भूरूपशास्राची मूलतत्त्वे
Authors:
ISBN:
₹210.00
- DESCRIPTION
- INDEX
भूरूपशास्र भूगोलाची मुख्य शाखा आहे. भूरूपशास्राचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययन-अध्यापनात अत्यंत मुलभूत स्वरूपाचा आहे. कारण या विषयातील संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असतात. भूरूप शास्राच्या संकल्पना समजल्यावर भूगोलशास्रातील इतर शाखांचा अभ्यास करणे अतिशय सोपे होते. म्हणून संकल्पनांचे विद्यार्थ्यांना ज्ञान व्हावे या दृष्टीने पाठ्यांशाची मांडणी केली आहे.
सदर पुस्तकातील प्रकरणांची मांडणी व क्रम विद्यापीठाच्या अभ्यासक्रमानुसार केलेली आहे. त्यात भूरूपशास्राची सामान्य संकल्पना, विदारण, नदी, वारा आणि हिमनदी या कारकांचे भूरूपीय कार्य या मुद्यांचा प्रामुख्याने समावेश करण्यात आला आहे.
भूरूपशास्राचे ज्ञान विद्यार्थ्यांना होण्याच्या दृष्टीने प्रत्येक संकल्पना आकृतीच्या साहाय्याने स्पष्ट केली आहे. संपूर्ण पुस्तकात एकूण 74 आकृत्या काढल्या आहेत. हे या पुस्तकाचे वैशिष्ट्य आहे. दुसरे महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी पाठ्यांशातील प्रत्येक मुद्द्यावर अतिशय बारकाईने अभ्यास करून सर्व प्रकारचे वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत. सर्व प्रश्नांची गुणवत्ता उच्चप्रतीचे असून बरेच प्रश्न भौगोलिक संकल्पनेच्या उपयोजनेवर आधारित आहेत. त्यामुळे एम.पी.एस.सी. यु.पी.एस.सी. तसेच नेट, सेट यासारख्या परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना हे प्रश्न निश्चितच उपयोगी ठरणार आहेत. तसेच विद्यार्थ्यांना स्वाध्ययन करणे सोपे होणार आहे.
1. भूरूपशास्राची संकल्पना
(General Concept of Geomorphology)
भूरूपशास्र प्राकृतिक भूगोलाची मुख्य शाखा
भूरूपशास्राच्या व्याख्या
भूरूपशास्राचे स्वरूप
भूरूपशास्राची व्याप्ती
2. विदारण
(Weathering)
बाह्यशक्तीच्या प्रक्रिया
विदारण क्रिया
व्याख्या
विदारण क्रियेचे प्रकार
अ) यांत्रिक किंवा कायिक विदारण – यांत्रिक किंवा कायिक विदारण क्रियेचे प्रकार, यांत्रिक किंवा कायिक विदारणाचे घटक
ब) रासायनिक विदारण क्रिया व प्रकार
क) जैविक विदारण
विदारण क्रियेचा परिणाम
3. नदीचे कार्य
(The Work of River)
नदीचे खनन कार्य
नदीच्या खनन कार्यामुळे निर्माण होणारे भू आकार
नदीच्या संचयन कार्यामुळे निर्माण होणारे भू-आकार
4. वाऱ्याचे कार्य
(Work of Wind)
जगातील वाळवंटी प्रदेशांची निर्मिती
जागतिक उष्ण कटिबंधीय वाळवंटी प्रदेश
वाळवंटाचे मुख्य प्रकार
वाऱ्याचे खनन कार्य
वाऱ्याच्या खनन (अपक्षय) कार्यामुळे निर्माण होणारी भूमिस्वरूपे
वाऱ्याचे संचयन कार्य
आकारानुसार वाळूच्या टेकड्यांचे प्रकार
5. हिमनदीचे कार्य
(The Work of Glacier)
हिमनदीची व्याख्या
हिमनदीचा उगम व अस्तित्व
हिमनदीची गती
हिमनदीचा विस्तार
हिमनदीचा शेवट
हिमनदीची माघार
हिमनदीची वैशिष्ट्ये
हिमनद्यांचे प्रकार
हिमालय पर्वतीय प्रदेशातील हिमनद्यांची काही उदाहरणे
हिमनदीचे कार्य
हिमनद्यांच्या खनन/क्षरण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे
हिमनद्यांच्या संचयन/निक्षेपण कार्यामुळे निर्माण होणारी भूरूपे
Related products
-
प्राकृतिक भूगोल
₹295.00 -
भूरुपशास्त्र
₹550.00 -
सकारात्मक मानसशास्त्र
₹195.00 -
स्थूल अर्थशास्त्र
₹195.00