गृहअर्थशास्त्र आणि रोजगार संधी
Home-Economics and Career Opportunities
Authors:
ISBN:
₹375.00
- DESCRIPTION
- INDEX
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठात बीए प्रथम वर्षाच्या गृहअर्थशास्त्र विषयाच्या प्रथम व द्वितीय सत्र अभ्यासक्रमामध्ये विद्यापीठाने नेऊन दिल्यानुसार प्रस्तुत ‘गृहअर्थशास्त्र व रोजगार संधी’ या पुस्तकाची मांडणी करण्यात आली आहे. प्रस्तुत पुस्तक हे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) नुसार तयार केलेले असून यामध्ये गृहअर्थशास्त्राचा इतिहास, गृहअर्थशास्त्र परिभाषा, गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण, गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी, गृहअर्थशास्त्राच्या वेगवेगळ्या शाखा, कौटुंबिक संसाधने, घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन, कुटुंबनिवास, फर्निचर, अंतर्गत सजावट, पुष्परचना याविषयीचे शास्त्रशुद्ध ज्ञान देऊन त्यामध्ये आवड निर्माण होऊन हा विषय सोपा करण्याचा या पुस्तकामध्ये प्रयत्न करण्यात आला आहे. हे पुस्तक विद्यार्थिनी व अध्यापकांच्या पसंतीला उतरेल अशी अपेक्षा आहे.
गृहअर्थशास्त्र आणि अंतर्गत सजावट याचा एकंदरीत विचार करता, गृहअर्थशास्त्र म्हणजे काय ते प्रथम पाहायला हवे गृह आणि अर्थ याचा शास्त्रीयदृष्ट्या योग्य तो ताळमेळ बसवणारे शास्त्र म्हणजे गृहअर्थशास्त्र होय. गृहअर्थशास्त्राचा प्रारंभ हा बऱ्याच कालावधीपासून झालेला असून विकास प्रक्रियेचा प्रारंभ हा आणखी विस्तारित होत आहे. मानवाचा विकास ही अतिशय गुंतागुंतीची प्रक्रिया आहे, यामध्ये मानवाच्या सर्वांगीण विकासाच्या दृष्टी येणाऱ्या सर्व प्रक्रियेचा अंतर्भाव गृहअर्थशास्त्र विषयांमध्ये होत असतो. मानवाचा विकास व्हावा याकरिता मानवी जीवनामध्ये अनेकविध घटक असतात. त्यापैकी गृहव्यवस्थापन, अन्न व आरोग्यशास्त्र, वस्त्रशास्त्र, निर्णय प्रक्रिया, गृहव्यवस्थापन प्रक्रिया, जलसंधारणाची गरज, कचरा विल्हेवाटेची गरज, अंतर्गत सजावटीची संकल्पना, घरगुती पोशाख निवड व काळजी, पुष्परचनेचे विविध प्रकार या सर्वांचे अध्ययन यामध्ये अंतर्भूत असल्याने हा विषय गृहिणीबरोबर विद्यार्थिनी, अध्यापक वर्ग व सर्वसामान्य पातळीवर सर्व स्त्रियांसाठी उपयुक्त ठरणारा आहे. या अनुषंगाने या विषयाची मांडणी केलेली असून ही पुस्तिका सामान्य वाचकांना सुद्धा उपयुक्त ठरेल अशी अपेक्षा आहे.
1. गृहअर्थशास्त्राचा परिचय
(Introduction of Home-Economics)
1.1 गृहअर्थशास्त्राचा इतिहास
1.2 गृहअर्थशास्त्राच्या परिभाषा
1.3 गृहअर्थशास्त्र शिक्षण हे जीवन शिक्षण
1.4 गृहअर्थशास्त्रात नोकरीच्या संधी
2. गृहअर्थशास्त्राच्या शाखा
(Applied Branches of Home-Economics)
2.1 गृहव्यवस्थापन
2.2 अन्नशास्त्र आणि आरोग्यशास्त्र
2.3 वस्त्रशास्त्र
2.4 मानव विकास
3. कौटुंबिक संसाधने
(Family Resources)
3.1 कौटुंबिक संसाधनाचे प्रकार
3.2 कौटुंबिक संसाधनाची वैशिष्ट्ये
3.3 निर्णय प्रक्रिया
3.4 निर्णयाचे प्रकार
4. घर आणि कार्यक्रम व्यवस्थापन
(Home and Event Management)
4.1 गृहव्यवस्थापनाच्या परिभाषा
4.2 गृहव्यवस्थापन प्रक्रिया
4.3 कार्यक्रम व्यवस्थापन संकल्पना
4.4 कार्यक्रम व्यवस्थापनाचे प्रकार
5. प्रात्यक्षिक-1
(Practicle-I)
1. भरतकलेची टाके
1.1 साखळी टाका
1.2 गहू टाका
1.3 हेरिंगबोन टाका
1.4 गाठी टाका
1.5 मनी काम
2. रंगाचे वर्गीकरण
3. रंगयोजना
6. कुटुंबनिवास
(Housing)
6.1 कुटुंब निवासाची संकल्पना
6.2 घराच्या जागेच्या निवडीवर प्रभाव टाकणारे घटक
6.3 पाणी पुनर्भरणाची गरज
6.4 कचरा विल्हेवाटीची गरज
7. फर्निचर
(Furniture)
7.1 फर्निचर संकल्पना व महत्त्व
7.2 फर्निचरचे प्रकार
7.3 फर्निचर निवडीवर परिणाम करणारे घटक
7.4 फर्निचरची काळजी
8. अंतर्गत सजावट
(Interior Decoration)
8.1 अंतर्गत सजावटीची संकल्पना
8.2 पडद्याचे प्रकार
8.3 गालिच्याचे प्रकार
8.4 घरगुती पोशाख निवड व काळजी
9. पुष्परचना
(Flower Arrangement)
9.1 पुष्परचनेच्या परिभाषा
9.2 पारंपारिक आणि आधुनिक पुष्परचना
9.3 जपानीज पुष्परचना
9.4 पुष्परचनेकरिता आवश्यक साहित्य
10. प्रात्यक्षिक-2
(Practicle-II)
1. कापड पेंटिंग/प्रिंटिंग
2. सजावटीचे साहित्य/उपकरणे/साधने
3. रांगोळी व फुलसजावट कला कृतीशीलता