{"product_id":"अर्थशास्त्रातील-सांख्यिकीची-मूलतत्वे-भाग-1-basics-of-statistics-in-economics-i","title":"अर्थशास्त्रातील सांख्यिकीची मूलतत्वे (भाग 1) (Basics of Statistics in Economics- I)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव. (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण (NEP) 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर 5.5. विशेष स्तरावरील हा विषय DSE- 2 ECO - 314 - B “अर्थशास्त्रातील सांख्यिकीची मूलतत्वे” (Basics of Statistics in Economics- I) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी 4 श्रेयांक (क्रेडिट) निर्धारित केलेले असून एकूण मूल्यांकन 100 गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन 40 गुणांचे व बहिस्थ मूल्यांकन 60 गुणांचे करण्यात येणार आहे.\u003cbr\u003eएकविसाव्या शतकातील ज्ञानाधिष्ठित अर्थव्यवस्थेत निर्णय प्रक्रिया, धोरण निर्मिती, आर्थिक धोरण आणि संशोधन यांचा पाया वस्तुनिष्ठ माहिती व तिच्या वैज्ञानिक विश्लेषणावर आधारित आहे. आर्थिक घटनांचे स्वरूप त्यातील बदल, परस्पर संबंध आणि परिणाम यांचे अचूक आकलन होण्यासाठी सांख्यिकी (Statistics) हे एक प्रभावी साधन विकसित झाले आहे. त्यामुळे आधुनिक अर्थशास्त्राच्या अध्ययनात सांख्यिकीला केवळ पूरक विषय न समजता अर्थशास्त्रीय विश्लेषणाचा पाया मानले जाते. त्यामुळे अर्थशास्त्राच्या प्रत्येक विद्यार्थ्याने सांख्यिकीच्या मूलभूत संकल्पनांचे सखोल अध्ययन करणे आवश्यक आहे. या उद्देशानेच व अर्थशास्त्रातील सांख्यिकीची मूलतत्वे हा विषय आपणासाठी अभ्यासक्रमास आहे.\u003cbr\u003eप्रथम सत्रात आपण सांख्यिकीची ओळख, सांख्यिकीय विश्लेषणासाठी माहितीचे संकलन, तथ्यांचे वर्गीकरण, सारणीकरण आणि केंद्रीय प्रवृत्तीचे मापन या प्रकरणाचे अध्ययन करणार आहोत. या चारही प्रकरणात विषयाचे सादरीकरण सोप्या शुद्ध आणि शास्त्रीय मराठी भाषेत केलेले असून आवश्यक त्याठिकाणी इंग्रजी परिभाषा, तक्ते, आकृत्या, आलेख आणि सोप्या व सहज लक्षात राहणाऱ्या उदाहरणांचा समावेश केला आहे. त्यामुळे विद्यार्थी केवळ परीक्षाधिष्ठित ज्ञान न मिळविता संकल्पनांचे सखोल आकलन होऊन संशोधनाभिमुख दृष्टिकोन विकसित होण्यास मदत होईल. सदर पुस्तक अर्थशास्त्रातील सांख्यिकीच्या अध्ययनासाठी एक मूलभूत संदर्भ ग्रंथ म्हणून विद्यार्थ्यांना, प्राध्यापकांना संशोधकांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129689043173,"sku":null,"price":325.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/ArthshastratilSankhyikichiMultatve_Part_1_Gayakvad-1.jpg?v=1787221502","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a4%e0%a5%80%e0%a4%b2-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%82%e0%a4%96%e0%a5%8d%e0%a4%af%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a5%80%e0%a4%9a%e0%a5%80-%e0%a4%ae%e0%a5%82%e0%a4%b2%e0%a4%a4%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b5%e0%a5%87-%e0%a4%ad%e0%a4%be%e0%a4%97-1-basics-of-statistics-in-economics-i","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}