{"product_id":"आर्थिक-विकास-आणि-वृद्धी-1-economic-development-and-growth-i","title":"आर्थिक विकास आणि वृद्धी-1 (Economic Development and Growth-I)","description":"\u003cp\u003eकवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ, जळगाव (नॅक ‘अ’ श्रेणी प्राप्त) यांनी शैक्षणिक वर्ष 2026-27 साठी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 च्या मार्गदर्शक सूचनानुसार तृतीय वर्ष कला स्तर-5.0 या वर्गातील अर्थशास्त्र हा विषय विशेष प्राविण्यासह व विशेष प्राविण्यासह संशोधन (With Honours and Honours with Research) या आधारावर अभ्यासक्रमाची पुनर्रचना मा. कुलगुरू प्रो. (डॉ.) व्ही. एल. माहेेशरी, प्र. कुलगुरू प्रो. (डॉ.) एस.टी.इंगळे, अधिष्ठाता प्रो. (डॉ.) जगदिश पाटील (मानव्यविद्याशाखा) प्रो. (डॉ.) अनिलजी डोंगरे (वाणिज्य व व्यवस्थापन विद्याशाखा) यांच्या मार्गदर्शनानुसार अर्थशास्त्र अभ्यासमंडळाने केली आहे. तृतीय वर्ष कला (T.Y.B.A.) वर्गासाठी 2026-2027 या शैक्षणिक वर्षांपासून विशेष स्तरावरील हा विषय DSE-1 ECO-314A ‘आर्थिक विकास आणि वृद्धी-1’ (Economic Development and Growth-1) या विषयाची निवड करण्यात आली आहे. प्रत्येक सत्रासाठी 4 श्रेयांक (Credit) निर्धारीत केलेले असून एकूण मुल्यांकन 100 गुणांचे होणार आहे. त्यात अंतर्गत मूल्यांकन 40 गुणांचे व बहिस्थ मुल्यांकन 60 गुणांचे करण्यात येणार आहे.\u003cbr\u003eआर्थिक विकास आणि आर्थिक वृद्धी हा विषय आधुनिक अर्थशास्त्रातील महत्त्वाची शाखा आहे. कोणत्याही देशाचा विकास केवळ राष्ट्रीय उत्पन्नावर अवलंबून नसतो तर त्या देशाचे नागरिकांचे जीवनमान, शिक्षण, आरोग्य, रोजगार, सामाजिक न्याय, पर्यावरणीय शाश्वता आणि सर्वसमावेशक विकास अशा अनेक महत्त्वपूर्ण घटकाचा त्यात सहभाग असतो. म्हणून विकास आणि वृद्धी या दोन परिमाणांतून देशाच्या विकासाचे मोजमाप केले जाते. कारण वृद्धी ही उत्पादन आणि उत्पन्नातील परिणामात्मक वाढ दर्शविते तर विकास हा आर्थिक, सामाजिक, मानवी आणि संस्थात्मक परिवर्तनाची व्यापक प्रक्रिया आहे. या पुस्तकातून विद्यार्थ्यांना केवळ सैद्धांतिक ज्ञान न देता प्रत्यक्ष जीवनातील आर्थिक समस्यांचे विश्लेषण करण्याची क्षमता विकसित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.\u003cbr\u003eया सत्रात आपण चार प्रकरणाचे अध्ययन करणार आहोत, त्या आर्थिक विकासाची संकल्पना, आर्थिक विकासाचे सिद्धांत, आर्थिक विकास प्रक्रियेतील संचनात्मक समस्या, शिक्षण आणि आरोग्य, दारिद्य्र आणि आर्थिक विषमता, प्रादेशिक असमतोल, नियोजन, तंत्रज्ञान यांची आर्थिक विकासातील भूमिका, \u003cbr\u003eनिती आयोग अशा वेगवेगळ्या महत्त्वाच्या भागाचे अध्ययन करुन विद्यार्थ्याच्या ज्ञान कक्षा वृद्धींगत होतील, ज्ञानधिष्ठित, सर्वसमावेशक, शाश्वत आणि आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीसाठी आर्थिक विकासाबाबतचे सखोल आकलन आवश्यक आहे. हे पुस्तक विद्याथी, प्राध्यापक संशोधकांना उपयुक्त ठरेल.\u003cbr\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":52129076609253,"sku":null,"price":170.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/AarthikVikasaanivruddhi_I_Gayakvad-1.jpg?v=1787219241","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%86%e0%a4%b0%e0%a5%8d%e0%a4%a5%e0%a4%bf%e0%a4%95-%e0%a4%b5%e0%a4%bf%e0%a4%95%e0%a4%be%e0%a4%b8-%e0%a4%86%e0%a4%a3%e0%a4%bf-%e0%a4%b5%e0%a5%83%e0%a4%a6%e0%a5%8d%e0%a4%a7%e0%a5%80-1-economic-development-and-growth-i","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}