{"product_id":"आधुनिक-बँकिंग-i-advanced-banking-i","title":"आधुनिक बँकिंग-I (ADVANCED BANKING-I)","description":"\u003cp\u003eआधुनिक बँकिंग-I हा विषय वाणिज्य विद्या शाखेतील अतिशय महत्त्वाचा विषय आहे. मातृभाषेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी मित्रांसाठी व अध्यापनाचे पवित्र कार्य करणाऱ्या प्राध्यापक मित्रांच्या हाती आधुनिक बँकिंग-I हे पुस्तक देताना अतिशय आनंद होत आहे. सन 2026-27 पासून कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव यांनी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार व NEP 2020 धोरणानुसार तयार केलेल्या अभ्यासक्रमानुसार सदर पुस्तकाचे लेखन करण्यात आलेले आहे. शैक्षणिक वर्ष 2026-27 पासून लागू करण्यात आलेल्या, तृतीय वर्ष वाणिज्य या वर्गाच्या पुनर्रचित अभ्यासक्रमानुसार आधुनिक बँकिंग-I या विषयाच्या पुस्तकाची रचना केली आहे. हे पुस्तक कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगावच्या अभ्यासक्रमावर आधारित असले तरी हा अभ्यासक्रम विद्यापीठ अनुदान आयोगाच्या निर्देशानुसार तयार केला असल्यामुळे हे अन्य विद्यापीठातील विद्यार्थी व प्राध्यापक मित्रांनाही उपयुक्त ठरेल यात शंका नाही. आजच्या वेगाने बदलणाऱ्या आर्थिक आणि तांत्रिक युगात बँकिंग क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झाले आहे. पारंपरिक बँकिंगच्या चौकटीतून बाहेर पडत आधुनिक बँकिंगने डिजिटल व्यवहार, मोबाईल बँकिंग, इंटरनेट बँकिंग, यूपीआय, सायबर सुरक्षा, ग्राहक-केंद्रित सेवा आदी बाबींचा स्वीकार केला आहे. या बदलां ुळे बँकिंग व्यवस्था अधिक जलद, सुरक्षित, पारदर्शक आणि सर्वसमावेशक बनली आहे. म्हणजेच बँकिंग ही केवळ पैशांची देवाणघेवाण करणारी यंत्रणा राहिलेली नाही, तर ती आज आपल्या दैनंदिन जीवनाचा आणि देशाच्या अर्थव्यवस्थेचा मुख्य कणा बनली आहे. तंत्रज्ञानाच्या वेगवान विकासामुळे पारंपरिक बँकिंग पद्धती मागे पडून आज आपण डिजिटल आणि मोबाईल बँकिंगच्या युगात प्रवेश केला आहे. अशा बदलत्या काळात बँकिंग क्षेत्राची अचूक, सोपी आणि सखोल माहिती देणारे एक पुस्तक असावे, या विचारातूनच या पुस्तकाची निर्मिती झाली आहे. हे पुस्तक लिहिण्यामागे आमचा मुख्य उद्देश बँकिंगसारखा क्लिष्ट वाटणारा विषय अत्यंत सोप्या भाषेत सर्वसामान्य वाचक, विद्यार्थी आणि बँक ग्राहकांपर्यंत पोहोचवणे हा आहे.कारण आजच्या डिजिटल युगात आर्थिक साक्षरता (Financial \u003cbr\u003eLiteracy) असणे ही काळाची गरज बनली आहे. डिजिटल व्यवहार करताना कोणती काळजी घ्यावी, विविध कर्ज योजनांचे स्वरूप काय असते, ऑनलाईन बँकेचे नियम कसे काम करतात आदी बाबींची व्यावहारिक माहिती या पुस्तकात समाविष्ट करण्यात आलेली आहे. म्हणजेच या पुस्तकाचा उद्देश आधुनिक बँकिंगच्या संकल्पना, कार्यपद्धती, तांत्रिक प्रगती, नियामक व्यवस्था आणि भारतीय बँकिंग क्षेत्रातील बदल यांची सुलभ व समग्र माहिती वाचकांपर्यंत पोहोचवणे हा आहे. विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, बँक कर्मचारी, संशोधक तसेच बँकिंग विषयात रुची असलेल्या सर्व वाचकांसाठी हे पुस्तक उपयुक्त ठरेल, असा विश्वास आहे. लेखन करताना विषयाची अचूकता, अद्ययावत माहिती आणि सोपी भाषा यांवर विशेष भर दिला आहे. गुंतागुंतीच्या संकल्पना उदाहरणांच्या साहाय्याने स्पष्ट करण्याचा प्रयत्न केला आहे, जेणेकरून वाचकांना आधुनिक बँकिंगचे व्यावहारिक महत्त्व सहज समजू शकेल. सदर पुस्तक आधुनिक बँकिंगची सखोल समज विकसित करण्यास आणि आर्थिक साक्षरता वाढविण्यास हातभार लावेल, हीच अपेक्षा. हे पुस्तक केवळ माहिती देणारे नसून, वाचकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम आणि सतर्क बनवणारे एक साधन ठरेल, असा आम्हाला विश्वास वाटतो. \u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129969471717,"sku":null,"price":235.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AadhunikBanking_SujataPatil-1.jpg?v=1787228908","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%ac%e0%a4%81%e0%a4%95%e0%a4%bf%e0%a4%82%e0%a4%97-i-advanced-banking-i","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}