{"product_id":"आधुनिक-साहित्य-प्रकार-कादंबरी-शिवराय-आणि-संविधान","title":"आधुनिक साहित्य प्रकार कादंबरी : शिवराय आणि संविधान","description":"\u003cp\u003e\u003cbr\u003eनवीन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 नुसार दरवर्षी एका वर्गाच्या अभ्यासक्रमामध्ये व अभ्यासपद्धतीमध्ये बदल होत आहेत. यावर्षी म्हणजेच शैक्षणिक वर्ष 2026-27 मध्ये तृतीय वर्षाच्या पदवी अभ्यासक्रमामध्ये काही बदल झालेले आहेत. त्याच बदलाचा भाग म्हणून पण व्यापक उद्देश ठेवून मराठी विषयातील दुय्यम विषय म्हणून आधुनिक मराठी साहित्यप्रकार कादंबरीचा समावेश केलेला आहे. त्याचबरोबर साहित्यकृती म्हणून लेखक राहुल रासवे यांची ‘शिवराय आणि संविधान’ ही मैत्री पब्लिकेशन पुणे यांनी 19 फेब्रुवारी 2026 रोजी शिवजयंतीच्या सुवर्णपर्वावर प्रकाशित केलेली कादंबरी निहित केलेली आहे. अभ्यासक्रमामध्ये या घटकांचा समावेश करण्याचा विद्यापीठाचा आणि एकूणच अभ्यासमंडळाचा हेतू आपल्याला स्पष्ट दिसतो. तो म्हणजे कादंबरी हा साहित्यप्रकार विद्यार्थ्यांना पातळीवर स्पष्टपणे समजावा किंवा अवगत व्हावा व त्याचबरोबर मूळ साहित्यकृती कादंबरी म्हणून कशी अभ्यासली जाते, ती कशी असावी, तिचे विश्लेषण विविध अंगाने कसे करता येते हे प्रयोजन डोळ्यासमोर ठेवून अभ्यासक्रमामध्ये कादंबरी या साहित्यकृतीचा समावेश केला जातो.\u003cbr\u003eयेथे देखील साहित्यकृती म्हणून एका कादंबरीचा समावेश केलेला आहे. पण विशेषत्वाने एक बाब येथे नमूद करावीशी वाटते ती म्हणजे प्रत्यक्ष कादंबरी हा साहित्यप्रकार अभ्यासण्यासाठी अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट केलेली कादंबरी ही अतिशय आगळीवेगळी आणि विशिष्ट हेतू ठेवून समाविष्ट केलेली कादंबरी आहे. ती म्हणजे ‘शिवराय आणि संविधान’. या कादंबरीचे शीर्षक विचारात घेतल्यास आपल्याला अगदी स्पष्टपणे लक्षात येते की, संविधान ही पारतंत्र्याच्या गुलामगिरीतून स्वातंत्र्याच्या उंबरठ्यावर असणाऱ्या भारताची राज्यघटना आहे. तर शिवराय आणि त्यांचे स्वराज्य ही चारशे वर्षांपूर्वी मध्ययुगीन कालखंडातील राजे महाराजे, राज्यकर्ते व शासनकर्ते अशी परिस्थिती असणाऱ्या कालखंडातील अभूतपूर्व घटना आहे. शिवरायांचे स्वराज्य आणि विसाव्या शतकात परकीय गुलामगिरीतून मुक्त झालेल्या भारतासाठी निर्माण केलेले डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान या दोन्ही गोष्टी वरवर पाहता पूर्णतः वेगवेगळ्या वाटणाऱ्या आहेत. त्यांचे विचार, त्यातील आचार, मूल्ये, तत्वे ही कोणत्याही अर्थाने एकमेकांशी जोडणार नाहीत असे सहज वाटते. याचे कारण आपण भारतीयांनी \u003cbr\u003eथोरपुरुषांना, महानायकांना देखील जातीपातीत विभागलेले आहेत. धर्माधर्मामध्ये वाटणी केलेली आहे. काही विशिष्ट व्यक्तींना, विशिष्ट जातीशी किंवा धर्माशी जोडण्याच्या घोडचुका आपण भारतीय सदोदितपणे करत आलेलो आहोत आणि आजही त्या करत आहोत. मात्र लेखक राहुल रासवे यांनी अभ्यासकांची नव्हे तर अगदी सामान्य वाचकांची सुद्धा या कादंबरीच्या माध्यमातून स्पष्टपणे कान उघडणे केलेली आहेत. ती देखील अतिशय सहज, साध्या, सरळ, सोप्या भाषेत आणि कोणत्याही प्रकारचा वादविवाद, तंटे, बखेडे निर्माण होणार नाही अशा पद्धतीने मांडणी केलेली आहे. भारत हा तरुणांचा देश आहे आणि तरुण ही या राष्ट्रांची सर्वात मोठी संपत्ती आहे. परंतु या संपत्तीलाच आपण कोण आहोत याची अजिबात जाणीव नाही. ही जाणीव निर्माण करण्यासाठी, त्यांच्यामध्ये प्रेरणा निर्माण करण्यासाठी, जिज्ञासा वृत्ती निर्माण करण्यासाठी, आपले आदर्श शोधावे यासाठीची जागरूकता निर्माण करण्यासाठी या समवयस्क तरुणाने लेखक म्हणून ही कादंबरी आपल्यासमोर मांडलेली आहे. \u003cbr\u003eया कादंबरीचा हेतू देखील तितकाच उदार आहे. नवतरुणांना आदर्श मॉडेल म्हणजे काय? आणि आपले आदर्श मॉडेल कोणते आहेत? त्यासाठी आपण काय वाचले पाहिजे? काय शोधले पाहिजे? याबाबत ते पूर्णतः दिशाहीन आहेत. यासाठी योग्य ते मार्गदर्शन या कादंबरीच्या रूपाने लेखकाने केलेले आहेत. त्यामुळे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मराठी विषयाच्या अभ्यासमंडळातील चेअरमन आणि सर्व सन्माननीय सदस्यांनी देखील या कादंबरीची एकमुखाने निवड केलेली आहे ती अतिशय सार्थ आहे. कारण 21व्या शतकात शिकत असणाऱ्या या तरुणांना आपण कोण आहोत? आपण काय केले पाहिजे? काय वाचले पाहिजे? कोणते आदर्श आपल्यासमोर असावेत? यासारख्या नानाविध प्रश्नांची अजिबात जाणीव नाही. ती जाणीव जागरूकता त्यांच्यामध्ये निर्माण व्हावी आणि त्या दृष्टीने त्यांनी प्रयत्नरत व्हावेत. हा महत्त्वाचा हेतू या कादंबरीच्या निवडीमागे असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे प्रस्तुत कादंबरीच्या निवडीचा हेतू संदर्भग्रंथाच्या वाचनाअंती स्पष्ट होईलच. \u003cbr\u003e\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":67597743718629,"sku":"9789377762629","price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AadhunikSahityaPrakarShivraiaaniSanvidhan_GitanjaliChine-1.jpg?v=1790847332","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%a7%e0%a5%81%e0%a4%a8%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b8%e0%a4%be%e0%a4%b9%e0%a4%bf%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%af-%e0%a4%aa%e0%a5%8d%e0%a4%b0%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b0-%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%a6%e0%a4%82%e0%a4%ac%e0%a4%b0%e0%a5%80-%e0%a4%b6%e0%a4%bf%e0%a4%b5%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%af-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b8%e0%a4%82%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%a7%e0%a4%be%e0%a4%a8","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}