{"product_id":"इंडियन-बिझिनेस-लेजंड्स-1","title":"इंडियन बिझिनेस लेजंड्स","description":"\u003cp\u003e‘इंडियन बिझिनेस लेजंड्स' हे पुस्तक उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगावच्या, वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षासाठी अतिरिक्त मराठी हा पर्यायी अभ्यासक्रम घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी सादर करतांना मनस्वी आनंद होतो आहे. विद्यापीठाच्या मराठी अभ्यास मंडळाने यावर्षी वाणिज्य शाखेच्या प्रथम वर्षासाठी मराठी विषयाच्या अभ्यासक्रमात प्रयोगात्मक बदल केले आहेत, हे बदल करतांना वाणिज्य शाखेचा विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून त्याला भविष्यात नेमके काय हवे आहे हे डोळ्यासमोर ठेवून त्यांनी नवीन अभ्यासक्रम नेमलेला आहे. भारतात जन्माला आलेल्या व भारतातच उद्योगाची मुहूर्तमेढ रोवून जगभर प्रसिद्ध झालेल्या उद्योजकांची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी यासाठी प्रथम वर्ष सत्र 1 व सत्र 2 असे मिळून सात उद्योजकांचा परिचय अभ्यासक्रमासाठी नेमलेला आहे. यातून दुहेरी हेतू साध्य झाला आहे एक म्हणजे वाणिज्य किंवा विज्ञान शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी भाषा विषयाचा अभ्यासक्रम नेमतांना त्या विद्यार्थ्यांमध्ये भाषा व साहित्याविषयी अभिरुची निर्माण होणे गरजेचे आहे. सदर उद्योजकांच्या जीवनाचा वेध घेतांना हा हेतू सहज साध्य होतो आणि दुसरे असे की, वाणिज्य शाखेतील विद्यार्थी हा व्यापार विपणन क्षेत्रात करीअर घडवणारा असतो, त्यामुळे\u003cbr\u003eसदर उद्योजकांच्या व्यापारी संघर्षाचा किंवा त्यांच्या व्यापारी करीअरची माहिती त्यांना यातून मिळाल्यामुळे उत्तर आयुष्यात येणाऱ्या अडचणींचा ते सहज सामना करू शकतील किंवा त्यांचे करीअर घडवण्यासाठी उद्योजकांच्या क्लृप्त्या त्यांना उपयोगात पडू शकतील. त्यामुळेच सदर अभ्यासक्रम हा रचनात्मक अभ्यासक्रम\u003cbr\u003eठरणारा आहे. अभ्यासक्रमानुसार सदर पुस्तकात जहांगीर रतन दादाभॉय टाटा, जीडी बिर्ला, वालचंद हिराचंद दोशी, धीरूभाई अंबानी, आदित्य विक्रम बिर्ला, रतन टाटा, राहुल बजाज अशा सात मान्यवर उद्योजकांचे संक्षिप्त जीवन चरित्र रेखाटलेले आहे. हे जीवन चरित्र रेखाटतांना काही तत्व आम्ही पाळली म्हणजे असे की, उद्योजकांनी मुख्यत: उद्योगधंद्याची केलेली सुरूवात, उद्योग उभारतांना त्यांना करावा लागलेला संघर्ष, उद्योगाच्या विस्तारासाठी त्यांनी घेतलेले परिश्रम यांचा आढावा घेतलेला आहे. सदर पुस्तक हे उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातील मराठी अभ्यास मंडळाने निश्चित केलेल्या अभ्यासक्रमानुसार तयार केलेले आहे. हे अभ्यासक्रमिक पुस्तक असले तरी वाणिज्य व विपणन क्षेत्रात करीअर घडविणाऱ्यांसाठी निश्चितच मार्गदर्शक ठरणारे आहे त्याचबरोबर सर्वसामान्य वाचकाचेही कुतूहल शमवणारे आहे.\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48868947558629,"sku":null,"price":125.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/BusinessLegends_FNL-1.jpg?v=1776666106","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%87%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a4%bf%e0%a4%af%e0%a4%a8-%e0%a4%ac%e0%a4%bf%e0%a4%9d%e0%a4%bf%e0%a4%a8%e0%a5%87%e0%a4%b8-%e0%a4%b2%e0%a5%87%e0%a4%9c%e0%a4%82%e0%a4%a1%e0%a5%8d%e0%a4%b8-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}