{"product_id":"अनुभूती","title":"अनुभूती","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eशिक्षकात कवी असणं यांस मी अहोभाग्य समजतो. कारण शिक्षकाला रंजन आणि प्रबोधन या दोन्ही वाटा एकाच वेळी समृद्ध करीत विद्यार्थी वर्गाचं संगोपन, संवर्धन करावं लागतं. या ध्यासाला जतन करीत जे आतून येतं. आणि शब्दरुप होतं. याचा एक आगळा आनंद असतो. यालाच साहित्यात ‘स्वानंदासाठी’ केलेले लेखन असेही संबोधले जाते.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eसरांनी प्रस्तुत संग्रहातून ज्या ज्या भावनांना वाट करुन दिलीय. त्या वाटेवर सुख-दुःखाच्या दाहक वास्तवाबरोबर अंतरीच्या घावांसह केलेली ‘शल्य’ चिकित्सा वाचकाची अस्वस्थता वाढविणारी ाहे. कवीच्या दुःखाशी संवादी होतांना तो स्वतःच्या दुःखाची कवी दुःखाशी तुलना करीत स्वतःचे दुःख शितल करतो. येथेच कवीचे आणि कवितेचे यश दडलेले असते. म्हणूनच सृजन म्हणजे मानवी मनाच्या तळाशी असणार्या जखमांना सावरणारी निसर्गदत्त देणगीच वाटते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48477511745765,"sku":null,"price":95.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Anubhuti-Kavitasangrah3_cnvt-1.jpg?v=1772178670","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%a8%e0%a5%81%e0%a4%ad%e0%a5%82%e0%a4%a4%e0%a5%80","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}