{"product_id":"आंतरराष्ट्रीय-अर्थशास्त्र-international-economics","title":"आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र (International Economics)","description":"\u003cp\u003eमराठी माध्यमातून अर्थशास्त्राचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्रातील संकल्पना सुलभ, शास्त्रीय आणि परीक्षाभिमुख पद्धतीने समजावून सांगण्याच्या उद्देशाने या पुस्तकाची निर्मिती करण्यात आली आहे. या पुस्तकाची रचना करताना विद्यार्थ्यांची आकलनक्षमता, अभ्यासक्रमाची आवश्यकता, विद्यापीठाच्या परीक्षेची दृष्टी आणि विषयाचे व्यावहारिक महत्त्व या सर्व बाबींचा विचार करण्यात आला आहे.\u003cbr\u003eया पुस्तकामध्ये आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्राची ओळख, प्राचीन व्यापार, भारताची निर्यात-आयात, देय शेष, त्यातील असमतोल व रुपयाची परिवर्तनीयता यांचा अभ्यास करण्यात आला आहे. तसेच परकीय चलन बाजार, विनिमय दरांचे प्रकार, व्यवस्थापित लवचिक विनिमय दर आणि विविध परकीय चलन बाजारांचा समावेश करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना संकल्पना सहज समजाव्यात यासाठी आवश्यक उदाहरणे व गणनापद्धतीही दिल्या आहेत.\u003cbr\u003eहे पुस्तक लिहिताना आमच्या मनात एक गोष्ट सातत्याने होती, अर्थशास्त्र हा केवळ पाठांतराचा विषय नसून आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या आर्थिक घटनांचा शास्त्रीय अर्थ लावण्याचे प्रभावी साधन आहे. डॉलरच्या तुलनेत रुपयाच्या विनिमय दरातील बदल, भारताच्या आयात-निर्यातीतील बदल, परकीय गुंतवणूक, परकीय चलनसाठा किंवा देशाच्या देय शेषातील स्थिती यांसारख्या घटनांकडे विद्यार्थ्यांनी अर्थशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहावे, हा या पुस्तकामागील प्रमुख हेतू आहे.\u003cbr\u003eमराठी माध्यमातील विद्यार्थ्यांना अनेक वेळा इंग्रजीतील तांत्रिक संज्ञांमुळे विषय समजून घेताना अडचणी येतात. ही अडचण लक्षात घेऊन या पुस्तकामध्ये शक्य तितक्या सोप्या, स्पष्ट आणि प्रवाही मराठी भाषेचा वापर केला आहे. आवश्यक ठिकाणी इंग्रजीतील प्रचलित संज्ञा कंसामध्ये दिल्या आहेत, जेणेकरून विद्यार्थ्यांना मराठी संकल्पना आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वापरल्या जाणाऱ्या आर्थिक संज्ञा यांचा सहज संबंध जोडता येईल.\u003cbr\u003eया पुस्तकाचा उपयोग केवळ परीक्षेच्या तयारीपुरता मर्यादित न राहता विद्यार्थ्यांना आंतरराष्ट्रीय आर्थिक घडामोडी समजून घेण्यासाठी, विश्लेषणात्मक विचार विकसित करण्यासाठी आणि अर्थशास्त्राच्या व्यावहारिक उपयोगाची जाणीव करून देण्यासाठी व्हावा, अशी आमची मनापासून इच्छा आहे. शिक्षक, विद्यार्थी आणि अर्थशास्त्र विषयात रुची असणाऱ्या सर्व वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67614011654373,"sku":"9789377761523","price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AantarrashtriyaArthshastra_Dalavi_Bharaskar-1.jpg?v=1791194428","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%82%e0%a4%a4%e0%a4%b0%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%b7%e0%a5%8d%e0%a4%9f%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a5%80%e0%a4%af-%e0%a4%85%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-international-economics","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}