समाजशास्त्राची मूलतत्त्वे
Principles of Sociology
Authors:
ISBN:
₹180.00
- DESCRIPTION
- INDEX
समाजशास्त्राच्या अभ्यासाचे महत्त्व दिवसेंदिवस वाढत आहे. समाजशास्त्र हे केवळ सैद्धांतिक शास्त्र नाही, तर उपयुक्ततावादी शास्त्र सुद्धा आहे. त्यामुळे समाजशास्त्राचे अभ्यासक विविध क्षेत्रांमध्ये रोजगार आणि स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेऊ शकतात.
प्रस्तुत ग्रंथात समाजशास्त्राचा अर्थ, स्वरूप आणि व्याप्ती याबरोबरच समाजशास्त्रात वापरल्या जाणाऱ्या विविध संकल्पनांची ओळख करुन दिली आहे. यामध्ये समाजशास्त्राची उपयोगिता, समाजशास्त्र आणि सामाजिक परिवर्तन, संस्कृतीच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, घटक आणि कार्य, तसेच सामाजिकरणाचे अर्थ, व्याख्या, मूलतत्त्वे, उद्दिष्टे, अवस्था, साधने आणि सिद्धांत यांची माहिती समाविष्ट आहे.
याशिवाय, सामाजिक स्तरीकरण आणि गतिशीलता, यांचे अर्थ, प्रकार, घटक, स्तरीकरणाची कार्ये, सामाजिक गतिशीलतेचे परिणाम आणि प्रोत्साहन करणारे घटक यावर सुद्धा चर्चा केली आहे. सामाजिक परिवर्तनाच्या व्याख्या, वैशिष्ट्ये, प्रकार आणि कारणे यांची सुद्धा माहिती या ग्रंथात दिली आहे.
प्रस्तुत पुस्तकात अभ्यासक्रमानुसार साध्या आणि सोप्या भाषेत मांडणी करण्यात आली आहे. हे पुस्तक विद्यार्थी, प्राध्यापक आणि जिज्ञासू अभ्यासकांसाठी निश्चित उपयुक्त ठरेल.
1) समाजशास्त्र परिचय
(Introduction to Sociology)
समाजशास्त्राचा अर्थ व स्वरूप, समाजशास्त्राची उत्पत्ती व विकास, समाजशास्त्राचा उदय व विकास, समाजशास्त्र ः समाजशास्त्राच्या व्याख्या, समाजशास्त्राची व्याप्ती (विषयक्षेत्र), स्वरूपप्रधान विचार संप्रदायानुसार समाजशास्त्राची व्याप्ती, स्वरूपप्रधान विचार संप्रदायावर घेतलेले आक्षेप, समन्वयात्मक विचार संप्रदायानुसार समाजशास्त्राची व्याप्ती, समन्वयात्मक संप्रदायावर घेतलेले आक्षेप, समाजशास्त्र: मानवतावादी उपयुक्ततावादी अभिमुखता विज्ञान, समाजशास्त्राच्या स्वरूपासंबंधीचे प्रमुख वैशिष्ट्ये, समाजशास्त्राचा अन्य सामाजिकशास्त्राशी संबंध, समाजशास्त्राचा अभ्यासविषय, समाजशास्त्राचे महत्त्व; स्वाध्याय
2) समाजशास्त्राची उपयोगिता
(Applied sociology)
उपयोजित समाजशास्त्राचा विकास, समाजशास्त्र आणि विकास, समाजशास्त्र आणि सामाजिक परिवर्तन, समाजशास्त्र हे उपयोगियवदी शास्त्र; समाजशास्त्र व सामाजिक समस्या, समाजशास्त्र व धोरण, समाजशास्त्र व विकास, समाजशास्त्र व व्यवसाय; स्वाध्याय
3) संस्कृती
(Culture)
संस्कृतीच्या व्याख्या, भौतिक आणि अभौतिक संस्कृती, संस्कृतीची वैशिष्ट्ये, संस्कृतीचे घटक, सांस्कृतिक स्वयंकेंद्रितता, व्याख्या, संस्कृतीची कार्य; स्वाध्याय
4) सामाजिकरण
(Socialization)
सामाजीकरणाचा अर्थ, व्याख्या, सामाजीकरणातील आवश्यक मुलतत्वे किंवा जैविक पुर्वावश्यकता, सामाजीकरणाची उद्दिष्ट्ये, सामाजीकरणाच्या अवस्था/पायऱ्या, सामाजीकरणाची साधने/माध्यमे, सामाजिकरणाचे सिध्दांत-दुर्खिमचा सिध्दांत, चार्लस कुलेचा सिध्दांत, मीडचा सिध्दांत, सिग्मंड फ्राइडचा सिध्दांत; प्रौढाचे सामाजीकरण; स्वाध्याय.
5) सामाजिक स्तरीकरण आणि गतीशिलता
(Social Stratification and Mobility)
सामाजिक स्तरीकरणाच्या व्याख्या, सामाजिक स्तरीकरणाचे आधारभूत घटक, सामाजिक स्तरीकरणाचे प्रकार – बंद स्तरीकरण व्यवस्था, मुक्त स्तरीकरण वर्ग व्यवस्था; स्तरीकरणाची प्रकार्ये, सामाजिक स्तरीकरणाची अप्रकार्ये, सामाजिक स्तरीकरणाचे महत्व; सामाजिक गतिशिलता, व्याख्या; सामाजिक गतिशीलतेचे प्रकार – समस्तर किंवा समपातळीवरील गतिशीलता, स्तंभीय गतिशीलता किंवा उदग्र गतिशीलता; सामाजिक गतिशीलतेला/प्रोत्साहीत करणारे घटक, सामाजिक गतिशीलतेचे परिणाम; स्वाध्याय
6) सामाजिक परीवर्तन
(Social Change)
सामाजिक परिवर्तनाची व्याख्या, सामाजिक परिवर्तनाची वैशिष्टे; सामाजिक परिवर्तनाचे प्रकार – उत्क्रांती, प्रगती, क्रांती, विकास; सामाजिक परिवर्तनाची कारणे किंवा घटक – भौगोलिक घटक, लोकसंख्यात्मक घटक, तांत्रिक बदल, आर्थिक घटक, सांस्कृतिक व सामाजिक घटक; स्वाध्याय