स्वास्थ्यकारक मसाज
Healthy Massage
Authors:
ISBN:
₹125.00
- DESCRIPTION
- INDEX
वैश्विक शक्तीने संपन्न आणि निसर्गोपचाराच्या अधिपत्याखालील स्वास्थकारक मसाजने शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक विकासाला सहाय्य होते. अतिशय सहज, सुलभ अणि खर्चिक नसलेल्या मसाज तंत्राचा अवलंब सर्वांनी करणे काळाची गरज आहे. स्वास्थकारक मसाजने शरिराचा योग्य पद्धतीने विकास होतो आणि कोणतेही दुष्परिणाम अनुभवास येत नाहीत.
समाजजीवनातील स्वास्थ्यासाठी, आरोग्यासाठी सहजपणे उपलब्ध असलेल्या दवाखान्यात प्रवेश करण्याची सहजासहजी इच्छा होत नाही. मसाजतंत्र स्वतःच अवगत केले आणि त्याचा योग्य तो उपयोग केला तर अनेक व्याधीपासून सुटका होते. त्यामुळेच आपल्या जवळच्या व्यक्तीच्या मदतीने ‘मसाज’कसा करता येईल? याचाही विचार होणे गरजेचे आहे.
नैसर्गिक चिकित्साशास्त्र म्हणूनच आयुर्वेदाचा अभ्यास केला जातो. प्राचीन भारतामध्ये याचा मोठ्या प्रमाणात विकास झालेला होता. आयुर्वेदामध्ये ज्या अनेक चिकित्सापद्धती आहेत त्यातीलच एक पद्धती म्हणजे मालिश होय.
Swasthyakarak Masaj
- निसर्गोपचार – मालिश
- मालिश/मसाज/मर्दन
- स्पर्श आणि मसाज
- मसाज/मर्दन प्रकार
- मालिश तंत्र आणि मंत्र
- रोगोपचारासाठी मालिश
- मसाज आणि अॅक्युप्रेशर
- रेकी