सूक्ष्म अर्थशास्त्र
Macro Economics
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
आधुनिक काळात अर्थशास्त्राचा खूपच विकास झालेला आहे. त्यामुळे अर्थशास्त्रात असंख्य गोष्टींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते. उदा. अर्थशास्त्रात वेतन, व्याज, खंड, नफा, मागणी, पुरवठा, उद्योगसंस्था, एखाद्या वस्तूची किंमत निश्चिती, देशातील किंमत पातही, बेकारी, रोजगार, राष्ट्रीय उत्पन्न, लोकसंख्या अशा असंख्य बाबींची चर्चा किंवा विश्लेषण केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील लहानात लहान भागाची किंवा घटकांची चर्चा केली जाते. म्हणजेच अर्थव्यवस्थेत जे अनेक घटक असतात त्यापैकी एखाद्या विशिष्ट किंवा व्यक्तिगत घटकांची चर्चा सूक्ष्म अर्थशास्त्रात केली जाते. अर्थव्यवस्थेत उत्पादन, विभाजन, विनिमय, उपभोग या चार आर्थिक क्रिया चालतात. या चार आर्थिक क्रिया पार पाडतांना प्रत्येक व्यक्ती उत्पादक किंवा उत्पादन घटक आणि उपभोक्ता या दुहेरी भूमिका पार पाडते. दुहेरी भूमिका पार पाडतांना त्याची जी वर्तवणूक असते तिचा सूक्ष्म पातळीवर व व्यक्तीगत पातळीवर अध्ययन सूक्ष्म अर्थशास्त्रात केले जाते. सूक्ष्म अर्थशास्त्राला अंशलक्ष्यी अर्थशास्त्र असेही म्हणतात.
प्रस्तुत पुस्तकात सूक्ष्म अर्थशास्त्राचे सिद्धांत, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त बाजार, अल्पाधिकार बाजार तसेच खंड, वेतन, व्याज व नफा या घटकांच्या मोबदल्याची सखोल व विस्तृत मांडणी केलेली आहे.
Sukshama Arthashastra
- सूक्ष्म अर्थशास्त्रःकाही मूलभूत संकल्पना : 1.1 सूक्ष्म अर्थशास्त्र – व्याख्या व अर्थ, स्वरुप, महत्व आणि उपयोग, मर्यादा. 1.2 बाजार यंत्रणा 1.3 फलनात्मक संबंधाची संकल्पना 1.4. उद्योगसंस्था.
- मागणी विश्लेषण : 2.1 मागणीचा अर्थ आणि व्याख्या. 2.2 मागणीचा नियम 2.3 मागणीची लवचिकता 2.4 मागणीची लवचिकता ठरविणारे घटक. 2.5 मागणीच्या लवचिकतेचे महत्व 2.6 मागणीचा पूर्व अंदाज.
- पुरवठा विश्लेषण : 3.1 अर्थ व व्याख्या, स्वरुप 3.2 पुरवठ्याचा नियम 3.3 पुरवठ्यातील बदल आणि परिवर्तन 3.4 पुरवठ्याची लवचिकता 3.5 पुरवठ्याची लवचिकता ठरविणारे घटक.
- समवृत्ती वक्र विश्लेषण : 4.1 अर्थ व व्याख्या, समवृत्तीपत्रक 4.2 समवृत्ती वक्राचे गुणधर्म किंवा वैशिष्ट्ये 4.3 समवृत्तीवक्राचा नकाशा 4.4 अंदाजपत्रक रेषा 4.5 उपभोक्त्याचे संतुलन किंवा समतोल 4.6 उत्पन्न, पर्यायता, व किंमत परिणाम 4.7 सीमांत पर्यायता दर 4.8 समवृत्तीवक्राचे महत्व (उपयोग), दोष.
- उत्पादनाचे सिध्दांत : 5.1 उत्पादन फलन 5.2 बदलत्या प्रमाणाचा नियम/सिध्दांत 5.3 प्रमाणफलाचा (उत्पादनमान) नियम. 5.4 प्रमाणाच्या बचती, अंतर्गत व बर्हिगत बचती
- उत्पादन खर्च विश्लेषण : 6.1 उत्पादनाचे खर्च 6.2 लेखांतर्गत आणि आर्थिक खर्च 6.3 संधी त्याग खर्च किंवा वैकल्पिक खर्च 6.4 खाजगी खर्च आणि सामाजिक खर्च 6.5 अल्पकालीन खर्च 6.6 दिर्घकालीन खर्च आणि दिर्घकालीन खर्चवक्र 6.7 ण आकाराचा आणि ङ आकाराचा खर्च वक्र 6.8 अल्पकालीन खर्च वक्र आणि दिर्घकालीन खर्च वक्र यांच्यातील संबंध.
- बाजार, उत्पन्न आणि समतोलाची स्थिती : 7.1 बाजार संकल्पना 7.2 स्पर्धेच्या आधारावर बाजाराचे प्रकार 7.3 प्राप्ती संकल्पना 7.4 पूर्ण व अपूर्ण स्पर्धेत एकूण सरासरी व सीमांत प्राप्ती वक्रातील आलेखात्मक संबंध 7.5 व्यवसाय संस्थेचे उद्दिष्ट्ये 7.6 व्यवसाय संस्थेचे संतुलन.
- पूर्ण स्पर्धेचा बाजार : 8.1 पूर्ण स्पर्धा 8.2 पूर्ण स्पर्धेत व्यवसाय संस्थेचे व उद्योगाचे अल्पकालीन संतुलन 8.3 पूर्ण स्पर्धेत व्यवसाय संस्थेचे व उद्योगाचे दीर्घकालीन संतुलन.
- मक्तेदारी बाजार : 9.1 मक्तेदारी बाजार 9.2 मक्तेदारीत मुल्य व उत्पादनाचे अल्पकालीन संतुलन 9.3 मक्तेदारीत मूल्य व उत्पादनाचे दीर्घकालीन संतुलन 9.4 मूल्य विभेदन.
- मक्तेदारीयुक्त स्पर्धेेचा बाजार : 10.1 मक्तेदारीयुक्त स्पर्धा 10.2 मक्तेदारीयुक्त स्पर्धेत व्यवसाय संस्था व समूहाच्या किंमत व उत्पादनाचे अल्पकालीन संतुलन 10.3 मक्तेदारी युक्त स्पर्धेत व्यवसाय संस्था व समूहाच्या किंमत व उत्पादनाचे दीर्घकालीन संतुलन 10.4 मक्तेदारीयुक्त स्पर्धेतील विक्री खर्च आणि वस्तूभेद
- अल्पाधिकार व द्वयाधिकारी स्पर्धेेचा बाजार : 11.1 अल्पाधिकारी बाजार 11.2 अल्पाधिकारी व द्वयाधिकारी बाजाराच्या पर्यायांचे 11.3 अल्पाधिकाराचे किंमत नेतृत्व प्रतिमान 11.4 द्वयाधिकारी बाजारे 11.5 किंमत-बिगर किंमत स्पर्धा आणि स्पर्धात्मक बाजार संकल्पना
- उत्पादन घटकांचा बाजार: 12.1 घटक बाजार : उत्पादन घटकांची मागणी व पुरवठा 12.2 स्पर्धात्मक घटक बाजाराचे संतुलन 12.3 घटकांचे मोबदले 12.4 मजुरी 12.5 व्याजदर 12.6 नफा