Prashant Publications

My Account

हवामानशास्त्र आणि सागरविज्ञान

Climatology and Oceanography

Authors: 

ISBN:

SKU: 9789384228316
Marathi Title: Havamanshastra Ani Sagarvidnyan
Book Language: Marathi
Published Years: 2014
Edition: First

250.00

  • DESCRIPTION
  • INDEX

पृथ्वीवरील सजीवसृष्टी, पर्यावरण आणि मानवीजीवनाची सुरक्षितता या दृष्टीकोनातून हवामानशास्त्र, अत्यधिक महत्त्वाचे शास्त्र आहे. पर्यावरणातील संपूर्ण हालचाली, भुपृष्ठावरील घडामोडी, अवकाशातील अस्थिरता, जलभागातील प्रदुषण, वादळ-वारे, पाऊस आणि जागतिक तापमानातील वाढ इत्यादी सर्व घटकांचा, संकल्पनांचा समावेश ‘हवामानशास्त्रात’ केलेला आहे. तसेच सागरीय भूस्वरूपे, सागरीजल गुणधर्म, सागरी जलाच्या हालचाली, सागरी किनारा महत्त्व इत्यादींचा समावेश सागरी विज्ञानात केलेला आहे. फक्त सजीवांचे संरक्षण म्हणून नव्हे तर त्यांची उत्पादनशीलता, राहणीमान, उद्योगधंदे, व्यवसाय यातील सुखकारकता यासाठी सुध्दा हवामानशास्त्र उपयोगी ठरले आहे.
मराठी भाषीय विद्यार्थ्यांच्या निरनिराळ्या अभ्यासक्रमासाठी, स्पर्धापरीक्षेसाठी, नेट सेटसाठी आणि विद्यापीठीय स्तरावरील संशोधनासाठी व मार्गदर्शनासाठी हे ‘हवामानशास्त्र’ व ‘सागरविज्ञान’ निश्चितपणे उपयुक्त आहे. ओझोनचा होणारा र्‍हास, ग्लोबलवार्मिग यासारख्या सतत भेडसावणार्‍या समस्यांच्या निराकरणासाठी मार्गदर्शक म्हणून हवामानशास्त्रातील संकल्पना उपयुक्त आहेत. सर्व विद्यापीठातील युवक युवतीसाठी अभ्यासक व शिक्षक मार्गदर्शनासाठी हे ‘हवामानशास्त्र’ व ‘सागरविज्ञान’ निश्चितपणे बहुगुणी आहे.

Havamanshastra Ani Sagarvidnyan

  1. हवामानशास्त्र आणि वातावरण परिचय : 1.1. हवामानशास्त्र- व्याख्या, व्याप्ती, हवामानशास्त्र व अन्यशास्त्रे, 1.2. आधुनिक काळातील हवामानशास्त्राचे महत्त्व, 1.3. हवा व हवामानाचे घटक, 1.4. वातावरण संघटना व रचना
  2. सूर्यप्रकाशन-उष्णता : 2.1. पृथ्वीवरील उष्णतेचा ताळेबंद, 2.2. तापमानावर परिणाम करणारे घटक, 2.3. तापमानाची विपरीतता, 2.4. ग्लोबल वार्मिंग
  3. वायुभार आणि वारे : 3.1. वायुदाब विरतण, 3.2. वायुभार पट्टे, 3.3. वायुभार उतार, 3.4. वारे प्रकार, 3.5. एल निनो व ला निनो
  4. वातावरणीय आर्द्रता व वृष्टी : 4.1. आर्द्रता, 4.2. सांद्रीभवन सामान्य रूपे, 4.3. ढग व ढगांचे प्रकार
  5. वातावरणीय प्रक्षोभ : 5.1. चक्रवात (आवर्त), 5.2. प्रत्यावर्त
  6. सागरविज्ञान : 6.1. व्याख्या, स्वरूप व व्याप्ती, 6.2 पृथ्वीवरील सागर विज्ञानाचे सहकार्य/खात्री
  7. सागरीय भूस्वरुपे : 7.1. सागर भूस्वरुपे, 7.2. प्रशांत महासागराची तळरचना
  8. सागरजल गुणधर्म : 8.1. सागरजल गुणधर्म- तापमान, क्षारता व घनत्व, 8.2. सागरजलाची क्षारता, 8.3. प्रादेशिक वितरण
  9. सागरी जलाच्या हालचाली : 9.1 सागरीजलाच्या हालचाली, 9.2. समुद्र प्रवाह, 9.3. सागरी प्रवाह अर्थ, कारणे व प्रकार, 9.4 सागरी प्रवाहाचे परिणाम, 9.5 भरती-ओहटी अर्थ, कारणे, प्रकार, 9.6 समतुल्यतेचा सिंध्दात
  10. सागर किनारा-महत्त्व : 10.1 सागर किनारी स्वरुप, 10.2 सागर संपत्ती
RELATED PRODUCTS
You're viewing: हवामानशास्त्र आणि सागरविज्ञान 250.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close