स्त्रीवादी कविता आस्वाद आणि समीक्षा
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
स्त्रीवादी साहित्याचा उदय पुरुषप्रधान संस्कृतीच्या कडेलोटातून झाला आहे. त्यामुळे तो मराठी माणसाला आणि मराठी साहित्याला टाळता येणार नाही. उलट स्त्री जाणीव आता मानवकल्याणाकडे झेपावते आहे. आपल्या आग्रही भूमिकेतून सृजन, पोषण, संवर्धन, परस्पर सहकार्य यांचा एक वेगळा दृष्टिकोन मांडते आहे. जर त्याचा अंगिकार आपल्या समाजाने केला तर निश्चितच बदल घडून येईल. कारण हिंसा, द्वेष, आक्रमकता, संकुचित स्वार्थ ह्या विनाशकारी वृत्तीशी स्त्री-शक्ती लढा देते आहे. त्यामुळेच अशावेळी खेड्यापाड्यातील स्त्रियांचे आतून आलेले हुंकार ऐकणे, समजून घेणे आवश्यक आहे. खेड्यापाड्यातून शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत, आणि त्यांच्या विधवा स्त्रिया नव्याने संघर्ष करोत लढत आहेत. आपले जगणे सावरण्यासाठी, सुधारण्यासाठी, परिस्थितीशी दोन हात करीत आहेत. रुढी व परंपरेच्या गुलामगिरीतून मुक्त होऊ पाहत आहेत. खचून न जाता कुटुंब व समाजाने लादलेल्या क्लेशदायक अनिष्ट सांस्कृतिक बेड्या तोडू पाहत आहेत. अशा स्त्रियांचा शोध घेऊन त्यांच्या जीवनगाथा समाजापुढे आपणण्याचे नवे आव्हान स्त्रीवादी साहित्यापुढे आहे. डॉ. मारोती कोल्हे यांनी स्त्रीवादी कवितेवरील केलेल्या संपादनाने या नव्या साहित्य प्रवाहास पुष्टी प्रदान केली आहे. हे स्तुत्य आहे.
– प्राचार्य डॉ. प्रतिमा इंगोले, दर्यापूर जि. अमरावती
Strivadi Kavita Aaswad Ani Samiksha
- स्त्रीवादी समीक्षा – प्रा. डॉ. संगीता घुगे
- ‘तहहयात’ स्त्रीवादी कवितेचा सशक्त आवाज – डॉ. मथु सावंत
- स्त्री अस्तित्त्वाचे शिल्प कोरणारी कविता:अस्तित्त्वाचा अजिंठा कोरताना – डॉ. संतोष हंकारे
- भारतीय स्त्रीवादाचे तत्त्वज्ञान सांगणारी विद्रोही कविता:शिर:स्नाता – डॉ. मारोती कसाब
- स्त्री भावनेचा हुंकार – डॉ. मारोती कोल्हे
- ‘वाताहतीची कैफियत’ मधील स्त्रीवादी भूमिकेचे वेगळेपण – डॉ. शत्रुघ्न जाधव
- नीरजा यांच्या काळातील स्त्रीवादी जाणीव – डॉ. शिवसांब कापसे
- स्त्रीवादी साहित्य स्वरुप व आस्वाद – प्रा. डॉ. ज्ञानदेव राऊत
- स्त्रीवादी कवितेच्या पाऊलखुणा – डॉ. संगीता पैकेकरी
- मराठी स्त्रीवादी साहित्याची वाटचाल – डॉ. मंगेश अटकोरे
- स्त्री दुःखाचा उत्कट उद्गार म्हणजे ‘वेदन’ – प्रा. संगीता मुंढे
- आदिवासी कवितेतील स्त्रीवादी दृष्टिकोन – प्रा. नवनाथ बेंडे
- कविता महाजन यांच्या कवितेतील स्त्री जीवन – सौ. सविता सिदगोंडा बिरगे