ओझरता आधुनिक भारत
Glimpses of Modern India
Authors:
ISBN:
₹325.00
- DESCRIPTION
- INDEX
इ.स.1612 मध्ये सुरत येथे इंग्रजांची पहिली वखार स्थापन झाली. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म इ.स.1630 मध्ये झाला. छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात स्वराज्याची बीजे या देशात रोवली गेली. मोगलानंतर ब्रिटिशांनी येथे राज्य स्थापन करुन भारतीयांना गुलाम बनविले. परंतु छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्याची रोवलेली बीजे तशीच सुप्त अवस्थेत राहिली. त्यांतून 1857 चा स्वातंत्र्य संग्राम आणि 1885 मधील राष्ट्रीय काँग्रेसची स्थापन यातून पुन्हा संघर्ष सुरु झाला. हा संघर्ष सनदशीर मार्गाचा होता. दादाभाई नवरोजी यांनी कलकत्ताच्या अधिवेशनात चतुःसूत्रीला मान्यता देवून त्यांतून जहाल-मवाळ पक्ष निर्माण झाले. महात्मा गांधीजींनी असहकार व सविनय कायदेभंगाची चळवळ करुन ब्रिटिशांना काही घटनात्मक सुधारणा करण्यास भाग पाडले. शेवटी चलेजाव आंदोलन आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांची आझाद हिंद सेना यांनी ब्रिटिशांना नमविले आणि त्यातून भारताला स्वातंत्र्य मिळाले. नवीन राज्यघटना तयार झाली. त्या मध्ये काही भारतीय राज्यघटनेची वैशिष्ट्ये होती या साऱ्यांचा संक्षिप्त आढावा म्हणजे हा ग्रंथ होय.
1. ब्रिटिश प्रशासन ते आधुनिकीकरण पर्यंतचा प्रवास
(British Rule and the Journey Towards Modernity)
अ) ब्रिटिश सत्तेचा उदय आणि विचार
(Rise and Expansion of British Power)
ब) ब्रिटिशांचे धोरण
(British Policies)
क) 1857 च्या उठावातील घटना
(Events of 1857)
ड) शिक्षण आणि वृत्तपत्रे
(Education and Newspapers)
2. सामाजिक व धार्मिक सुधारणा चळवळी
(Socio-Religious Reform Movement)
अ) ब्राम्हो समाज
(Brahmo Samaj)
ब) प्रार्थना समाज आणि आर्यसमाज
(Prarthana Samaj and Arya Samaj)
क) सत्यशोधक समाज
(Satyashodak Samaj)
ड) शीख, पारशी आणि इस्लाम धर्मातील सुधारणा
(Sikh, Parsee and Islamic Religious Reforms)
3. भारतातील राष्ट्रवाद
(Indian Nationalism)
अ) भारतातील राष्ट्रवादाचा उदय आणि विकास
(Rise and Growth of Indian nationalism)
ब) राष्ट्रीय काँग्रेस, मवाळवादी आणि जहालवादी
(Indian National Congress- Moderate Nationalists and Assertive Nationalists)
क) क्रांतीकारी चळवळ
(Revolutionary Movement)
4. जन आंदोलनाचा उदय आणि विकास
(Rise and Growth of Mass Movements)
अ) असहकार आंदोलन
(Non-Cooperation Movement)
ब) सविनय कायदेभंग चळवळ
(Civil Disobedience Movement)
क) चले जाव आंदोलन
(Quit India Movement)
ड) आझाद हिंद सेना
(Azad Hind Sena)
5. बंधमुक्तीची चळवळ
(Movements of the underprivileged)
अ) शेतकऱ्यांच्या चळवळी
(Farmers Movement)
ब) कामगार चळवळ
(Workers Movement)
क) स्त्रीविषयक चळवळ
(Women’s Movement)
ड) दलित चळवळ
(Dalit Movement)
इ) आदिवासींच्या चळवळी
(Tribal Movement)
6. घटनात्मक विकास (इ.स.1773-1919)
(Constitutional Development)
अ) इ.स.1773-1919 या काळातील घटनात्मक विकास
(A brief background of constitutional development -1773 to 1919)
ब) भारत सरकारचा 1935 चा कायदा
(Government of India Act of 1935)
क) घटनात्मक प्रगती (इ.स.1942 ते 1947)
(Constitutional Progress (1942 to 1947)
ड) भारतीय राज्य घटनेची वैशिष्ट्ये
(Salient features of the Indian Constitution)