{"product_id":"आधुनिक-युरोपचा-इतिहास-इ-स-1780-ते-1945","title":"आधुनिक युरोपचा इतिहास (इ.स. 1780 ते 1945)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eमध्ययुगात युरोप हा धर्मगुरू व राजा यांच्या गुलामगिरीत वाढलेला. इंग्लंडने गुलामगिरीचे सर्वप्रथम उच्चाटन केले. फे्रंच राज्यक्रांतीने स्वातंत्र्य, समता, बंधुता, राष्ट्रवाद व राज्यघटनेचे महत्त्व विशद केले. वैज्ञानिक शोधांमुळे ‘औद्योगिक क्रांती’ युरोपमध्ये उदयास आली. वसाहतीच्या शोधामुळे युरोपमध्ये विनाशकारी साम्राज्यवादाचा उदय झाला. संपूर्ण जगाला विनाशाच्या गर्तेत फेकणार्या दोन्ही महायुद्धांना युरोप कारणीभूत ठरले. दोन्ही महायुद्धात प्रचंड प्रमाणात मनुष्यहानी, आर्थिकहानी झाली. मानवजातीचा समूळ विनाश करणार्या विध्वंसकारी अणुबॉम्बचा शोध याच काळात लागला. महायुद्धांतील संहारक अस्त्रांमुळे मानव जात स्तब्ध झाली. जगात पुन्हा महायुद्ध होऊ नये, विध्वंसकारी अणुबॉम्बच्या वापरास निर्बंध घालावा तसेच शांततापूर्ण सहकार्य यासाठी यूनो या जागतिक दर्जाच्या संघटनेची निर्मिती झाली.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रस्तुत पुस्तकात इंग्लंडमधील लोकशाही, फे्रंच राज्यक्रांती, औद्योगिक क्रांती, साम्राज्यवाद, राष्ट्रवाद, राष्ट्रसंघ व संयुक्त राष्ट्र संघटना यांची निर्मिती, रशियन राज्यक्रांती, फॅसिझम, नाझीझम, तुर्कस्थानचे आधुनिकीकरण इ. महत्त्वपूर्ण मुद्द्यांचे सविस्तर विवेचन केलेले आहे.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48466086723813,"sku":null,"price":225.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Adhunik-Yuropcha-Itihas-AD-1780-to-1945_cnvt-1.jpg?v=1771920412","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%af%e0%a5%81%e0%a4%b0%e0%a5%8b%e0%a4%aa%e0%a4%9a%e0%a4%be-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%87-%e0%a4%b8-1780-%e0%a4%a4%e0%a5%87-1945","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}