प्राचीन भारतीय ज्ञानप्रणाली
Indian Knowledge Systems
Authors:
ISBN:
₹175.00
- DESCRIPTION
- INDEX
मानवी सभ्यतेत ज्ञानाचे व शिक्षणाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. एखाद्या मानवी समुहाने आत्मसात केलेले ज्ञान हे त्याच्या प्रगतीचे व मानवी सभ्यतेचे द्योतक असते. भारतीय ज्ञानप्रणालीचे शिक्षण संक्रमणातील स्थान व एकूणच शैक्षणिक उत्क्रांतीतील महत्त्व व मानवी सभ्यतेचे ऐतिहासिक उल्लेख लक्षात घेता भारतीय ज्ञानप्रणाली व तिचे महत्व जाणून घेणे अगत्याचे आहे. मौखिक ज्ञान परंपरा, मानवी संस्कृतीला विविध आयाम प्रदान करणाऱ्या चालीरीती, सण-उत्सव, धार्मिक ग्रंथ, परंपरागत व्यवसाय, प्राचीन तंत्रज्ञान याद्वारे भारतीय ज्ञानपरंपरा पुढील पिढ्यांकडे संक्रमित होतांना दिसते. अर्थात भारतीय ज्ञानप्रणालीला हजारो वर्षांची परंपरा लाभली आहे. या ज्ञानप्रणालितूनच भारत एक राष्ट्र म्हणून सांस्कृतिक एकात्मतेच्या बहुसांस्कृतिक धाग्यात जोडला गेला आहे. भारतीय राष्ट्रवादाचे अधिष्ठान ‘भारतीय संस्कृतीत’ आहे, असे डॉ. राममनोहर लोहिया यांनी म्हटले आहे.
– राजेंद्र नन्नवरे
वन्यजीव अभ्यासक
1. भारतातील प्राचीन ज्ञानप्रणाली व ज्ञानस्त्रोत यांचा परिचय
1.1 प्रस्तावना
1.2 खघड ची संकल्पना व भारतीय ज्ञानप्रणालीचे महत्त्व
1.3 प्राचीन ज्ञान स्रोतांचा परिचय
1.4 चार वेद
1.5 वेदांग
1.6 इतिहास व पुराणे
1.7 चार उपवेद
1.8 वेदाचे चार उपांग
1.9 भारतीय दर्शने
1.10 बौद्ध व जैन परंपरा
2. प्राचीन भाषा शिक्षण, शिक्षक, विद्वान, विद्यापीठे व शिक्षण केंद्रे
2.1 प्रस्तावना
2.2 देवगिरी प्रांतातील भास्कराचार्यांचे पाटण व लीलावती
2.3 प्राचीन भारतीय भाषा
2.4 प्राचीन भारतीय विद्यापीठे
2.5 प्राचीन भारतातील शिक्षण केंद्रे
2.6 उपाध्याय व आचार्य
2.7 ज्ञानार्जनार्थ भारतात आलेले प्रवासी
3. कृषी, वाणिज्य व व्यापार
3.1 प्रस्तावना
3.2 प्राचीन भारतीय पिके, कृषी अवजारे, बियाणे तंत्रज्ञान, खते,
वेदांतील जलविज्ञान
3.3 व्यापार आणि वाणिज्य
3.4 दळणवळणाची साधने
3.4 आयात आणि निर्यात
4. प्राचीन भारतीय कला, स्थापत्यशास्त्र व तंत्रज्ञान
4.1 प्रस्तावना
4.2 चौसष्ट कलाप्रकार
4.3 स्थापत्य व नगररचना शास्त्र, किल्ले, नद्यांचे घाट
4.4 शस्त्रास्त्रे, खगोलशास्त्र, भूगोल, वैद्यकशास्त्र, गणित, मानसशास्त्र
4.5 धातुशास्त्र