मानसशास्त्राची मूलतत्त्वे आणि प्रयोग
Foundations of Psychology and Experiments
Authors:
ISBN:
₹135.00
- DESCRIPTION
- INDEX
मानसशास्त्र हे वर्तनाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणून ओळखले जाते. आधुनिक काळात वर्तनाबरोबर प्रेरणा, भावना, व्यक्तिमत्त्व, वेदन, संवेदन,अध्ययन, स्मरण व विस्मरण आणि बुद्धिमत्ता यासारख्या मानसिक घटकांचा अभ्यास मानसशास्त्रात केला जातो.या क्रमिक पुस्तकामध्ये आम्ही मानसशास्त्रातील काही प्रमुख घटकांचा सविस्तर आढावा घेण्याचा प्रयत्न केला आहे. यामध्ये मानसशास्त्राचे स्वरूप व उद्दिष्ट्ये, मानसशास्त्राच्या शाखा व करिअर संधी, मानसशास्त्रातील विविध अभ्यास पद्धती आणि प्रायोगिक मानसशास्त्राचा इतिहास व त्याची वैशिष्टये. त्याचबरोबर प्रायोगिकीकरणातील समस्येचे महत्त्व, परिवर्त्य व त्यांचे प्रकार, प्रायोगिकीकरणातील अभ्युपगमाचे महत्त्व व प्रयोग आणि प्रायोगिक नियंत्रण याबाबत सविस्तर माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तसेच पुस्तकाच्या अंतिम टप्यात वेदन व संवेदन, अध्ययन व अध्ययनाचे प्रकार, अभिसंधानाचे प्रयोग, स्मृती व स्मृतीची प्रारूपे आणि विस्मरण व विस्मरणाची कारणे सविस्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. या पुस्तकाचे खास वैशिष्ट्ये म्हणजे जे विद्यार्थी प्रथमच मानसशास्त्र विषयाचे अध्ययन करणार आहेत त्यांना या क्रमिक पुस्तकातील सर्व संकल्पनांचे आकलन होईल अशा सोप्या भाषेत संकल्पना मांडण्याचा प्रयत्न आम्ही केला आहे.
1. मानसशास्त्राची ओळख
(Introduction to Psychology)
1.1 मानसशास्त्र : विज्ञान, ध्येये आणि दृष्टीकोन
(Psychology : Science, Goals and Perspectives of
Psychology)
1.2 मानसशास्त्राची क्षेत्रे/शाखा
(Fields of Psychology)
1.3 मानसशास्त्रातील संशोधन पद्धती :
निरीक्षण पद्धती, प्रायोगिक पद्धती, सर्वेक्षण पद्धती आणि
वृत्ताभ्यास पद्धती
(Research Methods in Psychology :
Observation Methods, Experimental Methods,
Survey Methods and Case Study)
1.4 प्रायोगिक मानसशास्त्र : इतिहास व वैशिष्ट्ये
(Experimental Psychology : History and Characteristics)
2. प्रायोगिक पद्धती
(The Experimental Method)
2.1 प्रायोगिकिकरणातील समस्येचे महत्त्व
(Importance of Problem in Experimentation)
2.2 परिवर्त्य : संकल्पना आणि परीवर्त्यांचे प्रकार
(Concept of Variables and Types of Variables)
2.3 प्रायोगिकिकरणातील अभ्युपगमाचे महत्त्व
(Hypothesis in Experimentation)
2.4 प्रयोग आणि प्रायोगिक नियंत्रण
(Experiments and Experimental Controls)
3. मूलभूत बोधात्मक प्रक्रिया
(Basic Cognitive Processes)
3.1 वेदन आणि संवेदन : संवेदनाचे स्वरूप व संवेदनाची संघटन तत्त्वे
(Sensation and Perception : Nature of Perception,
Principles of Perceptual Organization)
3.2 अध्ययन : अभिसंधान : अभिजात अभिसंधान, साधक अभिसंधान आणि निरीक्षणात्मक अध्ययन
(Learning : Conditioning-Classical Conditioning,
Operant Conditioning and Observational Learning)
3.3 स्मृती प्रक्रिया : माहिती प्रक्रियन प्रारूपे
(Memory Processes : Information Processing Model(s))
3.4 विस्मरण : विस्मरणाचे सिद्धांत
(Forgetting : Theories of Forgetting)