Prashant Publications

My Account

भारतीय संविधान मूलभूत तत्त्वे आणि स्वरूप

Indian Constitution : Fundamental Principles and Nature

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040145
Marathi Title: Bharatiya Sanvidhan Mulbhut Tattve Aani Swarup
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 342
Edition: First
Category:

450.00

  • DESCRIPTION
  • INDEX

संविधान म्हणजे एक देशाच्या राजकीय व्यवस्थेचा आधारस्तंभ. ते राज्याच्या कायदेमंडळ, कार्यकारी मंडळ, व न्यायमंडळ यांची स्थापना करतो, त्यांच्या अधिकार व कार्ये स्पष्ट करतो, व त्यांची मर्यादा ठरवतो. संविधान जनतेच्या सार्वभौमत्वाचे प्रतीक आहे आणि त्यात सुसंगत व न्यायसंगत शासनाची रूपरेषा असते.
लोकशाहीत, राज्यघटनेचा आधार म्हणजे जनता स्वसंविधान तयार करते आणि विविध शासन अंगांना अधिकार प्रदान करते. संविधान हा संस्थात्मक आरसा आहे, जो समाजाच्या विविध स्तरातील मूल्यांचे प्रतिबिंब असतो. त्याच्या अंमलबजावणीवर आणि न्यायालयीन निर्णयांवर संविधानाचा प्रभाव आहे.

1. भारतीय संविधान आणि संघराज्य व्यवस्थेचा विकास 
(Indian Constitutional and Federal System Development in India)
(अ) संविधान, संविधानवाद (Constitutional Law & Constitutionalism)
संविधान काय आहे? संवैधानिक कायदा, संविधानवाद- संविधानवादाची वैशिष्ट्ये, संविधान आणि संविधानवाद यांच्यातील समानता, संविधान आणि संविधानवाद यांच्यातील फरक
(ब) ब्रिटीश वारसा (British Legacy)
ब्रिटिश वासाहतिक राजवटीचे स्वरूप, ब्रिटिश राजवटीचे परिणाम, इंग्रजी राजवटीचा सामाजिक-सांस्कृतिक वारसा, राजकीय वारसा व प्रशासनिक वारसा.
(क) राष्ट्रवाद
राष्ट्रवाद म्हणजे काय? भारतीय राष्ट्रवादाचा उदय, सन 1885-1905 दरम्यानची राष्ट्रीय चळवळ, भारतातील राष्ट्रीय चळवळीच्या उदयाची कारणे, भारतातील राष्ट्रवादाच्या उदयाचा प्रभाव.
(ड) भारतीय संविधान (Indian Constitution)
अर्थ, व्याख्या, राज्यघटनेचा प्रमुख उद्देश, राज्यघटनेचे स्वरुप, ऐतिहासिक पार्श्वभूमी, क्रिप्स योजना, घटना समिती, संविधानची निर्मिती प्रक्रिया, घटना समितीतील सदस्य, समित्या, मसुदा समिती, घटना समितीवरील आक्षेप, भारतीय संविधानाचे स्त्रोत, सरनामा वा उद्देशपत्रिका, सरनामा आणि मूलभूत चौकट, सरनाम्याचे विश्लेषण, संविधानाची वैशिष्ट्ये.
(इ) भारतीय संघराज्य व्यवस्था (Indian Federal System)
भारतीय संघराज्य निर्मितीची पार्श्वभूमी, संघराज्याची निर्मिती, उदय, विद्वानांची वैचारिक भूमिका, केंद्रशासन प्रबळ बनण्याची कारणे, भारत हे संघराज्य आहे काय?, संघराज्याची रचना व स्वरूप, संघराज्य रचनेची वैशिष्ट्ये, संघराज्य रचनेची लवचिकता, भारतीय संघराज्याची वैशिष्ट्ये, भारतीय संघराज्य चौकटीत एकात्म शासनाची वैशिष्ट्येे.

2. नागरिकत्व, मूलभूत हक्क व कर्तव्ये, मार्गदर्शक तत्त्वे 
(Citizenship, Fundamental Rights & Duties, Directive Principles)
(अ) नागरिकत्व (Civilazation)
(ब) मूलभूत हक्क व कर्तव्ये (Fundamental Rights & Duties)
मूलभूत हक्कांची व्याख्या, अर्थ, सिद्धांत, मूलभूत हक्क, मूलभूत हक्कांच्या रक्षणातील न्यायालयाची भूमिका, मूलभूत कर्तव्ये, कर्तव्याचे प्रकार, मूलभूत कर्तव्य:दृष्टिक्षेप, मूलभूत हक्क आणि कर्तव्यातील फरक.
(क) मार्गदर्शक तत्त्वे (Directive Principles)
अर्थ, व्याप्ती, मार्गदर्शक तत्त्वांचे वर्गीकरण, मार्गदर्शक तत्वे व मूलभूत अधिकारातील फरक, डी.डी.बसूप्रणित राज्यांच्या मार्गदर्शक तत्वांचे वर्गीकरण.

3. भारतीय संविधानातील विशेष तरतुदी 
(Unique Provisions in Constitution of India)
(अ) घटनादुरुस्तीची प्रक्रिया (Amendment Process)
अर्थ आणि उद्दिष्ट्ये, संविधान दुरुस्तीच्या 3 पद्धती
(ब) अलिकडील प्रमुख घटना दुरुस्त्या :
73 व 74 वी घटना दुरुस्ती, 86 वी संविधान दुरुस्ती, 103 वी घटना दुरुस्ती (12 जाने. 2019), 104 वी घटना दुरुस्ती (25 जाने. 2020), 105 वी घटना दुरुस्ती (10 ऑगस्ट 2021).
(क) अनुसूचीत जाती, अनुसूचीत जमाती, इतर मागासवर्ग आणि सामाजिक-आर्थिक मागासवर्गिय वर्गाच्या तरतुदी
अनुसूचीत जातीविषयक विशेष संविधानिक तरतुदी, राष्ट्रीय अनुसुचित जाती आयोग
भारतातील अनुसूचित जमातींकरीता विशेष संविधानिक तरतुदी, भारतातील अनुसूचित क्षेत्र व अनुसूचित जमाती, राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोग – रचना, इतर कार्य आणि अधिकार
सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागास वर्ग

4. शासनाचे घटक : केंद्र व राज्य 
(Organs of Government : Union and State)
(अ) कार्यकारी मंडळ (Union Executive)
(i) राष्ट्रपती/राष्ट्राध्यक्ष : निवडणूक, संसद सदस्यांचे मतमूल्य, निवडणुका, कार्यकाळ, बडतर्फ प्रक्रिया, वेतन व भत्ते, अधिकार व कार्ये, राष्ट्रपतीची स्थिती, भारताच्या राष्ट्रपतींची माहिती व कार्यकाळ
(ii) उपराष्ट्रपती : उपराष्ट्रपतीचे मतदान, निवडणूक पद्धती, कार्यकाळ, वेतन व भत्ते, अधिकार व कार्य, राष्ट्रपतीच्या गैरहजेरीत उपराष्ट्रपतीची भूमिका/कार्य, भारताचे उपराष्ट्रपती व कार्यकाळ,
(iii) पंतप्रधान : पंतप्रधानाची निवड, पात्रता, वेतन व इतर सुविधा, अधिकार व कामे, पंतप्रधानाचे अधिकार व कार्ये, भारताचे पंतप्रधान व कार्यकाळ, उपपंतप्रधानमंत्री.
(iv) केंद्रिय मंत्रिमंडळ : रचना, विविध मंत्रिमंडळातील मंत्र्याचा संख्यात्मक तक्ता, मंत्र्यांचे प्रकार, संसदीय सचिव, कार्यकाळ, मंत्रिमंडळाची संयुक्त जबाबदारी, मंत्रिमंडळ व मंत्रिपरिषद यातील अंतर, मंत्रिपरिषदेचे प्रमुख वैशिष्ट्ये, मंत्रिमंडळाचे अधिकार व कार्ये, घटक राज्यांची शासनयंत्रणा.
(ब) राज्य कार्यकारी मंडळ (State Executive Council)
(i) राज्यपाल : ऐतिहासिक पार्श्वभूमी, भारतीय संविधान व राज्यपाल, राज्यपालाची वास्तविक भूमिका, राज्यपाल : नवे विचारप्रवाह, भारतातील घटकराज्यांचे सद्यकालीन राज्यपाल, महाराष्ट्राचे राज्यपाल
(ii) मुख्यमंत्री : मुख्यमंत्रीची निवड, कार्यकाळ, अधिकार व कार्ये, भारतातील घटक राज्यांचे सद्यकालीन मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे नवनियुक्त मुख्यमंत्री, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व कार्यकाळ, उपमुख्यमंत्री.
(iii) घटक राज्याचे मंत्रिमंडळ : मंत्रिमंडळाची निर्मिती, मंत्रिपरिषदेचा कार्यकाळ, मंत्र्याचे वेतन व भत्ते, मंत्रिमंडळाचे कामे व अधिकार.

5. विधिमंडळ : केंद्र व राज्य 
(Legislature : Union and State)
(अ) केंद्रीय विधिमंडळ : लोकसभा आणि राज्यसभा
(Union Legislature : Lok Sabha and Rajya Sabha)
(i) लोकसभा : मतदाराची पात्रता, उमेदवाराची पात्रता, लोकसभेचा कार्यकाल, लोकसभेचा सभापती, सभापती-कार्ये व अधिकार, लोकसभेची कार्ये व अधिकार, लोकसभा उपसभापती.
(ii) राज्यसभा : राज्यसभेची रचना, सदस्यत्वासाठी पात्रता, निवडणूक, कार्यकाळ, राज्यसभा सभापती, राज्यसभा उपाध्यक्ष, कार्ये व अधिकार, आवश्यकता, भारतातील कायदेमंडळातील एकूण सदस्य संख्या, संसदीय समित्या.
(ब) राज्य विधिमंडळ : विधानसभा आणि विधानपरिषद
(State Legislature : Vidhan Sabha and Vidhan Parishad)
(i) विधानसभा : उमेदवाराची पात्रता, अपात्रता, कार्यकाळ, विधानसभा सभापती-कार्ये व अधिकार, विधानसभा उपसभापती-कार्ये व अधिकार.
(ii) विधानपरिषद : रचना, सभासदांची पात्रता, अपात्रता,, कार्यकाळ व शपथविधी, विधानपरिषदेचा अध्यक्ष वा सभापती, विधानपरिषदेचे अधिकार व कार्ये, मूल्यमापन, आवश्यकता व अनावश्यकता.

6. न्यायमंडळ आणि निवडणूक प्रक्रिया 
(Judiciary and Election Process)
(अ) न्यायमंडळ : सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय
(Judiciary : Supreme Court, High Court)
(i) सर्वोच्च न्यायालय : रचना, नेमणूक, पात्रता, कार्यकाल, पदच्युती, वेतन व भत्ते, अधिकारक्षेत्र, 42 वी घटनादुरुस्ती आणि न्यायालयीन पुनर्विलोकनाचा अधिकार.
(ii) उच्च न्यायालय: रचना, संख्या, पात्रता, नेमणूक, कार्यकाल, पदच्युती, वेतन व भत्ते, अधिकारक्षेत्र, दुय्यम/कनिष्ठ न्यायालये, भारतातील उच्च न्यायालये व त्यांचे अधिकारक्षेत्र, उच्च न्यायालयांची नावे बदलण्याचा प्रस्ताव, न्यायालयीन पुनर्विलोकन, 42 वी घटनादुरुस्ती आणि न्यायालयीन पुनर्विलोकन, न्यायालयीन सक्रियता, जनहित याचिका
(ब) निवडणूक प्रक्रिया (Election Process)
अर्थ, व्याख्या, निवडणूका आणि निर्वाचन व्यवस्था, निवडणूका व लोकशाही, मतदार साक्षरता; भारतीय निर्वाचन आयोग, आयोगाची रचना, निवडणूक आयुक्त, मतदारसंघ निर्धारण/निश्चिती आयोग, निर्वाचन आयोगाचे अधिकार व कार्ये, भारतीय निवडणूकीतील समस्या, भारतीय निर्वाचन प्रक्रियेतील सुधारणा, निवडणूकांचे महत्व, निर्वाचन आयोगाचे महत्व, भविष्याचे मत.

RELATED PRODUCTS
You're viewing: भारतीय संविधान मूलभूत तत्त्वे आणि स्वरूप 450.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close