मूलभूत आणि बोधात्मक मानसशास्त्र
Fundamental and Cognitive Psychology
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
मानसशास्त्राचा मुख्य अभ्यास विषय ‘वर्तन’ हा आहे. वर्तनाचा शास्त्रीय दृष्टिकोनातून अभ्यास करणारे शास्त्र म्हणून आज जगात सर्वत्र मानसशास्त्राला मान्यता मिळाली आहे. मानसशास्त्राच्या या प्रवासात अनेक तत्ववेत्त्यांनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. अगदी इ.स.पूर्व काळातील ग्रीक तत्ववेत्त्वे प्लेटो व ॲरिस्टॉटल यांनी मानवाच्या मनाचा आणि आत्म्याचा अभ्यास केला. फ्राईडने मनोविश्लेषण सिद्धांत मांडून अबोध प्रेरणेचे मानवी जीवनातील महत्त्व स्पष्ट केले. तत्वज्ञ जॉन लॉक आणि थॉमस रेड यांनी अनुभववादाचा पुरस्कार केला. जर्मन तत्वचिंतक हर्बार्ट ‘मानसशास्त्र हे शरीरशास्त्र व तत्त्वज्ञानापेक्षा वेगळे आहे’ असे मत मांडले. जर्मन शरीरशास्त्रज्ञ हर्मन हेल्महोल्टझ् यांनी ‘शरीरशास्त्रीय साधनांच्या आधारे मानसिक घटनांचे स्पष्टीकरण करता येते’ असे मत मांडले. जर्मन शास्त्रज्ञ फेक्नर यांनी ‘एश्रशाशपीीं ेष झूीलहेहूीिळली’ हा ग्रंथ 1860 मध्ये लिहून मानसशास्त्राला खऱ्या अर्थाने शास्त्रीय कक्षेत आणले. म्हणून त्यास ‘मानसभौतिकीचा जनक’ मानतात. आधुनिक मानसशास्त्राच्या विकासाचे श्रेय द्यावे लागेल ते म्हणजे जर्मन शरीरशास्त्रज्ञ आणि तत्त्वज्ञानी विल्यम वुडण्ट यांना. विल्यम वुडण्ट यांनी मानसशास्त्राला शास्त्रीय दर्जा प्राप्त करून दिला आणि मानसशास्त्राला एक नवीन ओळख प्राप्त करून दिली. त्यामुळे विल्यम वुडण्टला आधुनिक मानसशास्त्राचा जनक म्हणतात. अशा प्रकारे तत्त्वज्ञानाशी बांधलेले मानसशास्त्र आज एक स्वतंत्र शास्त्र म्हणून ओळखले जाऊ लागले.
1. मानसशास्त्राची ओळख
(Introduction to Psychology)
1.1 मानसशास्त्राचे स्वरुप
(Nature of Psychology)
1.2 मानसशास्त्रातील आधुनिक दृष्टिकोन
(Modern Perspectives of Psychology)
1.3 मानसशास्त्राची विविध क्षेत्रे
(Branches of Psychology)
1.4 मानसशास्त्राच्या अभ्यासपद्धती
(Study Methods of Psychology)
1.5 भारतीय मानसशास्त्र : मानसशास्त्राची पार्श्वभूमी आणि तात्विक अधिष्ठान
(The Indian Psychology : Background and Philosophical origin. Psychology in modern India.)
1.6 मानसशास्त्रातील करिअर
(Career in Psychology)
2. वर्तनाचे जैविक अधिष्ठान
(Biological Bases of Behaviour)
2.1 रंगसुत्रे, डीएनए : लिंगनिश्चिती, जुळे
(Chromosomes, Genes & DNA : Sex Determination, Twins)
2.2 चेतापेशी/नसपेशी रचना व कार्ये
(Neuron Structure & Function)
2.3 चेतापारेषक
(Neurotransmitters)
2.4 केंद्रीय नससंस्था
(Central Nervous System – CNS)
2.5 ग्रंथी संस्था – प्रकार आणि कार्य
(Endocrine Glands)
2.6 उपयोजन : अनुवंशाच्या संदर्भात समुपदेशनाचे महत्त्व किंवा जनुकीय समुपदेशन
(Application : Genetic Counselliing)
3. व्यक्तिमत्त्व आणि स्व-संकल्पना
(Personality and Self Concept)
3.1 व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप
(Nature of Personality)
3.2 व्यक्तिमत्त्वावर आकार देणारे घटक
(Factors of shaping Personality)
3.3 व्यक्तीमत्त्वाचे गुणतत्त्व सिद्धांत (ऑलपोर्ट, कॅटेल, 16PF)
(Trait Approach of Personality)
3.4 व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत
(Theories of Personality)
3.5 व्यक्तिमत्त्व मापन
(Personality Assessment)
3.6 स्व-संकल्पना
(Self-Concept)
3.7 उपयोजन : SWOT आणि SMART विश्लेषण
(Applying Psychology : SWOT and SMART Analysis)
3.8 व्यक्तिमत्त्व विकासात जीवनकौशल्यांचे महत्त्व
(Application : Life Skills & Personality Development)
4. प्रेरणा आणि भावना
(Motivation and Emotion)
4.1 प्रेरणेचे स्वरूप आणि व्याप्ती, प्रेरणा चक्र, गरजानुवर्ती सिद्धांत
(Nature of Motivation)
4.2 प्रेरणेचे प्रकार – जैविक/शारीरिक/प्राथमिक
(Types of Movtivation)
4.3 प्रेरणाविषयक सिद्धांत – सहजप्रवत्ती, प्रथोदना-क्षय, जागरण, प्रलोभन
(Approach of Motivation)
4.4 भावना – स्वरूप आणि कार्य, प्रकार, भावनाअंतर्गत होणारे बदल
(Emotion: Nature and functions of emotions,)
4.5 भावनिक बुद्धीमत्ता – गोलमनचा सिद्धांत
(Emotional Intelligence, Goleman’s Model of EI)
5. अवधान आणि संवेदन
(Attention and Perception)
5.1 अवधान – व्याख्या, स्वरूप, वैशिष्ट्य, प्रकार
(Attention- Meaning, Nature, Characteristics and Types)
5.2 अवधानाची नियामके
(Determinants of Attention)
5.3 संवेदनाचे स्वरूप
(Determinants of Perception)
5.4 संवेदनाची वैशिष्ट्य आणि घटक
(Characteristics and Factors of Perception)
5.5 संवेदनाची तत्त्वे
(Principles of Perception)
6. बोधावस्था
(Consciousness)
6.1 बोधावस्था – अर्थ आणि स्वरूप
(Meaning & Nature of Consciousness)
6.2 जागृत मनाच्या पालटलेल्या स्थितीतील अनुभूती
(Altered States of Consciousness)
6.3 झोप- झोपेचे प्रकार, झोपेच्या विकृती, निद्रादोष
(Stages of Sleep, Sleep Deprivation, Sleep Disorders)
6.4 संमोहन – संमोहन उपयोग, चुकीचे समज
(Fact, myths and applications of Hypnosis)
7. अध्ययन, स्मृती आणि विस्मरण
(Memory and Forgetting)
7.1 अध्ययन – स्वरूप, व्याप्ती, प्रकार
(Nature, Types of Learning)
7.2 अभिजात अभिसंधान – पेव्हलॉव्हचा प्रयाग, अभिजात अभिसंधानाचे वैशिष्ट्ये
(Classical Conditioning)
7.3 साधक अभिसंधान – स्कीनरचा प्रयोग, प्रबलक शिक्षा
(Operant Conditioning -Skinner’s experiment, Role of
Reinforcement and Punishment)
7.4 स्मृती – स्वरूप, प्रक्रिया, प्रकार
(Nature, Process and Type of Memory)
7.5 विस्मरण – स्वरूप, कारणे
(Nature and Causes of Forgetting)
8. विचार प्रक्रिया आणि समस्या सोडविणे
(Thinking and Problem Solving)
8.1 विचार प्रक्रियेचे स्वरूप, व्याख्या, प्रकार
(Meaning, Types, Nature of Thinking)
8.2 सर्जनशीलता, नवनिर्मिती
(Creativity, innovation)
8.3 समस्या सोडविणे आणि निर्णय घेणे
(Applied Psychology : Problem Solving)
Related products
-
प्राकृतिक भूगोल
₹285.00