प्राचीन भारत (प्रारंभापासून ते इ.स. 1000 पर्यंत)
Ancient India (From Earliest Times 1000 A.D.)
Authors:
ISBN:
₹295.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रारंभी ब्रिटिशांनी भारतीय संस्कृती ही आधुनिक असल्याचे स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला. पण या गोष्टीवर भारतीयांचा विश्वास नव्हता. कारण या देशातील धर्म, चालीरिती, श्रद्धा, रूढी आणि परंपरा या प्राचीन असल्याचे स्पष्ट दिसत होते. परंतु ईस्ट इंडिया कंपनीचे नोकर या प्राचीन संस्कृतीस मान्य करावयास तयार नव्हते. परंतु 19 व्या शतकात पंजाबमध्ये रेल्वे रूळ टाकण्याचे काम सुरु झाले आणि त्याठिकाणी प्राचीन वीटा आणि प्राचीन संस्कृतीचे अवशेष सापडू लागले आणि त्यातून ब्रिटिशांचे डोळे खाडकन उघडले. उत्खनन करण्यात आले तेव्हा मोहेनजोदाडो आणि हडाप्पा सारखी प्राचीन शहरे सापडली. सिंधु संस्कृतीचा शोध लागला. उत्कृष्ट नगर रचना, आरोग्यासाठी केलेली सांडपाण्याची व्यवस्था, स्नानगृह, मनोरंजनाची साधने जेव्हा तेथे उत्खननात सापडली त्यावेळी भारतीय संस्कृती जगातील प्राचीन चीन, इजिप्त आणि बॅबिलोनिया या प्राचीन संस्कृतीच्या रांगेत जावून बसली. आर्य संस्कृतीने या देशाला नवा मंत्र दिला. जैन आणि बौद्धांनी त्यातील दोष काढून येथील मानवाला अहिंसेचा संदेश दिला. सद्वर्तन आणि नैतिकता त्यांनी शिकविली. शिल्प आणि सांस्कृतिकजीवनात बदल घडविले. नंतर मौर्य, गुप्त, वर्धन, शुंग, राष्ट्रकूट इत्यादी यासारखी नवीन घराणी उदयास आली. येथील जीवनात क्रांती घडावी अतएव येथे नालंदा, तक्षशीलासारखी विद्यापीठे जन्मास आली. अरबांना या शैक्षणिक केंद्रांचे महत्व न कळाल्याने त्यांनी ती उध्वस्त केली. पण त्यापूर्वीच आग्नेय आशियात भारतीय संस्कृती जावून पोहोचली होती. यासारख्या अनेक गोष्टींचा अभ्यास म्हणजे प्राचीन भारत हा ग्रंथ होय.
प्रकरण 1.
प्राचीन भारताच्या इतिहासाची साधने
Sources of Ancient India
अ) पुरातत्वीय साधने आणि नाणी
(Archaeological Sources and Numismatics)
ब) वाङ्मयीन साधने (Literary Sources)
क) परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते (Foreign Travelers Accounts)
प्रकरण 2.
सिंधू संस्कृती
Indus Valley Civilization
अ) सामाजिक आणि आर्थिक जीवन
(Socio – Social and Economic Life)
ब) धार्मिक जीवन (Religious Life)
क) नगर रचना आणि विनाशाची कारणे
(Town Planning and Decline of the Civilization)
प्रकरण 3
वैदिक युग
Vedic Age
अ) राजकिय आणि सामाजिक जीवन
(Political and Social Life)
ब) आर्थिक आणि धार्मिक जीवन
( Economic and Religious Life)
क) जनपद-प्रशासन (Janapada- Administation)
प्रकरण 4.
इ.स.पू. 6 व्या शतकातील हिंदुस्थान
India after 6th Century B.C.
अ) जैन धर्म (Jainism)
ब) बौद्ध धर्म (Buddhism)
क) वैद्यक शास्त्रातील प्रगती
(Development of Medical Science)
प्रकरण 5.
मौर्य आणि मौर्योत्तर कालखंड (इ.स.पूर्व 322 ते इ.स.320)
Mauryan and Post Mauryan Period (322 B.C. to 320 A.D.)
अ) चंद्रगुप्त आणि अशोक (Chandragupta and Ashoka)
ब) मौर्यकालीन प्रशासन (Mauryan Administration)
क) मौर्योत्तर घराणी – शुंग, कुशाण आणि सातवाहन
(Post Mauryan Dynasties. Sungas, Kushanas & Satavahanas)
प्रकरण 6.
गुप्त साम्राज्य (इ.स.पूर्व 320 ते इ.स. 600)
Gupta Age (320 A.D. to 600 A.D.)
अ) चंद्रगुप्त प्रथम, समुद्र गुप्त आणि चंद्रगुप्त द्वितीय
(Imperial Expansion. Chandragupta-I, Samudragupta an
Chandragupta-II)
ब) प्रशासन (Administration)
क) अभिजात युग (Debate of Classical Age)
प्रकरण 7
गुप्तेत्तर कालखंड (इ.स. 600 ते इ.स. 1000)
Post Gupta Period (600 A.D. to 1000 A.D.)
अ) हर्षवर्धनचा युग (The Age of Harshavardhan)
ब) राजपुतांचा उदय (The Rise of Rajputs)
क) सिंधवरील अरबांचे आक्रमण (Arab Invasion of Sind)
प्रकरण 8
दक्षिणेतील प्रमुख घराणी आणि आग्नेय आशिया
(Major Dynasties of Deccan and South India)
अ) चोल आणि पल्लव (Cholas and Pallavas)
ब) बदामीचे चालुक्य आणि चालुक्य घराण्यातील कल्याणीचे राष्ट्रकूट
(Chalukyas of Badami & Chalukyas of Kalyani Rashtrakutas)
क) आग्नेय आशियात भारतीय संस्कृतीचा प्रसार
(Spread of Indian Culture in South-East Asia)