{"product_id":"अर्थशास्त्राची-मूलतत्त्वे","title":"अर्थशास्त्राची मूलतत्त्वे","description":"\u003cp\u003eअर्थशास्त्रात संपूर्ण अर्थव्यवस्थेतील घटकांचा एकत्रितपणे अभ्यास केला जातो. 16 व्या व 17 व्या शतकात व्यापारवादी विचारवंतानी शासनाला ज्या शिफारसी व धोरणे सुचविली ती अर्थव्यवस्थेसंदर्भातच होती. 18 व्या शतकात निसर्गवादी फ्रेंच विचारवंतानीसुध्दा राष्ट्रीय उत्पन्न व संपत्ती यावर विश्लेषण केलेले दिसून येते. तसेच अॅडम स्मिथ, रिकार्डो, जे.एस.मिल यांच्या सिध्दातांतही राष्ट्रीय उत्पन्नाचे एकूण वेतन, एकूण खंड व एकूण नफा यामध्ये होणार्या विभाजनाविषयी चर्चा केलेली आढळते. 1929 च्या जागतिक महामंदीनंतर मात्र अर्थशास्त्रीय विचारात मूलभूत व क्रांतिकारी बदल झालेले दिसतात. लॉर्ड केन्स यांचे 1936 मध्ये ‘द जनरल थिअरी’ हे युगप्रवर्तक पुस्तक प्रकाशित झाले. केन्सने प्रामुख्याने स्थूल अर्थशास्त्राचा पाया रचला. सदर पुस्तकामध्ये अर्थशास्त्राच्या व्याख्या, उपयोगिता दृष्टीकोण, मागणी व मागणीची लवचिकता, उत्पादन फलन, उत्पादन व्यय, प्राप्ती किंवा उत्पन्न ह्या अर्थशास्त्रातील विविध मूलभूत बाबींचा उहापोह केला आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48474671972581,"sku":null,"price":195.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Arthashasarachi-Multatve2_cnvt-1.jpg?v=1772106742","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}