प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती
Corporate Law and Secretarial Practice
Authors:
ISBN:
₹110.00
- DESCRIPTION
- INDEX
प्रिय वाचक मित्रांनो, ‘प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती’ (Corporate Law and Secretarial Practice) हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव च्या प्रथम वर्ष वाणिज्य (F.Y.B.Com.) वर्गाच्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार पुनर्रचित अभ्यासक्रमाअंतर्गत लिहिलेले पुस्तक आपल्याकडे सोपवताना आम्हाला मनस्वी आनंद होत आहे.
प्रमंडळ कायदे आणि सचिवाची कार्यपद्धती या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने प्रमंडळ निर्मितीसाठी लागणाऱ्या कायदेशीर बाबीचे सविस्तर विवरण करण्यात आलेले आहे. कोणत्याही देशातील औद्योगिक क्षेत्र हे त्या देशाच्या विकासासाठी कारणीभूत ठरण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण घटकांपैकी एक घटक असतो. त्यामुळे कंपनीच्या अंतर्गत नियमावलीच्या संदर्भात त्याचप्रमाणे विशेष करून सचिवाच्या कार्यपद्धती संदर्भात या पुस्तकांमध्ये पूर्णपणे विवेचन करण्यात आलेले आहे. सचिव हा कोणत्याही प्रकारच्या कंपनीतील उच्च पातळीवरील व्यवस्थापनातील महत्त्वाची व्यक्ती असतो. प्रमंडळाच्या यश अपयशामध्ये सचिवाने घेतलेल्या निर्णयाचा खूप मोठ्या प्रमाणात परिणाम होताना दिसून येत असतो. खरे तर सचिवाद्वारे कोणत्याही कंपनीची कायदेशीर धुरा सांभाळली जात असते. कंपनी कायदा 1956 नुसार व्यवसायाच्या संदर्भातील संपूर्ण तरतुदी त्याचप्रमाणे कायदेशीर संकल्पनांचा या पुस्तकांमध्ये प्रामुख्याने उल्लेख करण्यात आलेला आहे. कंपनी कायदा 2013 मधील जे ठळक बदल आहेत त्यांचाही अंतर्भाव सदर पुस्तकांमध्ये दिसून येईल. कंपनी कायदा 2013 मधील काही ठळक वैशिष्ट्यांपैकी प्रमाणाच्या सामाजिक जबाबदाऱ्या आणि इतरच्या बाबी अनिवार्य करण्यात आलेल्या आहेत, त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या कंपनीवर आणि त्या कंपनीच्या विकासावर या कायद्याचा परिणाम होत असताना दिसून येतो.
1. कंपनीचा परिचय
(Introduction to Company)
1.1 कंपनी परिचय
(Company Introduction)
1.2 कंपनीची व्याख्या
(Definition of Company)
1.3 कंपनीची वैशिष्ट्ये
(Characteristics of Company)
1.4 कंपनीचे फायदे
(Advantages of Company)
1.5 कंपनीचे प्रकार
(Kinds of Company)
2. कंपनी कायद्याचा परिचय
(Introduction to Company Law)
2.1 भारतातील कंपनी कायदा संकल्पनेचा ऐतिहासिक विकास
(Historical Development of Concept of Company Law
in India)
2.2 कंपनी कायदा 2013 ची प्रमुख वैशिष्ट्ये,
2013 कंपनी कायद्याचे ठळक मुद्दे
(The Companies Act 2013 – Salient Features of the Act, 2013 – Highlights of the Act, 2013)
2.3 कंपनी कायदा, 1956 : दृष्टीक्षेप
(The company’s Act, 1956 : Overview)
2.4 कंपनी सेक्रेटरीज ॲक्ट, 1980 : दृष्टीक्षेप
(The company Secretaries Act, 1980 : Overview)
3. कंपनी सचिव
(Company Secretary)
3.1 ‘सचिव’ शब्दाची उत्पत्ती
(Origin of the Word ‘Secretary’)
3.2 व्याख्या आणि अर्थ
(Definition and Meaning)
3.3 सचिवाची वैशिष्ट्ये
(Features of Secretary)
3.4 सचिवाचे महत्त्व
(Importance of a Secretary)
3.5 सचिवाचे प्रकार
(Types of Secretary)
3.6 सचिवाची कार्ये
(Functions of Secretary)
3.7 सचिवाचे (चिटणिस) गुण
(Qualities of Secretary)
3.8 कायदेशीर स्थिती
(Legal Position)
3.9 वास्तविक स्थिती
(Actual Position)
3.10 सचिवाची पात्रता
(Qualification of Secretary)
3.11 सचिवाची नियुक्ती
(Appointment of Secretary)
3.12 कंपनीच्या सचिवाची हकालपट्टी
(Dismissal of Company Secretary)
3.13 सचिवाची कर्तव्ये
(Duties of Secretary)
3.14 सचिवाचे अधिकार आणि दायित्वे
(Rights and Liabilities of Secretary)