खान्देश काव्यप्रबोध समीक्षा
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
‘कविता’ हा चिंतनशील वाङ्मयप्रकार आहे. प्रत्येक कविता ही कविच्या खासगी अनुभवातून जन्मास आलेली असली तरी तिचे स्वरूप हे वैयक्तीक न राहता वैश्विक होते. साहित्य हे कालातित असल्याने प्रत्येक कविता ही नव्या कालखंडात नव्या अर्थासह आशयमान होते. कविता ही बहुअर्थी असल्याने आशयाचे विविध पदर त्यातून उलगडत असतात. कविता ही अत्युच्च संवेदनेतून येत असल्याने कवितेतील निवेदन हे सरळ स्पष्ट व निवेदनात्मक नसते तर प्रतिमा, प्रतिके यातून कमी शब्दात ती अभिव्यक्त होत असते. अशा वाङ्मय प्रकारचे अध्ययन आणि अध्यापन करणे हे सोपे नसते. अलिकडच्या काळात परिस्थिती ही झपाट्याने बदलत असल्याने विद्यार्थी हा ‘टेक्नोसॅव्ही’ होत चाललेला आहे. परिणामी तो कवितेच्या अस्सल अनुभवापासून दूर जात आहे. कवितेचा अनुभव हा खासगी असला तरीही सर्वव्यापक असतो. त्यामुळे विद्यार्थ्याला कवितेत गोडी निर्माण व्हावी, कवितेचे अध्ययन सोपे व्हावे याकरीता सदर समीक्षाग्रंथाची निर्मिती केलेली आहे.
कविता : संकल्पना, स्वरूप व वैशिष्ट्ये
कवितेचे घटक
कवितेचे प्रकार
मराठी कवितेची वाटचाल
1. मालेऽ कससंच वाटस रेऽ! – नि. कृ. ठाकरेे
2. माती – भगवान भटकर
3. कविता स्फुरते कशी – प्राचार्य डॉ. किसन पाटील
4. मुक्ताई – विमल वाणी
5. भुई तापाचेच बळी – प्रभाकर महाजन
6. ओव्या आईच्या – माया धुप्पड
7. सालदार – रमेश पवार
8. मुद्रा – उषा हिंगोणेकर
9. लेणं – वा. ना. आंधळे
10. बाप – लतिका चौधरी
11. माय – मिलिंद बागूल
12. तो शेतमजुराचा पोरगा आहे – नामदेव कोळी
13. गुलाबाची चंद्रकळा – प्रभाकर शेळके
14. कुपोषण – संतोष पावरा
15. जातीचे अभंग – देवानंद गुरचळ
16. निघून जावे सरळ सूरत! – महेंद्र पाटील
17. किंमत – संतोष साळवे
18. बाप – अशोक नीलकंठ सोनवणे
19. कवयित्री बहिणाबाई चौधरी – निंबा पुना बडगुजर
20. उपासना – राजेंद्र रायसिंग
21. प्रीत असावी अशी – सौ.स्नेहलता चौधरी
22. माय होम – डॉ.अक्षय घोरपडे
23. खिडकीतील आभाळ – शैलेजा करोडे
24. शोध… स्वतःचा! – रमेश सरकाटे