मूलभूत शेअर बाजार
Basics of Stock Market
Authors:
ISBN:
₹150.00
- DESCRIPTION
- INDEX
जगप्रसिद्ध गुंतवणूक तज्ज्ञ आणि मोठा गुंतवणूकदार वारेन बफेट म्हणतात. “जर तुम्हाला झोपण्याच्या वेळेस, झोपेत असताना पैसे कमावण्याची एखादी पद्धत सापडत नसेल तर मग तुम्हाला मरेपर्यंत कामच करत राहावे लागेल.” पैसे कमावण्याच्या संदर्भात एक विधान केले जाते. “जर तुमच्याकडे पैसा आहे तर मग तुम्हाला काम करण्याची गरज नाही. तुम्ही पैशाला कामाला लावा स्वत:ला नाही.” या दोन्ही विधानांचा अंगुली निर्देश शेअर बाजारातील गुंतवणुकीकडे आहे. जेव्हा तुम्ही दीर्घकाळासाठी वित्तीय नियोजन करतात, तेव्हा तुमच्यासमोर शेअर बाजार हा सक्षम पर्याय आहे. शेअर बाजारात एकदा का विचारपूर्वक गुंतवणूक केली किंवा शेअर ट्रेडिंग केले की मग शेअर बाजारातील चढ उतारांनी तुमच्या Portfolio मध्ये आणि संपत्तीत वाढ होते. मग तुम्ही काम करा की करु नका, झोपेत असा की जागे असा, सुटीवर असा की पर्यटनाला असा. तुमचा पैसा या बाजारात वाढत जातो आणि तुमच्या दीर्घकालीन योजना यशस्वी होतात. पण यासाठी शेअर बाजाराचे बेसिक नॉलेज असणे, अनुभव व कौशल्य असणे, बाजार विश्लेषण करणे यासारखे बौद्धिक श्रम करण्याची तयारी हे सर्व आवश्यक आहे.
1. शेअर बाजाराचा परिचय
(Introduction to Stock Market)
1.1 शेअर बाजार : अर्थ, व्याख्या, भूमिका/महत्व
1.2 बचत आणि गुंतवणूक
1.3 शेअर बाजारातील गुंतवणूक साधनांचे प्रकार
1.4 स्टॉक एक्सचेंज
2. शेअर बाजाराचे प्रकार आणि अनुजात
(Types of Share Market and Derivatives)
2.1 शेअर बाजाराचे प्रकार
2.2 IPO & FPO
2.3 ग्रे-मार्केट
2.4 पतमापन एजन्सीज्
2.5 जोखिमांकन/अंडररायटिंग
2.6 शेअर बाजारातील मध्यस्थ/सहभागक आणि खेळाडू
2.7 अनुजात/डेरिव्हेटिव्हज
2.8 तेजीवाला, मंदीवाला आणि शेअर विभाजन
3. शेअर बाजारातील व्यापार
(Trading in Stock Market)
3.1 शेअर/रोखे व्यापार
3.2 कॅश, फ्युचर आणि ऑप्शन मार्केट
3.3 रोखे व्यापाराचे प्रकार
3.4 शेअर बाजारातील आदेश
3.5 प्रमिअम रक्कम आणि रोखे बंच आकार
3.6 अप्पर अँड लोवर सर्किट
4. म्युच्युअल फंड
(Mutual Fund)
4.1 म्युच्युअल फंडाचे उद्देश
4.2 म्युच्युअल फंडाचे लाभ
4.3 म्युच्युअल फंडाचे प्रकार
4.4 भारतातील प्रमुख म्युच्युअल फंड कंपन्या