भारतीय औद्योगिक अर्थशास्त्र
M.Com | Sem II | Paper - 425 (NEP 2020 Pattern)
Authors:
ISBN:
₹410.00
- DESCRIPTION
- INDEX
भारतात औद्योगिक विकासाचा खरा पाया दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत रचला गेला. आज भारतीय औद्योगिक क्षेत्राने लक्षणीय प्रगती केली आहे. भारताच्या राष्ट्रीय उत्पन्नात औद्योगिक क्षेत्राचे महत्त्व वाढत आहे. भारताचा औद्योगिक विकास हा यंत्रनिर्मित वस्तू पर्यंत मर्यादित नसून अभियांत्रिकी, सेवा उद्योग असा विस्तारला आहे.
प्रस्तुत पुस्तकात भारतातील औद्योगिकीकरण, भारतातील सार्वजनिक व खाजगी उद्योग क्षेत्र, औद्योगिक रुग्णता, प्रादेशिक औद्योगिक असमतोल, भारतीय उद्योगांचे नियमन, भारतीय उद्योगांवरील विनियमनाचा भाग म्हणून खासगीकरण, उदारीकरण, जागतिकीकरण, भारतीय श्रमिक, त्यांची वैशिष्टे, उत्पादकता, वेतन, सामाजिक सुरक्षा, कामगार कल्याण, कामगार संघटना या महत्त्वपूर्ण मुद्द्यांची विस्तृत आणि मुद्देसूद मांडणी केली आहे. भारतीय औद्योगिक क्षेत्राचा विकास किंवा प्रगती आणि समस्यांचे योग्य आकलन व्हावे म्हणून सांख्यिकीय माहितीचा वापर केला आहे.
1. भारताचा औद्योगिक विकास :
1.1 औद्योगिकीकरण आणि औद्योगिकीकरणाची भूमिका
1.2 भारतातील औद्योगिक विकासाचा आढावा आणि टप्पे
1.3 भारताच्या औद्योगिक आकृतीबंधातील परिवर्तन
1.4 भारतातील खासगी उद्योग क्षेत्र
1.5 भारतातील सार्वजनिक क्षेत्र
1.6 भारतातील मोठे उद्योग
1.7 भारतातील मध्यम, लघु आणि अती लघुउद्योग क्षेत्र
2. भारतीय उद्योगांच्या समस्या आणि धोरण :
2.1 भारतातील औद्योगिक विकासाच्या समस्या
2.2 भारतातील खासगी क्षेत्रातील उद्योगसंस्थांच्या समस्या
2.3 भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील उद्योगांच्या समस्या
2.4 भारतातील मध्यम, लघु आणि सुक्ष्म उद्योगांच्या समस्या
2.5 औद्योगिक रूग्णता
2.6 भारतातील संतुलित प्रादेशिक विकासाची समस्या
3. उद्योगसंस्था आणि उद्योगांवरील सरकारचे नियमन :
3.1 नियमन : अर्थ, आवश्यकता आणि साधने
3.2 भारतात औद्योगिक आणि व्यावसायिक नियमन व कायदे
3.3 उद्योग संस्थांचे नियमन (समरूप माहिती अन्तर्गत)
3.4 उद्योग संस्थाचे नियमन (असमरूप माहिती अन्तर्गत)
4. उद्योगसंस्था आणि उद्योगांचे सरकारी विनियमन :
4.1 विनियमन
4.2 विनियमनाचे लाभ आणि तोटे
4.3 खासगीकरण आणि निर्गुंतवणूक धोरण
4.4 स्पर्धात्मक धोरण
5. जागतिकीकरण आणि भारतीय औद्योगिक क्षेत्र :
5.1 जागतिकीकरण आणि भारतीय औद्योगिक क्षेत्र
5.2 जागतिकीकरणाचा भारतीय औद्योगिक क्षेत्रावरील परिणाम
5.3 विदेशी भांडवल
5.4 विदेशी गुंतवणूक
5.5 बहुराष्ट्रीय कंपन्या
5.6 भारतातील विदेशी सहयोग
5.7 विदेशी खासगी भांडवलावर नियंत्रण
6. औद्योगिक कामगार :
6.1 औद्योगिक श्रमीक आणि भारतीय औद्योगिक श्रमीकाची वैशिष्ट्ये
6.2 भारतीय श्रमिकांची उत्पादकता आणि ती कमी असण्याची कारणे
6.3 श्रमीक मागणी-पुरवठा वेतन निश्चिती
6.4 सामाजिक सुरक्षा
6.5 भारतात कामगार कल्याण
6.6 भारतातील कामगार वेतन धोरण
6.7 भारतातील कामगार संघटना
6.8 कर्मचारी निकास धोरण आणि संप अधिकार