प्राचीन भारतीय ज्ञान परंपरा
Ancient Indian Knowledge Tradition
Authors:
ISBN:
₹260.00
- DESCRIPTION
- INDEX
भारताची प्राचीन परंपरा आणि सांस्कृतिक वारसा हा जगाला प्रेरणादायक आहे. राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या आधारे, आपल्या तरुणपिढीला प्राचीन भारतीय ज्ञान, मूल्यं आणि तंत्रज्ञानाची ओळख करून देण्याचा प्रयत्न केला आहे.
यात गुरुकुल परंपरेच्या माध्यमातून आचार्यांनी विद्यार्थ्यांना दिलेल्या सर्वांगीण शिक्षणाचा उलगडा केला आहे. योगसाधना, ज्योतिष, साहित्य, संगीत, कला, दर्शनशास्त्र, नीतीशास्त्र, विज्ञान, खगोलशास्त्र, पारंपरिक चिकित्सा, आरोग्य, संरक्षण आणि युद्धकलेसारख्या विषयांवर प्रकाश टाकण्यात आला आहे. मुख्य विषय : प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली व ज्ञानस्रोत, प्राचीन भारतीय विद्यापीठांचे योगदान, प्राचीन भारतातील विज्ञान व तंत्रज्ञान, भारतीय कला व सांस्कृतिक परंपरा.
विद्यार्थ्यांच्या उपासना, व्यक्तिमत्त्व विकास, राष्ट्रीय एकात्मता, मानवतेचा आदर आणि सांस्कृतिक तत्त्वज्ञान यांचे महत्त्व पटवून दिले आहे.
1. प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली व ज्ञानस्रोत
1.1 भारतवर्ष संकल्पना : भौगोलिक पार्श्वभूमी, अखंड भारत, शिक्षण परंपरा, सिंधू संस्कृती, प्राचीन भारतीय शिक्षण, शिक्षणाचे महत्त्व 1.2 वैदिकाकालीन शिक्षण व्यवस्था : वैदिक शिक्षण उद्दिष्ट्ये, प्राचीन ज्ञानस्त्रोत, वेद थोडक्यात, चातुर्वर्ण्य, वेदांगे – (1) ऋग्वेद (2) यजुर्वेद (3) सामवेद (4) अथर्ववेद; उपनिषदे, पुराणे – (1) मत्स्यपुराण (2) ब्रम्हपुराण (3) विष्णुपुराण (4) पद्मपुराण (5) गरुडपुराण; त्रिपिटक 1.3 वेदीक दर्शन : सांख्यदर्शन, योगदर्शन, न्यायदर्शन, वैशेषिक दर्शन, मीमांसादर्शन, वेदांत 1.4 बौद्ध धर्म : जैन धर्म, आजीवक, चार्वाक, दीग्नाग
2. प्राचीन भारतीय विद्यापीठ
2.1 देवगिरी प्रांत व पाटण : नृत्यकला, नाट्यकला, संगीतकला (भारतीय संगीत), गायन कला, समाज व राजनीति, प्राचीन भारतीय कुटुंब-व्यवस्था, राजनीती आणि प्रशासन, सैन्यसंघटन, पायदळ, घोडदळ, रथसेना, हत्तीदळ, नौकानयन, वैद्यकीय उपयोग, सैन्यस्थिती; शस्त्रास्त्रे, गुप्तहेर व दूत, युद्ध संचलन, युद्धकला, आंतरराज्य संबंध, जनपद व ग्रामस्वराज्य, शस्त्रास्त्रे 2.2 प्राचीन भारतीय विद्यापीठ : (1) तक्षशिला विद्यापीठ (2) नालंदा विद्यापीठ (3) बनारस हिंदू विश्वविद्यालय / वाराणसी/ काशी (4) कांची विद्यापीठ (5) वल्लभी विद्यापीठ (6) विक्रमशिला विद्यापीठ; प्राचीन भारतीय शिक्षणाची अन्य क्षेत्रे : शिक्षण स्थाने – (1) तिरुवोरियूर (2) सालोटगी (3) मलकापूरम 2.3 उपाध्याय व आचार्य : (1) आचार्य कौटिल्य (2) जीवक (3) पाणिनी (4) नागार्जुन (5) नागसेन (6) भास्कराचार्य (7) ब्रम्हगुप्त (8) आर्यभट्ट (9) वराहमिहिर; धर्म व दर्शन 2.4 प्रवासी : (1) फाहियान (2) हयूएनत्संग (युआनच्वांग) (3) इत्सिंग (4) अल्बेरुनी/अल-बीरुनी 2.5 आयुर्वेद : अष्टांग आयुर्वेद, निसर्गोपचार, युनानी वैद्यकशास्त्र, योगशास्त्र, योगसाधना
3. प्राचीन भारतातील विज्ञान आणि तंत्रज्ञान
3.1 प्राचीन भारतीय व्यापार-वाणिज्य व आयात-निर्यात : कृषी; व्यापार आणि वाणिज्य – (1) मणी (2) मातीकाम (3) काच (4) मेण (5) मूर्तीकला 3.2 प्राचीन भारतीय उद्योग : (1) खाणकाम उद्योग (2) धातू (3) लोह व पोलादउद्योग – लोहस्तंभ मेहेरौली; धातुशास्त्र – (1) तांबे (2) सोने (3) चांदी (4) शिसे व जस्त 3.3 दळणवळण-वाहतूक : (1) रथ (2) घोडे (3) हत्ती (4) बैलगाडी (5) उंट गाडी; जलमार्ग वाहतुक; नौदल; बंदरे – (1) चौलबंदर (2) ताम्रलिप्ती (3) सोपारा; आयात-निर्यात
4. प्राचीन भारतीय कला व तंत्रज्ञान संस्कृती
4.1 भारतीय स्थापत्य कला : वास्तुकला – (1) इजिप्शियन वास्तुकला (2) मेसोपोटेमियन वास्तुकला (3) ग्रीक वास्तुकला (4) रोमन वास्तुकला (5) ईसाई/ख्रिस्ती वास्तुकला (6) बायझांटिन वास्तुकला (7) रोमनेस्क वास्तुकला (8) गॉथिक वास्तुकला (9) प्रबोधनकालीन वास्तुकला (10) आधुनिक वास्तुकला (11) पौर्वात्य वास्तुकला (12) भारतीय वास्तुकला; धार्मिक वास्तु, लौकिक वास्तु, हडप्पा संस्कृती, मौर्यपूर्व आणि मौर्यकालीन वास्तू, वास्तु पुरुष; शैली किंवा वास्तुसंप्रदाय – (1) गुहा वास्तुकला (2) मंदिर वास्तुकला (3) वेरूळ लेण्या (4) किल्ले 4.2 कला प्रकार : (1) लोककला (2) सादरीकरण कला (3) दृष्यकला (4) आदिवासी कला (5) वारली चित्रकला 4.3 प्राचीन भारतातील गणित, खगोलशास्त्र, आर्थिक विकास : (1) गणितशास्त्र (2) खगोलशास्त्र (3) आर्थिक विकास (4) भूगोल (5) मानसशास्त्र
स्वाध्याय (पर्यायी प्रश्नोत्तरे)
परिशिष्ट 1 : प्राचीन भारतीय ज्ञानपरंपरेतील विद्वान
परिशिष्ट 2 : सिंधू संस्कृती/ऐतिहासक कालावधी
परिशिष्ट 3 : पाठ्यक्रम-विषय