स्थूल अर्थशास्त्र
Macro Economics
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
स्थूल अर्थशास्त्र म्हणजे देशातील किंवा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवर विचार करणारे अर्थशास्त्र होय. या अर्थशास्त्रात अर्थव्यवस्थेतील विशिष्ट घटकाचा अभ्यास न करता संपूर्ण अर्थव्यवस्थेच्या दृष्टीकोनातून अभ्यास केला जातो. या शास्त्राच्या शाखेत एकूण रोजगार, एकूण राष्ट्रीय उत्पादन, एकूण उत्पादन पातळी, एकूण मागणी, एकूण पुरवठा यांचा अर्थव्यवस्थेतील एकूण पातळीवरचा अभ्यास केला जातो.
सदरील पुस्तकात स्थूल पातळीवरील उत्पन्न, उत्पादन, रोजगार, मागणी, पुरवठा, बचत, गुंतवणूक पैसा, आंतरराष्ट्रीय व्यापार, विनिमय दर इ. बाबींची सखोल व विस्तृत मांडणी तसेच स्थूल स्वरुपाच्या आर्थिक समस्या, स्थूल अर्थशास्त्रातील सिद्धांत, विविध संकल्पना, पैशाची मागणी, पुरवठा उत्पादन, रोजगार, सामान्य किंमत पातळी इ. घटकातील संबंध व संतुलन तसेच या सर्व समग्रावर परिणाम व त्यांच्यात बदल घडवून आणण्यास जबाबदार असणारे सर्व घटक सर्वांना सहज समजतील अशा पद्धतीची मांडणी अत्यंत सोप्या व सुटसुटीत भाषेत केलेली आहे.
Sthul Arthashastra
- स्थूल अर्थशास्त्राचा परिचय : 1.1 स्थूल अर्थशास्त्र, 1.2 स्थूल अर्थशास्त्राचा विकास; 1.3 स्थूल अर्थशास्त्राच्या संकल्पना, 1.4 खुल्या अर्थव्यवस्थेत उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह
- स्थूल अर्थशास्त्राचा सनातन दृष्टीकोन : 2.1 पूर्ण रोजगार आणि बेरोजगारी/बेकारी, 2.2 किंमत आणि वेतनदरातील ताठरता आणि लवचिकता, 2.3 बचत, गुंतवणूक आणि व्याजदर
- उत्पादन आणि रोजगाराचे सनातन सिद्धांत : 3.1 ‘से’चा बाजारविषयक नियम, 3.2 सनातन सिध्दांताचे सूचितार्थ (ध्वनितार्थ), 3.3 ‘से’च्या बाजार नियमावर केन्सची टिका
- केन्सचा आधुनिक सिद्धांत : 4.1 प्रभावी मागणीचे तत्व, 4.2 पूर्ण व अपूर्ण रोजगारातील समतोल, 4.3 प्रभावी मागणीचे तत्व आणि अपुर्ण रोजगार पुर्ण रोजगार आणि राष्ट्रीय उत्पन्न पातळी, 4.4 चलन विस्तारक आणि चलन संकोचात्मक अंतर, 4.5 द्विक्षेत्रीय अर्थव्यवस्थेतील बचत व गुंतवणूक विश्लेषण, 4.6 बचतीचा विरोधाभास
- गुंतवणूक गुणक : 5.1 गुणकाची संकल्पना, 5.2 उपभोग व बचत फलन, 5.3 केन्सचा उपभोगविषयक सिद्धांत
- गुंतवणूक फलन : 6.1 गुंतवणूक फलन- अर्थ, 6.2 गुंतवणुकीचे विविध प्रकार (संकल्पना), 6.3 भांडवलाची सीमांत लाभक्षमता व व्याजदर
- पैशाची मागणी व पुरवठा : 7.1 पैशाचा अर्थ, व्याख्या; पैशाची कार्ये, 7.2 पैशाचा पुरवठा, 7.3 पैशाचा पुरवठा आणि व्यापारी बँकांची भूमिका, 7.4 पैशाचा पुरवठा : पतनियंत्रणाची साधने, 7.5 व्यापारी बँकांची पतनिर्मितीची प्रक्रिया
- पैशाची मागणी : 8.1 अर्थ, 8.2 पैशाच्या मागणीचे निर्धारक, 8.3 पैशाच्या मागणीचे विविध हेतू, 8.4 फिशरचा चलनसंख्यामान सिद्धांत, 8.5 केन्सचा रोकडप्राधान्य सिद्धांत
- आर्थिक समस्या : 9.1 चलनवाढ किंवा भाववाढ, 9.2 बेरोजगारी, 9.3 फिलीप्स वक्र विश्लेषण, 9.4 व्यापार चक्र
- पुरवठ्याचे अर्थशास्त्र : 10.1 पुरवठ्याच्या बाजूचे अर्थशास्त्र, 10.2 पुरवठ्याच्या बाजूच्या अर्थशास्त्राची मध्यवर्ती कल्पना, 10.3 लॅफर वक्र, 10.4 टिकात्मक मूल्यमापन
- आंतरराष्ट्रीय व्यापार : 11.1 अंतर्गत व्यापार व आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य व फरक, 11.2 व्यवहारतोल – व्यापारतोल व व्यवहारतोलाच्या संकल्पना
- विनिमय दर : 12.1 विनिमय दर, 12.2 खुल्या व्यापाराच्या धोरण, 12.3 भारतीय रूपयाची चालू खात्यावरील परिवर्तनीयता