Prashant Publications

My Account

मानसशास्त्र परिचय

Introduction to Psychology

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040008
Marathi Title: Manasshastra Parichay
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 160
Edition: First
Category:

240.00

  • DESCRIPTION
  • INDEX

नवीन अभ्यासक्रम आला की, पहिल्या वर्षी विद्यार्थ्याची तारांबळ उडते. कारण नव्या अभ्यासक्रमात काळानुरूप नव्या बाबी बहुतेक करुन समाविष्ट झालेल्या असतात. त्यामुळे त्याचे अवलोकन व अभ्यास करतांना अनेक पुस्तके व संदर्भ ग्रंथाचा आधार घ्यावा लागतो. कोणताही एक घटक हा एका पुस्तकातून पूर्ण होत नाही. त्यातून वेळ, पैसा व श्रम हे जास्तीचे खर्च होतात. ही अडचण लक्षात घेता अभ्यासक्रमावर आधारीत विद्यार्थ्याची ज्ञानाची गरज पूर्ण व्हावी, या हेतूने या पुस्तकाचे प्रयोजन आहे.
‌‘मानसशास्त्र’ हा विषय आता बंदिस्त राहिलेला नाही. याची व्याप्तीही दिवसेंदिवस वाढत आहे. या विषयाबाबतची कुतूहलता, विद्यार्थी, शिक्षक व व्यक्ती या सर्वांचीच वाढत आहे. सद्यस्थितीत फार मोठ्या प्रमाणात ताणतणाव, चिंता, भिती, आसक्ती वाढत आहे, त्यामुळे सुख, समाधान, मानवी मनापासून दुरावल्या गेले आहे. मानसिक समस्या वाढत आहे. त्यातून शारीरीक समस्या उद्भवत आहे. व्यक्तीची जसजसी दमछाक व कोंडी होत आहे. तसतसा व्यक्ती केंद्रित होत आहे. त्यातून सुटण्याचे अनेक मार्ग व्यक्ती चोखाळतांना दिसतो आहे. म्हणूनच सामान्य व्यक्तीलाही ‌‘मानसशास्त्र’ विषय वरदानच ठरत आहे. या पुस्तकातील प्रत्येक प्रकरणामध्ये प्रत्येक घटक हा व्यवस्थित व साजेश्या, सोप्या पद्धतीने मांडण्याचा, उलगडण्याचा प्रयत्न केलेला आहे ज्यातून विद्यार्थ्यांना व सामान्य व्यक्तीला सुद्धा या पुस्तकातील सर्वच संकल्पना स्पष्ट होतील व जीवन उपयोगी ठरतीलच.

1. मानसशास्त्राची प्रस्तावना आणि पद्धती 
(Introduction and Methods of Psychology)
मानसशास्त्राची प्रस्तावना आणि पद्धती, मानसशास्त्राची व्याख्या, मानसशास्त्राचे ध्येय्य, मानसशास्त्राच्या शाखा, मनोविश्लेषण, वर्तनवाद, मानवतावाद, बोधात्मकवाद मानसशास्त्राचा इतिहास
मानसशास्त्राच्या पद्धती : प्रायोगिक, निरीक्षण, सर्वेक्षण, सहसंबंध आणि चिकित्सा पद्धती.

2. वर्तनाचे जैवीक आधार 
(Biological Bases of Behaviour)
वर्तनाचे जैविक आधार चेतापेशी – रचना व कार्य मज्जारजू, मेंदू स्वायत्त चेतासंस्था

3. अवधान आणि संवेदन
(Attention and Perception)
अवधान आणि संवेदन अवधान : व्याख्या, प्रकार, अवधानाचे घटक, अवधान विस्तार, अवधान विचलन, अवधान विभाजन, अवधान विकर्षण संवेदन : व्याख्या, संवेदन संगठन नियम, संवेदन निर्धारक घटक, आकृती आणि पार्श्वभूमी भास किंवा भ्रम.

4. भावना आणि प्रेरणा
(Emotion and Motivation)
भावना : व्याख्या, भाव आणि भावना यामधील फरक, भावनेतील शारीरीक परिवर्तन, भावनांमध्ये स्वायत्त चेतासंस्थेची भूमिका, भावनेचे सिद्धांत : जेम्स लांजे, कॅनन बार्ड, सेक्टर सिंगर सिद्धांत प्रेरणा : व्याख्या, प्रेरणा चक्र, प्रेरणेचे प्रकार, प्रेरणेची वर्चस्वश्रेणी.

5. अध्ययन 
(Learning)
अध्ययन – व्याख्या, अध्ययनाचे प्रकार, अध्ययन पद्धती, अनुकरण, अभिजात, साधक अभिसंधान पद्धती, प्रयत्न प्रमाद पद्धती अध्ययनाचे नियम, अर्थदृष्टी अध्ययन, सुप्त अध्ययन, अपगम अध्ययन अध्ययन संक्रमण.

6. बुद्धिमत्ता आणि समस्या परीहार 
(Intelligence and Problem Solving)
बुद्धिमत्ता : व्याख्या, बुद्धिमत्तेचे प्रकार, बुद्धिगुणांक, बुद्धिमत्ता चाचण्यांचे प्रकार बुद्धिमत्ता सिद्धांत : स्पीयरमत, गार्डनर, स्टर्नबर्ग
समस्या परीहार – स्वरूप, वैशिष्ट्ये, समस्या परीहाराची तंत्रे, समस्या परीहारात येणाऱ्या अडचणी.

7. स्मृती 
(Memory)
व्याख्या स्मृतीच्या अवस्था – वेदनीक स्मृती, अल्पक्तीक स्मृती, दिर्घकालिक स्मृती धारणा मापन पद्धती, स्मृती सुधारण्याची तंत्रे.

8. विस्मरण 
(Forgetting)
व्याख्या, विस्मरण वक्र, विस्मरण सिद्धांत, व्यत्यय सिद्धांत, स्मृती-ऱ्हास सिद्धांत, पुनर्रचनात्मकता, स्मृतीलोप.

 

RELATED PRODUCTS
You're viewing: मानसशास्त्र परिचय 240.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close