21 व्या शतकातील शिक्षण
Education in 21st Century
Authors:
ISBN:
₹425.00
- DESCRIPTION
- INDEX
21 व्या शतकातील शिक्षण हे सर्जनशीलता, चिकित्सक विचार, सहयोग, सहकार्य आणि संप्रेषण/संवाद यावर भर देणारे असून माहिती संप्रेषण तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात प्रचंड प्रगती झाल्यामुळे घरबसल्या विद्यार्थ्यांना खूप माहिती सहजगत्या उपलब्ध होते. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी परिणामकारक अध्ययन करण्याची गरज आहे आणि यासाठी अनेक कार्यनीती शिक्षकांनी वापरल्या पाहिजेत. एखादा विशिष्ट किंवा क्लिष्ट, अवघड विषय विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी शिक्षकाला विविध तंत्रे व कौशल्यांचे ज्ञान असावे. 21 व्या शतकातील कौशल्ये हि माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी आणि योग्य मार्गाने वापरण्यावर अधिक भर देतात. शिक्षकाला सुविधादाता आणि अध्ययनासाठी प्रेरणा देणारा बनून विद्यार्थ्यांना कार्यतत्पर व सक्षम करावे. बदलत्या काळानुरुप शिक्षकाने आपली भूमिकाही बदलावी.
प्रस्तुत पुस्तकातील माहिती ही नेमका आशय, अचूक, सोप्या भाषेत, मुद्देसूदपणे मांडलेली असून तज्ज्ञ व्यक्तींचे ग्रंथ व लेखांचीही मदत घेतली आहे, जेणेकरून अद्ययावत ज्ञानाचा फायदा सर्वांना होईल.
21 Vya Shatkatil Shikshan
- एक विद्याशाखा म्हणून शिक्षणशास्त्राचा सैद्धांतिक दृष्टिकोन : 1.1 विद्याशाखेचा अर्थ व संकल्पना, विद्याशाखांचे विविध दृष्टिकोन 1.2 विद्याशाखेची वैशिष्ट्ये 1.3 शिक्षणशास्त्र एक विद्याशाखा म्हणून समर्थन 1.4 विद्याशाखेचे निकष 1.5 विद्याशाखा/अभ्यासाचे क्षेत्र म्हणून शिक्षणशास्त्राचे चिकित्सक विश्लेषण- शिक्षणशास्त्राची उद्दिष्ट्ये, भारतात शिक्षक/ शिक्षण आणि शिक्षणाचा विकास 1.6 शिक्षणाची गुणवत्ता व उत्तमतेची संकल्पना- जीवनाच्या गुणवत्तेशी संबंध 1.6.1 शिक्षणातील गुणवत्तेची संकल्पना 1.6.2 शिक्षणातील उत्कृष्टतेची संकल्पना 1.6.3 शिक्षणातील गुणवत्ता व उत्कृष्टता यांचा जीवनातील गुणवत्तेशी संबंध 1.7 लोकशाही, धर्मनिरपेक्ष, समतावादी व मानवी समाजाच्या संदर्भात भारतीय शिक्षणाच्या उद्दिष्टांना/हेतूंना प्राधान्य 1.7.1 लोकशाही समाजाच्या संदर्भात भारतीय शिक्षणाच्या हेतूंना प्राधान्य 1.7.2 धर्मनिरपेक्ष समाजाच्या संदर्भात भारतीय शिक्षणाच्या हेतूंना प्राधान्य 1.7.3 समतावादी समाजाच्या संदर्भात भारतीय शिक्षणाच्या हेतूंना प्राधान्य 1.7.4 मानवी समाजाच्या संदर्भात भारतीय शिक्षणाच्या उद्दिष्टांना प्राधान्य 1.8 शालेय शिक्षण : समकालीन आव्हानेे
- शिक्षणशास्त्र हे एक आंतरविद्याशाखीय ज्ञान : 2.1 शिक्षणशास्त्राचे आंतरविद्याशाखीय स्वरुप 2.2 समाज आणि राष्ट्रासाठी आंतरविद्याशाखीय ज्ञान म्हणून शिक्षणशास्त्राची गरज 2.3 शिक्षण आणि त्यापुढील आव्हाने यात विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे योगदान 2.4 शिक्षणातील समस्यांची मूल्यमीमांसा, शिक्षणात शांतता आणि इतर मूल्ये, सौंदर्यमूल्य यांची भूमिका 2.5 राजकीय प्रक्रियेशी शिक्षणाचे गतिमान (गतीशील) संबंध.
- शिक्षणाच्या सामाजिक-सांस्कृतिक संदर्भात बदल : 3.1 शिक्षणाचे सामाजिक हेतू आणि समाजशास्त्र आणि शिक्षण यांतील संबंध 3.2 भारतीय समाज- बहुभाषिक, बहुसांस्कृतिक, लिंग, गरिबी, विविधता, मानवी हक्क आणि बालकांचे हक्क, विविधतेच्या संदर्भात युवा मुलांना अध्यापन करण्याकरीता योग्य दृष्टिकोन (उपागम) 3.3 शिक्षण आणि शैक्षणिक संधीची समानता याबाबतीत संविधानात्मक (घटनात्मक) तरतुदी 3.4 शालाकरण, अध्ययन-अध्यापन आणि अभ्यासक्रम सामाजिक असमानतेत कसे योगदान करतात याचे चिकित्यक विश्लेषण 3.5 बालकाचे सामाजिकीकरण आणि वाढीची प्रक्रिया- 3.5.1 बालकाचे सामाजिकीकरण आणि वाढीची प्रक्रिया 3.5.2 बालकाच्या सामाजिकीकरणात शाळेच्या भूमिकेचे चिकित्सक मूल्यांकन 3.5.3 बालकाच्या सामाजीकरणात पालकाच्या भूमिकेचे चिकित्सक मूल्यांकन 3.5.4 बालकांच्या सामाजिकीकरणात समवयस्क गटाच्या भूमिकेचे चिकित्सक मूल्यांकन 3.5.5 बालकाच्या समाजीकरणात लोकसमुदायाच्या भूमिकेचे चिकित्सक विश्लेषण
- शिक्षणाच्या राजकीय संदर्भातील (शाळा-संदर्भ) बदल आणि शिक्षणाची आधारप्रणाली : 4.1 बहुशाळा संदर्भ परिस्थिती-ग्रामीण, शहरी, आदिवासी (दुर्गम), विविध मंडळांशी संलग्नित शाळा 4.2 शालेय व्यवस्थापनातील कर्मचार्यांच्या बदलत्या भूमिका 4.3 संघर्ष आणि सामाजिक बदलासाठी (परिवर्तनासाठी) शाळा हे एक विशिष्ट स्थान 4.5 शालेय शिक्षणातील विविध भागधारकांच्या सहभागामध्ये पूरकपणा- माध्यमांची भूमिका, तंत्रज्ञानाचा उपयोग, स्वयंसेवी संस्था, नागरी समाज समूह, शिक्षक संघटना, कुटुंब आणि स्थानिक समुदाय 4.6 अध्ययन संसाधनांचा/स्रोतांचा विकास.