स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास (1947-1991)
India After Independence (1947-1991)
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
भारताला स्वातंत्र्य मिळाले पण ते अनेक समस्या घेऊन आले. भारताची फाळण्ाी झाली. हजारो निर्वासितांचा प्रश्न निर्माण झाला. जाणारे कमी आणि येणारे जास्त. अन्नधान्याच्या दृष्टीने सुपीक प्रदेश पाकिस्तानमध्ये गेला. अन्नधान्याचा तुटवडा भासू लागला. अर्थव्यवस्था कोणत्या पद्धतीची स्वीकारावी. याबाबत चर्चा होऊन मिश्र अर्थव्यवस्था भारताने स्वीकारावी. दारिद्य्र, बेकारी, औद्योगिकीकरण, दळणवळण, ऊर्जा, बँकिंग व्यवसाय, कृषी जीवन यांत सुधारणा करणे आवश्यक होते. यांतून पंचवार्षिक योजनांचे नियोजन आले. ते बिघडविण्यासाठी आणि भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्यासाठी चीन आणि पाकिस्तानने भारताला युद्धाच्या खाईत लोटले. पंचवार्षिक योजनेचा तोल बिघडला. त्यांतून भारताने मार्ग काढून शांतता, सहकार्य आणि आंतरराष्ट्रीय मैत्री याचा स्वीकार केला. प्रारंभी परराष्ट्रीय धोरणात पंचशील तत्त्वांचा उद्घोष करून अलिप्ततेचे धोरण स्वीकारले. पंतप्रधान पी.व्ही.नरसिंहराव यांच्या काळात जागतिकीकरणाचा मार्ग स्वीकारून भारताने वाटचाल सुरू केली. या साऱ्या स्वातंत्र्योत्तर घटनांची गाथा म्हणजे स्वातंत्र्योत्तर भारताचा इतिहास हा ग्रंथ आहे.
Swatantrottar Bharatacha Itihas (1947-1991)
- स्वातंत्र्योत्तर भारतापुढील आव्हाने : अ) फाळणीचे झालेले परिणाम, ब) भारतीय संस्थानिकांचे विलीनीकरण, क) पोर्तुगीज व फ्रेंच वसाहतींचे भारतात विलीनीकरण, ड) भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये, इ) राज्यांची भाषावार पुर्नरचना.
- भारताचे परराष्ट्रीय धोरण : अ) अलिप्ततावादी चळवळ, ब) भारत-पाक संबंध आणि बांगला देश निर्मिती, क) भारत-चीन संबंध आणि पंचशील, ड) भारत-श्रीलंका संबंध.
- देशांतर्गत धोरण : अ) हिंदु कोड बिल, ब) आणीबाणी, क) अवकाश संशोधन.
- आर्थिक धोरण : अ) भारताची मिश्र अर्थव्यवस्था आणि पंचवार्षिक योजना, ब) औद्योगिक विकास, क) चलनाचे विमुद्रीकरण, ड) खाजगीकरण.