स्थूल अर्थशास्त्र
Macro Economics
Authors:
ISBN:
₹275.00
- DESCRIPTION
- INDEX
अर्थशास्त्रात मुलभूत आर्थिक प्रश्न आणि ते सोडविण्यासाठी करण्यात येणार्या मानवी प्रयत्नांचा वा वर्तवणूकीचा अभ्यास केला जातो. अर्थशास्त्र हे एक शास्त्र असले तरी अर्थशास्त्राचा अभ्यास स्थूलमानाने दोन भागात विभागता येतो. सूक्ष्म अर्थशास्त्र आणि स्थूल अर्थशास्त्र असे दोन भागात स्थूल अर्थशास्त्राचा उल्लेख सर्वप्रथम रॅग्नर फ्रिश यांनी 1933 मध्ये केला असला तरी अर्थशास्त्रात ही संकल्पना माहितच नव्हती असे नाही. स्थूल अर्थशास्त्राला साकलिक अर्थशास्त्र, समष्टी अर्थशास्त्र, समग्रलक्षी अर्थशास्त्र असे पर्यायी शब्द वापरले गेलेले आहे. 1929-30 मध्ये उद्भवलेला जागतिक महामंदीनंतर स्थूल अर्थशास्त्राचा विकास मोठ्या प्रमाणात झाला. केन्स यांनी नवा दृष्टीकोन स्वीकारून स्थूल अर्थशास्त्राचा पुरस्कार केला. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्था किंवा एकूण सर्व घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाते. स्थूल अर्थशास्त्राला उत्पन्न व रोजगार या नावाने देखील ओळखले जाते. स्थूल अर्थशास्त्राचा विकास जागतिक महामंदीनंतर झालेला असला तरी यापूर्वी देखील अर्थशास्त्रज्ञांना स्थूल अर्थशास्त्राची कल्पना होती. केन्सबरोबरच वालरस, फिशर, विकसेल आणि शुंपीटर या अर्थशास्त्रज्ञाचे स्थूल अर्थशास्त्राच्या विकासात महत्वाचे योगदान आहे. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्था किंवा एकूण सर्व घटकांवर लक्ष केंद्रीत केले जाते. स्थूल अर्थशास्त्र ही आर्थिक विश्लेषणाची अशी एक शाखा आहे की जी सर्व घटकांचा एकत्रित विचार करते. स्थूल अर्थशास्त्रात संपूर्ण आर्थिक व्यवस्थेचा अभ्यास केला जातो. स्थूल अर्थशास्त्रात सर्वच घटकांचा एकत्रित मिळून अभ्यास करणे व सुटसुटीत विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला जातो.
Sthul Arthashastra
- स्थुल अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 प्रास्ताविक, 1.2 स्थूल अर्थशास्त्र, 1.3 स्थूल अर्थशास्त्राचे स्वरूप, 1.4 स्थूल अर्थशास्त्राची व्याप्ती, 1.5 स्थूल अर्थशास्त्राचे महत्त्व, 1.6 स्थूल अर्थशास्त्राच्या मर्यादा, 1.7 सूक्ष्म व स्थूल अर्थशास्त्रातील फरक
- राष्ट्रीय उत्पन्न : 2.1 प्रास्ताविक, 2.2 राष्ट्रीय उत्पन्नाच्या संकल्पना, 2.3 राष्ट्रीय उत्पन्न मापनाच्या पद्धती, 2.4 राष्ट्रीय उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह
- उत्पादन आणि रोजगार : 3.1 प्रास्ताविक, 3.2 रोजगारासंबंधी सनातनवादी सिद्धांत, 3.3 प्रा. केन्स यांचा रोजगार विषयक सिद्धांत, 3.4 प्रभावी मागणीचे तत्व, 3.5 अपूर्ण व पूर्ण रोजगार पातळी समतोल
- उपभोग आणि गुंतवणूक : 4.1 प्रास्ताविक, 4.2 बचत फलन, 4.3 उत्पादन फलनाचे निर्धारक घटक, 4.4 संकल्पना, 4.5 गुंतवणूक फलन, 4.6 भांडवलाची सिमांत लाभक्षमता, 4.7 भांडवलाच्या सिमांत लाभक्षमतेचा गुंतवणूकीशी संबंध, 4.8 गुंतवणूक आणि व्याजाच्या दराचा संबंध, 4.9 गुणक, 4.10 गुणकाची कार्यपद्धती, 4.11 गुणकामधील गळती, 4.12 प्रवेग तत्व
- पैसा आणि बँका : 5.1 प्रास्ताविक, 5.2 पैशाची उत्क्रांती, 5.3 भारतीय मध्यवर्ती बँकेचे पैशाचे मापन, 5.4 व्यापारी बँकेची पतनिर्मिती, 5.5 संकल्पना
- पैशाची मागणी : 6.1 प्रास्ताविक, 6.2 पैशाच्या मागणीबाबतचा सनातनवादी दृष्टीकोन, 6.3 पैशाच्या मागणीबाबतचा आधुनिक दृष्टीकोन, 6.4 फिशरचा दृष्टीकोन, 6.5 केंब्रिज अर्थशास्त्रज्ञाचा रोख शिल्लक दृष्टीकोन
- स्थूल आर्थिक समस्या : 7.1 प्रास्ताविक, 7.2 व्यापारचक्राचा अर्थ व व्याख्या, 7.3 व्यापार चक्राची वैशिष्ट्ये, 7.4 व्यापार चक्राच्या अवस्था, 7.5 चलनवाढ, 7.6 मागणीजन्य व खर्चजन्य चलनवाढ, 7.7 चलनवाढीची कारणे, 7.8 चलनवाढीचे परिणाम, 7.9 चलनवाढकारक अंतर, 7.10 चलनघटकारक अंतर, 7.11 चलनघट, 7.12 चलनफुगवटा
- स्थूल आर्थिक धोरणे : 8.1 प्रास्ताविक, 8.2 स्थूल आर्थिक धोरणाची उद्दिष्ट्ये, 8.3 फिलिप्स वक्र, 8.4 पूरवठ्याच्या बाजुचे अर्थशास्त्र, 8.5 लॉफर वक्र, 8.6 पूरवठा बाजुच्या अर्थशास्त्रावरील टिका