अर्थशास्त्राचा परिचय
An Introduction to Economics
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतीय अर्थव्यवस्थेचा प्रवास 1991 च्या नवीन आर्थिक धोरणानुसार मिश्र अर्थव्यवस्थेकडून बाजाराभिमुख अर्थव्यवस्थेकडे होत असताना काही बदल करणे अपरिहार्य झाले. जलद आर्थिक विकासासाठी खासगीकरणाची कास धरण्यात आली, पुरवठ्याच्या अर्थशास्त्राला झुकते माप देण्यासाठी पुरेसा अवकाश तयार करण्यात आला. नियोजन आयोगाच्या जागी निती आयोग, भारतीय उच्च शिक्षण आयोग आला. देशी-विदेशी गुंतवणूकदारांना पोषक वातावरण तयार करण्यात आले, पाच ट्रिलियन डॉलरची अर्थव्यवस्था बनविण्यासाठी व्यूहरचना तयार करण्यात येत आहे. आताच जुन्या भारतीय दंड संहिते ऐवजी भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता, भारतीय साक्ष अधिनियम (2023) इत्यादी कायदा शाखेतील बदल केले गेले. म्हणून शिक्षण धोरणातही बदल ‘नवीन शैक्षणिक धोरण 2020′ नुसार करणात आले आहेत. या धोरणाची अंमलबजावणी आपल्या विद्यापीठ परिक्षेत्रात शैक्षणिक वर्ष 2024-25 पासून करण्यात येत आहे.
हे धोरण नव्या अभ्यासक्रम निर्मितीचा पाया असून उद्दिष्टे आधारीत व चांगले परिणामाधारीत (Objectives and Outcomes Base) आहे. अध्ययनकर्ता अर्थशास्त्रीय सिद्धांतांचे आपल्या खासगी व सामाजिक जीवनात अनुकरण करुन सामाजिक व राष्ट्रीय प्रश्नांच्या सोडवणूकीची क्षमता स्वतःत विकसित करेल ज्यातून देशाचा एक जबाबदार नागरिक बनू शकेल. अशी अपेक्षा गृहीत धरली आहे. त्याअनुषंगाने विद्यापीठाच्या अर्थशास्त्र अभ्यास मंडळाने भविष्याचा वेध घेत प्रथम वर्षासाठी अर्थशास्त्राच्या सर्व मुख्य विषयांच्या आशयाची ओळख व्हावी म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्र, उपभोक्त्याची वर्तणूक, उत्पादनाचे सिद्धांत, बाजाराची संरचना, पैसा आणि बँका, आंतरराष्ट्रीय व्यापार, सार्वजनिक आय-व्यय, आर्थिक विकास व नियोजन इत्यादी भागांची संकल्पनात्मक थोड्या विस्तृत स्वरूपात मांडणी करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना चार श्रेयांक (Credit) मिळविणे आवश्यक राहणार आहे.
आपणास विदितच आहे की, अर्थशास्त्र मुळातच मानवाच्या आर्थिक वर्तणूकीचे अध्ययन करते. बाजारात व्यक्ती उपभोक्ता, उत्पादक, वितरक, संयोजक अशी वेगवेगळी भूमिका पार पाडत असते. व अर्थव्यवस्था गतिमान करीत असतो. हे पुस्तक निश्चितच विद्यार्थ्याच्या भविष्याला आकार देणार ठरेल यात शंका नाही.
1. अर्थशास्त्राचा परिचय
(Introduction to Economic Science)
1.1 अर्थशास्त्र आणि सूक्ष्म अर्थशास्त्राची व्याख्या आणि अर्थ – संपत्ती, कल्याण, दुर्मिळता आणि आधुनिक
(Meaning and Definition of Economics and Micro Economics – Wealth, Welfare, Scarcity and Modern)
1.2 अर्थशास्त्राचे स्वरूप
(Nature of Economics)
अ) सूक्ष्म किंवा व्यष्टी अर्थशास्त्र (Micro Economics)
स्थुल किंवा समष्टी (Macro Economics)
ब) यथार्थ किंवा वस्तुनिष्ठ आणि आदर्शनिष्ठ अर्थशास्त्राचे स्वरूप
(Nature of Positive and Negative Economics)
क) अर्थशास्त्र कला आणि विज्ञान या स्वरूपात
(Economics as a Arts or Science)
ड) अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे
(Economics as a Social Sceinces)
1.3 अर्थशास्त्राची व्याप्ती (Scope of Economics)
1.4 आर्थिक नियम (Economics Law) – अर्थ, वैशिष्ट्ये आणि मर्यादा
2. उपभोक्त्याच्या वर्तुणूकीचा परिचय
(Introduction of Consumers Behaviors)
2.1 मानवी गरज (Human Wants)
2.1.1. अर्थ आणि वैशिष्ट्ये (Meaning and Characteristics)
2.1.2. गरजांचे वर्गीकरण (Classification of Wants)
2.1.3. उपभोग आणि उपयोगिता संकल्पना
(Concepts of Consumption and Utility)
2.2 आऱ्हासी सीमांत उपयोगिता (Law of Diminishing Marginal Utility)
2.3 मागणी (Demand)
2.3.1 अर्थ आणि व्याख्या (Definition and Meaning)
2.3.2 मागणीचा सिद्धांत (Law of Demand)
2.3.3 मागणी ठरविणारे घटक (Determination of Demand)
2.3.4 मागणीची वृद्धी आणि ऱ्हास (Increase and Decrease in Demand)
2.4 मागणीची लवचिकता : अर्थ
(Elasticity of Demand : Meaning)
3. उत्पादनाचे सिद्धांत
(Theory of Production)
3.1 मूलभूत संकल्पना : संयंत्र, उत्पादन संस्था, उद्योग, पूर्ण स्पर्धा, मक्तेदारी, मक्तेदारीयुक्त स्पर्धा, अल्पजनाधिकार, द्विजनाधिकार
(Basic Concept : Plant, Firm, Industry, Perfect Competition, Monopoly, Monopolistic Competition, Oligopoly and Duopoly)
3.2 उत्पादन फलनाचा अर्थ (Meaning of Production Function)
3.3 उत्पादन घटकांचे प्रकार व त्यांची वैशिष्ट्ये
(Types and Characteristics Factor of Production)
3.4 उत्पादन खर्च (Cost of Production)
3.5 पुरवठा : अर्थ, नियम (Supply : Meaning, Law)
3.6 पुरवठा ठरविणारे घटक (Determinants of Supply)
4. बाजाराच्या संरचनेचा परिचय
(Introduction of Market Structure)
4.1 बाजाराच्या व्याख्या (Defination of Market)
4.2 बाजाराची रचना व स्पर्धेनुसार वर्गीकरण
(Markets forms and Competition basis Classification)
4.2.1 पूर्ण स्पर्धेचा बाजार (Perfect Competition Market)
4.2.2 मक्तेदारी बाजार किंवा अपूर्ण स्पर्धा
(Monopoly Market or Imperfect Competition)
4.2.3 मक्तेदारीयुक्त स्पर्धेचा बाजार
(Monopolistic Competition Market)
4.2.4 अल्पजनाधिकार/अल्पविक्रेताधिकार बाजार
(Oligopolistic Market)
4.2.5 द्विजनाधिकार/द्विविक्रेताधिकार बाजार (Duopoly Market)
4.3 अ) पूर्ण स्पर्धेतील किंमत निश्चिती
(Price Determination under Perfect Competition)
ब) मागणी आणि पुरवठा समतोल
(Demand and Supply Equlibrium)
5. पैसा आणि बँकायांचा परिचय
(Introduction of Money and Banking)
5.1 विनिमय पद्धती (Exchange System)
5.1.1 विनिमय पद्धत प्रकार
5.1.2 वस्तू विनिमय किंवा प्रत्यक्ष विनिमय पद्धतीतील अडचणी
(Difficulties in Barter or Direct Exchange System)
5.2 पैसा : अर्थ (Money : Meaning)
5.2.1 पैशाची उत्क्रांती (Evaluation of Money)
5.2.2 पैशाची व्याख्या (Definition of Money)
5.2.3 पैशाची कार्ये (Function of Money)
5.3 बँकींग (Banking)
5.3.1 बँकेची उत्क्रांती
5.3.2 व्याख्या आणि अर्थ (Defination and Meaning)
5.3.3 बँकांची कार्ये (Function of Banking)
5.4 मध्यवर्ती बँक (Central Bank)
5.4.1 व्याख्या आणि अर्थ (Defination and Meaning)
5.4.2 मध्यवर्ती बँकेची कार्ये (Functions of Central Bank)
5.4.3 बँकींग क्षेत्रातील नवतंत्रज्ञान
(The New Technology in Banking)
5.5 बँकींग व्यवहारात नवतंत्रज्ञानाचा वापर करताना घ्यावयाची काळजी
(Precaution in Using Banking Technology)
6. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा परिचय
(Introduction of International Trade)
6.1 आंतरराष्ट्रीय व्यापार (International Trade)
अ) अंतर्गत आणि आंतरराष्ट्रीय व्यापारातील साम्य-भेद
(Similarities & Differences between Internal & International Trade)
ब) आंतरराष्ट्रीय व्यापाराचे फायदे आणि तोटे
(Advantages and Disadvantages of International Trade)
क) आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातनवादी सिद्धांत (ॲडम स्मिथ)
(Classical Theory of International Trade-Adam Smith)
ड) मुक्त किंवा खुला व्यापार विरुद्ध संरक्षण
(Free Trade Vs Restriction)
6.2 व्यवहारतोल किंवा शोधनशेष (Balance of Payment)
6.3 विनीमय दर : अर्थ आणि प्रकार
(Exchange Rate : Meaning and Types)
7. सार्वजनिक आय-व्ययाचा परिचय
(Introduction of Public Finance)
7.1 सार्वजनिक आय-व्यय (Public Finance)
अ) अर्थ, व्याख्या आणि सार्वजनिक आय-व्ययाचे महत्त्व
(Meaning, Definitions & Importance of Public Finance)
7.2 सार्वजनिक उत्पन्न : अर्थ, कर आणि करेतर उत्पन्न, करांचे वर्गीकरण आणि अर्थव्यवस्थेत करांची भूमिका
(Public Revenue : Meaning, Tax and Non-tax Revenue, Classification of Taxes & Role of Taxes in Economy)
7.3 सार्वजनिक खर्च : अर्थ, भूमिका, तत्त्वे, वर्गीकरण आणि सार्वजनिक खर्चात वाढ होण्याची कारणे
(Public Expenditure : Meaning, Role, Principles, Classification and Causes of Increase in Public Expenditure)
7.4 सार्वजनिक कर्ज : अर्थ, उद्दिष्ट्ये, प्रकार, महत्त्व
(Public Debt : Meaning, Objectives, Types, Importance)
7.5 अंदाजपत्रक : अर्थ, प्रकार, तुटीचे अंदाजपत्रक
(Budget : Meaning, Types and Deficit Finance)
8. आर्थिक विकास, वृद्धी आणि नियोजन यांचा परिचय
(Introduction of Economic Development, Growth and Planning)
8.1 आर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी
(Economic Development and Growth)
अ) अर्थ (Meaning)
ब) आर्थिक विकासाचे निर्देशक (Indicators of Economic Development)
8.2 अतिरिक्त लोकसंख्येच्या समस्या
(Problems of Over Population)
8.3 गरिबीचे किंवा दारिद्रयाचे दुष्टचक्र (Vicious Circle of Poverty)
8.4 आर्थिक नियोजन (Economic Planning)
अ) अर्थ, व्याख्या, उद्दिष्ट्ये, प्रकार आणि आवश्यकता
(Meaning, Definition, Objects, Types and Need)
8.5 नीती आयोग (NITI Aayog)
अ) नीती आयोगाची रचना (Structure of NITI Ayog)
ब) नियोजन मंडळ आणि निती आयोग यांच्यातील फरक
(Difference bet’n Planning Commission and NITI Aayog)
क) नीती आयोगाची भूमिका (Role of NITI Aayog)
ड) नीती आयोगाचे महत्त्व (Importance of NITI Aayog)
Related products
-
पर्यावरणशास्त्र परिचय
₹375.00