Prashant Publications

My Account

प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास

History of Jainism and Buddhism in Ancient India

Authors: 

ISBN:

SKU: 9789348040879
Marathi Title: Prachin Bharatatil Jain va Bauddha Dharmacha Itihas
Book Language: Marathi
Published Years: 2024
Pages: 118
Edition: First
Category:

160.00

  • DESCRIPTION
  • INDEX

जगामध्ये फ्रेंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती आणि रशियन क्रांती अशा काही क्रांत्या झाल्या आणि त्याने सारे जग ढवळून निघाले. हिंदुस्थानात मात्र या आधुनिक काळातील क्रांतीपेक्षा अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण क्रांती इ.स. पूर्व 6 व्या शतकात भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्ध यांनी घडवून आणली. ज्या काळात वैदिक धर्माचे वर्चस्व होते. त्याकाळात या दोन महापुरूषांनी भारतीय संस्कृतीला नवा आयाम दिला. नवे आशेचे किरण दाखविले. जेथे हिंसा मोठ्या प्रमाणात होत होती तेथे त्यांनी सर्व प्राणीमात्र एकसमान आहेत. तेव्हा त्यांचा यज्ञात कां बळी देता? असा प्रश्न विचारला आणि या देशाची पशुद्वारे होणारी हिंसा थांबविली. त्यांनी पशुहत्येचा निषेध केला. राजे लोक अश्वमेधासारखे यज्ञ करीत. रंतीदेव या राजाने तर एवढा मोठा यज्ञ केला की, त्यांतून पशुंचे जे कातडे निघाले ते वाळविण्यासाठी त्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावर पसरविले. तेव्हा नदीचे दोन्ही किनारे या चर्मन म्हणजे कातड्याने भरुन गेले. अतएव ती नदी ‌‘चर्मण्वती’ या नावाने ओळखली जाऊ लागली. भगवान महावीर आणि भगवान गौतमबुद्धांनी या गोष्टींचा निषेध केला. परमेश्वराची भक्ती करण्यासाठी मध्यस्थ म्हणजे पुरोहिताची गरज नाही, हे त्यांनी स्पष्ट केले. भगवान आदिनाथ यांच्या काळापासून चालत आलेल्या जैन धर्माचा भगवान महावीर यांनी उद्घोष केला. तर भगवान गौतमबुद्धांनी चार आर्यसत्ये आणि अष्टांगमार्गाद्वारे मानवी जीवन सुखी करण्याचा प्रयत्न केला. सदाचार आणि नीतीने वागणे हाच खरा धर्म आहे याची शिकवण वरील दोन्ही महापुरूषांनी दिल्याने भारतीय संस्कृती ही समृद्ध बनली. या दोन्ही महापुरूषांनी केलेल्या कार्याचा आणि त्यांनी उद्घोषित केलेल्या धर्माचा हा इतिहास म्हणजेच हा ग्रंथ होय.

1. प्राचीन भारतीय इतिहासाची साधने 
(Sources of Ancient Indian History)
1. पुरातत्त्वीय साधने
(Archaeological Sources)
2. वैदिक वाङ्मय
(Vedic Literature)
3. जैन व बौध्द वाङ्मय
(Jain and Bouddha Literature)
4. परदेशी प्रवाशांची प्रवासवृत्ते
(Accounts of Foreign travelers)

2. जैन धर्माचा उदय, तत्त्वज्ञान आणि धर्मप्रचार 
(Rise, Philosophy and Spread of Jainism)
1. जैन धर्माचा उदय
(Rise of Jainism)
2. महावीराचे जीवन
(Biography of Vardhaman Mahaveer)
3. जैन धर्माचे तत्त्वज्ञान
(Philosophy of Jainism)
4. जैन धर्माचा प्रसार
(Spread of Jainism)

3. जैन धर्मातील पंथ आणि सांस्कृतिक योगदान 
(Sects and Cultural Contribution of Jainism)
1. जैन धर्मातील पंथ
(Sects in Jainism)
2. जैन धर्मातील कला व वास्तुशिल्प
(Art and Architecture in Jainism)
3. जैन धर्माची शैक्षणिक केंद्रे
(Educational Centers of Jainism)
4. जैनांचे सांस्कृतिक योगदान
(Cultural Contribution of Jainism)

4. बौध्द धर्माचा उदय, तत्त्वज्ञान आणि धर्मप्रसार 
(Rise, Philosophy and Spread of Buddhism)
1. बौध्दधर्माचा उदय
(Rise of Buddhism)
2. सिध्दार्थ गौतम बुध्दाचे जीवन
(Biography of Siddhartha Gautam Buddha)
3. बौध्द धर्माचे तत्त्वज्ञान
(Philosophy of Buddhism)
4. बौध्द धर्माचा प्रसार
(Spread of Buddhism)

5. बौध्द धर्मातील पंथ, धर्म परिषदा आणि राजाश्रय 
(Sects, Councils and Patrons of Buddhism)
1. बौध्द धर्मातील पंथ
(Sects in Buddhism)
2. धर्म परिषदा
(Buddhist Councils)
3. सम्राट अशोकाचे बौध्द धर्मातील योगदान
(Samrat Ashoks’ Contribution of Buddhism)
4. सम्राट हर्षवर्धनचे बौध्द धर्मातील योगदान
(Samrat Harshwardhan’s Contribution of Buddhism)

6. बौध्द धर्मातील कला, वास्तुकला आणि सांस्कृतिक योगदान 
(Art, Architecture and Cultural Contribution of Buddhism)
1. बौध्द धर्मातील कला आणि वास्तुकला
(Art and Architecture in Buddhism)
2. बौध्द धर्माची शैक्षणिक केंद्रे
(Educational centers of Buddhism)
3. बौध्द धर्माचा सामाजिक जीवनावरील परिणाम
(Social effects of rise of Buddhism)
4. बौध्द धर्माचे सांस्कृतिक योगदान
(Cultural Contribution of Buddhism)

RELATED PRODUCTS
You're viewing: प्राचीन भारतातील जैन व बौद्ध धर्माचा इतिहास 160.00
Add to cart
Prashant Publications
Shopping cart close