{"product_id":"उपयोजित-इतिहास-1","title":"उपयोजित इतिहास (Applied History)","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eइतिहासाचे स्वरूप काळाप्रमाणे उदंड आहे. साधारणत: पृथ्वीच्या उत्पत्तीपासून मानवी इतिहासाचा प्रारंभ होतो. मानवी जीवनाची झालेली उत्क्रांती, त्यातील टप्पे, मानवी संस्कृतीचा उदय-अस्त, त्यांच्या जीवनात घडलेल्या विविध घटनांचा परामर्श इतिहासाच्या अभ्यासात केला जातो. मानवी जीवनाचा भूतकाळ म्हणजे इतिहास. मानवी जीवनाच्या सर्वांगाला स्पर्श करण्याचा प्रयत्न साधारणत: इतिहासाच्या अभ्यासाद्वारे केला जावू शकतो. प्राचीन, अतिप्राचीन काळात इतिहासाला मर्यादा होत्या. आधुनिक काळात मात्र त्या नाहीत. प्राचीन काळापासूनच मानवाला सुंदर, कलात्मक, मौल्यवान, दुर्मिळ अशा कोणत्याही वस्तू अथवा अवशेषांबद्दल आकर्षण व कुतूहल असते. वस्तुसंग्रहालयातून मानव संस्कृतीच्या पाऊलखुणा जपून ठेवलेल्या दिसतात. वस्तुसंग्रहालयाची कल्पना सर्वप्रथम युरोपमध्ये जन्माला आली. वस्तुसंग्रहालयाचा उदय प्रथम ग्रीस व रोममध्ये घडून आला. प्राचीन भारतात अनेक विद्यापीठे होती. या विद्यापीठात मोठी संग्रहालये होती. पण ती आजच्या वस्तुसंग्रहालयासारखी सुसज्ज नव्हती. देशभरातील अनेक संस्थानिकांनी आपआपल्या संस्थानात त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या वस्तूंची वस्तुसंग्रहालये स्थापन केलीत. मानवी जीवनात नाविन्यपूर्ण गोष्टी, वास्तू पहाण्याचे आकर्षण अनादी काळापासून आहे. ऐतिहासिक स्थळे, स्मारके, प्राचीन वस्तू व वास्तू, मंदिरे, मंदिरातील देवदेवतांच्या मूर्ती, राजवाडे, नवी आकर्षक व जुनी घरे, किल्ले, गुहा, लेणी इ. पहाण्याची मानवी मनास अत्यंत उत्सुकता व कुतूहल असते.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48473978044645,"sku":null,"price":120.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upyojit-Itihas-1.jpg?v=1772089656","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%87%e0%a4%a4%e0%a4%bf%e0%a4%b9%e0%a4%be%e0%a4%b8-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}