{"product_id":"उपयोजित-मराठी-1","title":"उपयोजित मराठी","description":"\u003cp\u003e\u003cspan\u003eअभ्यासक्रमनिर्मितीप्रक्रिया किंवा प्रत्यक्ष अध्यापनात सहभागी नसणार्या सामान्य कुवतीच्या लेखनीबहाद्दरांनी विद्यापीठ अभ्यासक्रमात अंतर्भूत अभ्यासपत्रिकांच्या अनुषंगाने जुजबी टिपणे लिहिणे असे चित्र अगदी नजीकच्या काळापर्यंत उच्च शिक्षणक्षेत्रात दिसत होते आणि आजही ते बदलले आहे असे नाही. अशा व्यापारी मार्गदर्शक खटाटोपाच्या जाळ्यात अभ्यासक विद्यार्थीसुद्धा सहज सापडत होते. परिणामी पदवी स्तरावरील उच्च शिक्षणाचे उद्दिष्टच व्यापकपणे कधी फलद्रूप झाले नाही.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eप्रामाणिक व पदवीचे उद्दिष्ट जाणणार्या अभ्यासकाकडून खरेतर अशा अभ्यासक्रमास अथवा अभ्यासपत्रिकेस साहाय्यभूत संदर्भग्रंथांचे लेखन होणे अपेक्षित असते. असे अभ्यासकच अतिसुलभीकरण व अव्याप्तपणा अशा दोषांपासून अलिप्त रहात आपली समज आणि तत्संबंधीचे समकालीन भान विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवतात.\u003c\/span\u003e\u003cbr\u003e\u003cspan\u003eडॉ. संदीप माळी ह्या विद्यार्थीमित्र अभ्यासकाने उपयोजित मराठी ह्या संदर्भग्रंथात पदवी स्तरावरील अध्ययन-अध्यापन प्रक्रियेचे मूलभूत भान बाळगले आहे, हे खूप महत्त्वाचे आहे. डॉ. माळी ह्यांनी ह्या संदर्भग्रंथाच्या रूपाने भाषेच्या उपयोजित अंगाची वस्तुनिष्ठ ओळख करून देत मराठी भाषेचा उपयोजनव्यवहार प्रचलित पारंपरिक व अत्याधुनिक माध्यमांच्या संदर्भात प्रात्यक्षिक व विवेचक अशा दोन्ही अंगाने प्रस्तुत केला आहे. सर्वच विद्यापीठांच्या परिक्षेत्रातील विद्यार्थी, प्राध्यापक, अभ्यासक व भाषिक उपयोजनाची मुळाक्षरे गिरवणार्या सर्वांसाठी हा संदर्भग्रंथ उपयुक्त ठरेल ह्यात शंका नाही.\u003c\/span\u003e\u003c\/p\u003e","brand":"Prashant Publication","offers":[{"title":"Default Title","offer_id":48451548643557,"sku":null,"price":110.0,"currency_code":"INR","in_stock":true}],"thumbnail_url":"\/\/cdn.shopify.com\/s\/files\/1\/0802\/8563\/0693\/files\/Upayojit-Marathi_Dr-Sandip-Mali_cnvt-1.jpg?v=1771583468","url":"https:\/\/prashantpublications.com\/products\/%e0%a4%89%e0%a4%aa%e0%a4%af%e0%a5%8b%e0%a4%9c%e0%a4%bf%e0%a4%a4-%e0%a4%ae%e0%a4%b0%e0%a4%be%e0%a4%a0%e0%a5%80-1","provider":"My Store","version":"1.0","type":"link"}