा आहे. भाषेच्या, भाषाविज्ञानातील विविध संकल्पना लक्षात घेण्यासाठी हा ग्रंथ उपयोगी पडणारा आहे. भाषानिर्मिती प्रक्रिया, स्वनांचे वर्गीकरण, स्वन-स्वनिम्-स्वानांतर, रुपिका-रुपिम-रुपिकांतर, वाक्य विश्लेषण, अर्थप्रक्रिया, शब्दअर्थ संबंध, जागतिक भाषांचे वर्गीकरणाची तत्वे, कुल संकल्पना, आंतर बर्हिवर्तुळ सिद्धांत, भाषिकभेद, मराठी उत्पत्तीचे सिद्धांत, उत्पत्ती विषयक वाद, भाषाविज्ञानातील विविध शाखा, प्रवाह, आंतरविद्याक्षेत्र, स्वरुप या सर्व संकल्पनाची सुटसुटीत व्यवस्थित व सुबोध मांडणी करणारा ग्रंथ आहे. सर्व संकल्पना परिचय करुन घेण्यासाठी उपयुक्त ठरणारा हा ग्रंथ आहे.
त्याचप्रमाणे मराठी व्याकरणातील मूलभूत संकल्पना विशद करणारा, वर्ण, शब्द, शब्दांच्या जाती, विभक्ती प्रत्यय साधक प्रत्यय, विकारी अविकारी, आरकांत प्रत्यय, त्या संदर्भातील विविध वाद त्याचे स्वरुप, वाक्य, वाक्याचे प्रकार, वाक्य संश्लेषण, वाक्य विश्लेषण, समास, प्रयोग व्यवस्था, काळ-अर्थ यांच्या अनुषंगाने होणारे वाक्याचे प्रकार, भाषावैभव प्राप्त करुन देणारे वाक्प्रचार, म्हणी वगैरे घटकांची सविस्तर व सुलभ परिचय करुन देणारा हा ग्रंथ पदवी व पदव्युत्तर वर्गातील विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा देणार्‍यांना अत्यंत उपयुक्त ठरेल यात शंका नाही.

  1. भाषेचे स्वरूप व कार्य : 1.1 भाषा : अर्थ, व्याख्या, 1.2 भाषेचे प्रकार, 1.3 भाषेची वैशिष्ट्ये, 1.4 भाषेचे कार्य : संज्ञापन किंवा संदेशन, 1.5 संकेत : भाषेचा आधार, 1.6 भाषा ही शारिरीक आणि मानसिक क्रियांचा संयोग, 1.7 ध्वनिसंकेत : चिन्ह आणि चिन्हित, 1.8 संज्ञापनाची साधने, 1.9 भाषा हे सर्वश्रेष्ठ संज्ञापन साधन, 1.10 संज्ञापनातील क्रिया-प्रतिक्रिया, 1.11 मानवेत्तर प्राण्याची भाषा
  2. स्वनविज्ञान आणि स्वनिम संकल्पना : 2.1 स्वन, स्वनविज्ञान, स्वनविज्ञानाच्या शाखा, 2.2 वागिद्रियांची रचना व कार्ये, 2.3 स्वननिर्मितीची प्रक्रिया, 2.4 स्वनांचे वर्गीकरण, 2.5 स्वनिम विचार, 2.6 स्वनिक परिसर, 2.7 स्वनिम संकल्पना, 2.8 स्वनिम निश्चितीचे तत्त्वे, 2.9 स्वनिमांचे प्रकार
  3. रूपिम विन्यास : 3.1 रूप संकल्पना, 3.2 रूपिका, 3.4 रूपिम, 3.5 रूपिकांतर, 3.6 धातू
  4. वाक्य विन्यास व अर्थ विन्यास : 4.1 वाक्यविन्यास संकल्पना, 4.2 प्रथमोपस्थित संघटक पध्दती, 4.3 वाक्याचे घटक, 4.4 अर्थविन्यास, 4.5 अर्थ व्याख्या, 4.6 अर्थाचे प्रकार, 4.7 अर्थक्षेत्र संकल्पना
  5. भाषाकुल संकल्पना : 5.1 ऐतिहासिक भाषाभ्यास पध्दती, 5.2 भाषाकुल संकल्पना, 5.3 भाषा वर्गीकरणाची तत्वे, 5.4 आकृतिमुलक वर्गीकरण किंवा प्ररूपात्मक वर्गीकरण, 5.5 वांशिक वर्गीकरण, 5.5 होर्न्ले यांचा आंतर-बहिर्वर्तुळ सिद्धांत
  6. मराठी भाषेची उत्पत्ती : 6.1 भाषेची उत्पत्ती, 6.2 मराठी भाषेच्या उत्पत्तीची साधने, 6.3 वैद्य गुणे वाद, 6.4 मराठीचे कालिक भेद, 6.5 मराठीतील कालखंडाची संकल्पना
  7. मराठी व्याकरणाचे स्वरूप व उपयुक्तत्ता : 7.1 व्याकरणाची व्याख्या, 7.2 व्याकरणाच्या अभ्यासाचे स्वरूप, 7.3 व्याकरणाचे कार्य, 7.4 व्याकरणाचा अभ्यास विषय, 7.5 मराठी भाषेची व्याकरण व्यवस्था, 7.6 मराठीची वर्णमाला, 7.7 व्याकरणाची उपयुक्तता
  8. शब्दांच्या जाती व उपयोजन : 8.1 शब्द : संज्ञा, 8.2 शब्दांचे वर्गीकरण (शब्दजाती), 8.3 शब्दाचे प्रकार, 8.4 विभक्ती ः प्रकार आणि प्रत्यय, 8.5 लिंगविकार, 8.6 वचनविकार, 8.7 प्रयोगविचार
  9. अर्थ व काळ वाक्याचे प्रकार : 9.1 काळ, 9.2 अर्थ, 9.3 आख्यात व्यवस्था, 9.4 वाक्य, 9.5 वाक्याचे प्रकार
  10. भाषिक वैभवाचे घटक : 10.1 समास, 10.2 वाक्यप्रचार आणि म्हणी
RELATED PRODUCTS
You're viewing: सुलभ भाषाविज्ञान व मराठी व्याकरण 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close