सुलवान
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘सुलवान’ ही मेघा पाटील यांची माणदेशी कादंबरी. स्त्रीचा विविध पातळीवरचा संघर्ष नेमकेपणाने मांडणारी. बिगर भरवशाच्या शेतीतून वाट्याला आलेल्या संकटाची आवर्तने सुखी जीवनाची स्वप्ने अधुरी ठेवतात. अभावग्रस्त माणदेशी माणूस, पशुजन्य संस्कृतीमध्ये चित्रित होते. स्त्रीच्या जीवन विश्वाला कवेत घेते. माणूस, शेती, परिसर आणि राहणीमान याला माणदेशीपणाचा रंग, गंध आणि एक वेगळा बाज असल्याचे निवेदनातून स्पष्ट होते.
स्त्री संघर्ष, तिचे मोडून पडणे, पुन्हा नव्याने उभे राहणे. ही वहिवाट जपणाऱ्या स्त्रिया ग्रामीण संस्कृतीचा आधार आहेत. ग्रामीणत्व संघर्षवत असल्याने भक्ती, अध्यात्म, शक्ती, संघर्ष, भावविवशता कादंबरीच्या कथनात आहे. वढाताण, इळभर, राखुळीनं, डोस्कं, हुबलाकावाणी, आडमुठ्या, जीव मेटाकुटीला येणे, मुरडान, कुसळं असे शब्दभांडार माणदेशी भाषेचे वैभव समृद्ध करणारे आहेत.
समाजचित्र आणि भाषाविश्व यातून माणदेशी जीवनशैली अगदी बारकाव्यांनिशी उभी राहते. एकंदरीत शेळ्या, मेंढर, कोंबड्या, बैल, पशुपक्षी यासह स्त्री जीवनाचे माणदेशाची भाषा आणि भू-सांस्कृतिक पटलावर चित्रण करणारी ‘सुलवान’ ही कादंबरी मराठी साहित्य परंपरेत एक नवी वाट निर्माण करेल.
– डॉ. सतेज दणाणे
Sulwan