सौंदर्योपचार
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
‘सुंदरता’ ही मानवी मनाची, भावनेची आणि त्याच्या संवेदनशीलतेची प्रतिक्रिया असते. शरीराच्या निरोगी अवस्थेत मनाची आनंददायीवृत्ती दडलेली असते. मन चांगलं तर शरीरही चांगलं असं मानले जाते. इंद्रियांच्या संवेदनशीलतेतून सत्य-शिव आणि सुंदराची अनुभूती ही मानवी भावनेची अनुभूतीनिष्ठता असते. म्हणून सुंदरतेची व्याख्या ही मानसिक, भावनिक आणि त्यानंतरच्या सर्जनशीलवृत्तीच्या स्थितीवर अवलंबून असते. रंग, रूप, गंध, नाद-स्पर्शात्मक भावनांच्या आनंदनिधान वृत्तीचा प्रभाव हा सुंदरतेच्या आकलनाचा एक अविभाज्य भाग असतो. त्यातूनच आरोग्यशास्त्र, सौंदर्यशास्त्र, रसशास्त्र आणि आयुर्वेदादि पॅथींचा संदर्भ निर्माण होतो. “शरीरं आद्यं खलु धर्म साधनम्” असं म्हटलं जाते.
सौंदर्य आणि प्रसाधने, सौंदर्य आणि उपचार, सौंदर्य आणि व्यक्तिमत्व, सौंदर्य आणि जीवनानंद इत्यादी बाबतचे हे संग्रहित-एकत्रित विचारांचे मार्गदर्शन लेखक मोठ्या कौशल्याने प्रस्तुत ग्रंथात करतात. ‘एकनूर आदमी तो दसनूर कपडा’ अशी एक म्हण आहे. तसेच माणसाचा ‘नूर’ बदलवून टाकणारे सौंदर्य-प्रसाधन व उपचार पद्धतीचे हे प्रशिक्षण व प्रबोधन करणारे पुस्तक वाचकांना निश्चितच आवडेल असे झाले आहे. आज ‘ब्युटीपार्लर’ आणि ‘ब्युटीशिअन’ हा मानवी जीवनाच्या सुंदरतेच्या प्रवासातला अविभाज्य भाग झाला आहे. ती भावनिक, मानसिक भूक आहे. म्हणून जाणीव जागृती करणारे ‘सौंदर्यापचार’ हे पुस्तक नव्या पिढीस वरदान ठरेल अशी आशा वाटते. बालकवींनी आपल्या एका निसर्ग कवितेत म्हटले आहे “सुंदरतेच्या सुमनावरचे दंव चुंबुनी घ्यावे.” या ओळीचा ऐहिक, लौकिक, आध्यात्मिक तसेच सौंदर्यशास्त्रीय विचार ‘सौंदर्योपचार’ ग्रंथातून वेगळ्या अर्थाने प्रतीत होतो.
Soundaryshastra
1) सौंदर्य, 2) त्वचा/कांती, 3) चेहरा, 4) हास्य, 5) डोळे/नयन, 6) ओठ/अधर, 7) गाल, 8) दात, 9) केश, 10) मान व गळा, 11) नाक, 12) कान/कर्ण, 13) हात/कर, 14) नखे, 15) वक्ष/उरोज, 16) पाय, 17) कमनीय बांधा, 18) मसाज/मालिश, 19) स्नान, 20) वस्त्रालंकार, 21) अलंकार, 22) सुगंधी सौंदर्य, 23) प्रसाधन किमया