{"product_id":"आंतरराष्ट्रीय-अर्थशास्त्र-international-economic","title":"आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र - International Economic","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eविद्यापीठ अनुदान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वानुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे यांनी पदवी अभ्यासक्रमासाठी नवीन शैक्षणिक धोरण (NEP-2020) श्रेयांक आणि सत्र पद्धतीचा अवलंब केला आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी मानवविद्या शाखेअंतर्गत ‘तृतीय वर्ष अर्थशास्त्र’ विषयामध्ये Major Core म्हणून सत्र 5 साठी ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ Eco 301 MJ (T) हा विषय 4 क्रेडीटसाठी लेखी पेपर म्हणून पदवी स्तरावर निश्चित केलेला आहे. ‘आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र’ या पुस्तकातील प्रकरण-1 आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख: आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रः अर्थ, व्याख्या, व्याप्ती आणि महत्त्व, आंतरप्रादेशिक व आंतरराष्ट्रीय व्यापार, आंतरराष्ट्रीय व्यापाराचा अर्थ व महत्त्व आणि आर्थिक वृद्धी व आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका याची माहिती देलेली आहे. तर या पुस्तकातील प्रकरण- 2 रे आंतरराष्ट्रीय व्यापाराचे सिद्धांत यामध्ये आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सनातनवादी सिद्धांतांमध्ये, ॲडम स्मिथ यांचा निरपेक्ष खर्च लाभ सिद्धांत, डेव्हीड रिकार्डो यांचा तुलनात्मक खर्च लाभ सिद्धांत, आधुनिक सिद्धांतामध्ये हेक्श्चर ओहलीन यांचा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा सिद्धांत, लिओनटिफ यांचा विरोधाभास, स्टोल्पर-सॅम्युएल्सन प्रशुल्क सिद्धांत, आंतर-उद्योग व्यापार इ. सिद्धांतांचे विश्लेषण केले आहे. तसेच प्रकरण 3 व्यापार धोरण यामध्ये व्यापाराचे लाभ, व्यापारशर्ती-अर्थ, प्रकार, व्यापारशर्ती निर्धारित करणारे घटक, विकसनशील देशांना व्यापारशर्ती प्रतिकूल असल्याची कारणे, व्यापारतोल व व्यवहारतोल संकल्पना, व्यवहारतोल घटक, व्यवहारतोल असंतुलन कारणे व त्यावरील उपाययोजना यासबंधी सविस्तर माहिती स्पष्टीकरण केले आहे.\u003cbr\u003eतसेच शेवटचे प्रकरण 4 थे आंतरराष्ट्रीय व्यापारविषयक करार यामध्ये जागतिक व्यापार संघटनेची उद्दिष्टये व करार, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी व जागतिक बँकेची भूमिका व कार्ये, प्रादेशिक व्यापार करार, सार्क, ब्रिक्स स्वरूप आणि कार्ये, द्विपक्षी व्यापार धोरण, 1997 चे आशियाई वित्तीय संकट, जागतिक वित्तीय संकट 2008, युरो क्षेत्र संकट याविषयी संपूर्ण माहिती दिलेली आहे, तसेच प्रत्येक प्रकरणाच्या शेवटी विद्यापीठाने मुल्यांकन नमूद केलेल्या आकृतीबंधानुसार परिक्षेच्या तयारीच्या दृष्टीने प्रश्न दिलेले आहेत. त्यामुळे हे पुस्तक विद्यापीठातील कार्य क्षेत्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52900423860453,"sku":"9789377761530","price":335.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AantarrashtriyArthshastra_Kapdi-1.jpg?v=1789732773","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-international-economic","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}