प्राकृतिक भूगोलाची मूलतत्त्वे
Principles of Physical Geography
Authors:
ISBN:
₹250.00
- DESCRIPTION
- INDEX
प्राकृतिक भूगोलाचा अभ्यास भूगोलशास्राच्या अध्ययनात अत्यंत महत्त्वाचा आहे. या विषयात समाविष्ट असलेल्या संकल्पना वैज्ञानिक तत्त्वांवर आधारित असल्यामुळे, त्या समजून घेणं आवश्यक आहे. विद्यार्थ्यांसाठी भूगोलशास्त्राच्या इतर शाखांचा अभ्यास सोपा होण्यासाठी, प्राथमिक पातळीवर प्राकृतिक भूगोलाच्या संकल्पना समजून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणूनच संकल्पनांची मांडणी सोप्या व सुसंगत पद्धतीने केली आहे.
विद्यार्थ्यांना प्राकृतिक भूगोलाचा सखोल अभ्यास करता यावा, म्हणून त्यात सूर्यकुल (सूर्यमाला), ग्रहण, पृथ्वीच्या गती, अक्षांश व रेखांश, वेळेचे मापन, चंद्र आणि चंद्रग्रहण यांसारख्या महत्त्वपूर्ण मुद्द्यांचा समावेश केला आहे. तसेच विविध संकल्पनांचे स्पष्टीकरण आकृत्यांच्या सहाय्याने केले आहे, त्यामुळे संकल्पना अधिक स्पष्ट होतात. पुस्तकात एकूण 66 आकृत्या दिलेल्या आहेत, या पुस्तकाचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य आहे.
प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी वस्तुनिष्ठ व दीर्घोत्तरी प्रश्न दिले आहेत, ज्यामध्ये भौगोलिक संकल्पनांची उपयोजनेची गहनता दिसून येते. हे प्रश्न एम.पी.एस्सी., यु.पी.एस्सी., नेट-सेट यासारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी उपयुक्त आहेत.
1. भूगोल आणि प्राकृतिक भूगोल – व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व
भूगोलाचे स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व – ‘भूगोल’ संज्ञेचा अर्थ, भूगोलाच्या व्याख्या, भूगोलाचे स्वरूप, निसर्गवाद (Determinism) किंवा पर्यावरणवाद (Environmentalism), भूगोलाचा इतिहास, भूगोलाची व्याप्ती, भूगोलाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, मानवी भूगोलाच्या शाखा, भूगोलाच्या अभ्यासाचे महत्त्व प्राकृतिक भूगोल : व्याख्या, स्वरूप, व्याप्ती आणि महत्त्व – प्राकृतिक भूगोलाच्या व्याख्या, प्राकृतिक भूगोलाची निर्मिती, प्राकृतिक भूगोलाचे स्वरूप, प्राकृतिक भूगोलाची व्याप्ती, प्राकृतिक भूगोलाच्या शाखा, प्राकृतिक भूगोलाचे महत्त्व स्वाध्याय
2. सूर्यकुल
सूर्य, ग्रह, अंतर्ग्रह, बहिर्ग्रह, बुध, शुक्र, पृथ्वी, पृथ्वीचा उपग्रह चंद्र, मंगळ, गुरु, शनि, युरेनस, नेपच्यून, लघुग्रह, धुमकेतू, अवकाशीय पाषाण, उल्का, उल्का पाषाण, तारे, आकाशगंगा किंवा दीर्घिका, सूर्यकुलाची वैशिष्ट्ये
स्वाध्याय
3. पृथ्वीची आणि सूर्यकुलाची उत्पत्ती
एकतारक परिकल्पना – इमॅन्युएल कांटची तेजोमेघ परिकल्पना, कांटच्या परकिल्पनेचे परीक्षण द्वितारक परिकल्पना – (1) टी. सी.चेंबरलेन व फोरेस्ट रे मुल्टन यांची ग्रहकण परिकल्पना, ग्रहकण परकिल्पनेचे टीकात्मक परीक्षण (2) जेम्स जीन्स आणि सर हॅरॉल्ड जेफरीज यांची भरती परिकल्पना, भरती परिकल्पनेची गृहीत तत्त्वे, सिगार द्रव्यापासून ग्रह व उपग्रहांची निर्मिती (3) जेम्स जीन्स यांच्या भरती परिकल्पनेत सर हॅरॉल्ड जेफरीज यांची सुधारित परिकल्पना – टक्कर परिकल्पना (Collision Hypothesis), भरती परीकल्पनेचे टीकात्मक परीक्षण स्वाध्याय
4. पृथ्वी : अक्षांश व रेखांश
स्थान निश्चितीसाठी भौगोलिक वृत्तजाळी, अक्षवृत्ते व अक्षांश, स्वाभाविक अक्षवृत्ते, अक्षांश व रेखांश ठरविण्याच्या पद्धती, अक्षांश व रेखांश निश्चिती, रेखावृत्ते व रेखांश स्वाध्याय
5. पृथ्वीच्या गती – परिवलन व परिभ्रमण
पृथ्वीची परिवलन गती, पृथ्वीच्या परिवलनाचे परिणाम, पृथ्वीच्या आसाचे कलणे, पृथ्वीची परिभ्रमण गती, उपसूर्य स्थिती, व अपसूर्य स्थिती, पृथ्वीच्या परिभ्रमणाचे परिणाम, पृथ्वीची वैश्विक गती स्वाध्याय
6. वेळेचे मापन
रेखावृत्ते, रेखांश व वेळ, स्थानिक वेळ, प्रमाण वेळ, ग्रीनिच मध्यम वेळ, कालविभाग (Time Zones), संयुक्त संघराज्यातील कालविभाग व त्यांचे प्रमाण रेखावृत्ते, आंतरराष्ट्रीय वार रेषा (International Date Line) स्वाध्याय
7. चंद्र व ग्रहणे
चंद्राची उत्पत्ती, चंद्राचा पृष्ठभाग, चंद्राचा व्यास, वस्तुमान, व गुरुत्त्वाकर्षण, चंद्राचा उदय व अस्त काळ, चंद्रप्रकाश व पृथ्वीप्रकाश, वातावरणाचा अभाव, चंद्राच्या गती, चंद्रकला, शुक्ल व कृष्ण पक्ष, नीलचंद्र, सुपरमून, चंद्राची उपभू आणि अपभू स्थिती, चंद्राच्या परिभ्रमणाच्या कक्षेची पातळी, राहू आणि केतू ग्रहणाचे प्रकार – (अ) ग्रहणे: चंद्रग्रहणे (Lunar eclipses): खंडग्रास चंद्रग्रहण, खग्रास चंद्रग्रहण; सूर्यग्रहणे (Solar eclipses)
सूर्यग्रहणांचे प्रकार : (1) खग्रास सूर्यग्रहण (2) खंडग्रास सूर्यग्रहण (3) कंकणाकृती सूर्यग्रहण, (ब) अधिक्रमण, (क) पिधान स्वाध्याय